हरवला...

Submitted by desh_ks on 2 May, 2008 - 23:51

हाय, कसा विश्वास हरवला
समर्पणाचा ध्यास हरवला ।

तुझ्यासंगती दरवळलेला
उरातला तो श्वास हरवला ।

सातजणांना पुरुन उरे, तो
तिळाएवढा घास हरवला ।

जगण्याला धुंदी स्वप्नांची
विस्मृतीत इतिहास हरवला ।

युगाहुनी मोठा असणारा
प्रतीक्षेतला तास हरवला ।

सत्य ज्यातुनी वेचुन घ्यावे
मोहकसा आभास हरवला ।

-सतीश

गुलमोहर: 

वाह.....

प्रत्येक, अगदी प्रत्येक शेर आवडला... (पण मतला जरा फिका वाटतोय..)
सत्य ज्यातुनी वेचुन घ्यावे
मोहकसा आभास हरवला ।
केवळ सुंदर...

वा! शेवटचे २ शेर फार आवडले! मस्त गझल आहे...

व्वा, मस्तच

सातजणांना पुरुन उरे, तो
तिळाएवढा घास हरवला ।

हा शेर खासच.

सुधीर