शेरास सव्वाशेर - प्रकाशचित्रांचा झब्बू क्र. ८

Submitted by संयोजक on 1 September, 2010 - 10:48

मॉल असो वा रस्त्याच्या कडेला भरणारा बाजार. चोरबाजार ते जुना बाजार. काहीही न घेण्याचा पण करुन घराबाहेर पडलो तरी काहीतरी विकत घेण्याचा मोह पाडणारी ही ठिकाणे. तर टाका या मोहमयी जगताची छायाचित्रे आजच्या झब्बूमध्ये.

हे लक्षात ठेवा :
१. ही स्पर्धा नाही. हा खेळ आहे.
२. ह्या खेळात सहभागी होण्यासाठी आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०१०' ह्या ग्रूपचे सभासद होणे गरजेचे आहे.
३. रोज एक नवीन छायाचित्र झब्बूसाठी दिले जाईल.
४. दिलेल्या छायाचित्रावर झब्बू म्हणून एका वेळेस एकच छायाचित्र टाकावे.
५. झब्बूचे छायाचित्र हे स्वत: काढलेले असावे.
६. झब्बूचे छायाचित्र संयोजकांनी दिलेल्या छायाचित्रातल्या विषयाशी सुसंगत असावे.
७. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो/ते, फक्त सलग दोन झब्बू देऊ शकत नाही.

आजचा विषय - बाजार

तुमच्या गावातला बाजार, उरूस, किंवा एखादा मॉल यासारखी छायाचित्रे इथे येऊ देत.

2010_MB_Jhabbu_Bajaar.jpg
विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

रार,
तू सॅन्टा फे ला जाऊन आलीस? कधी?
ऑपेरा रांचच्या शेजारचं फ्ली मार्केट आणि प्लाझा एरियामधले छोटे छोटे आर्ट स्टुडिओ/ गॅलरीज बघितलेस का?
ऑअ‍ॅसिस रेस्टॉरन्ट/ लाउंज मधे गेली होतीस का? काउगर्ल्स नावाच्या बारमधे गेली होतीस?
ऑपेरा पाह्यलास का ओपन एअर थिएटरचा? आणि मानवनिर्मित नसलेला आकाश-कोलोरॅडो हायवे-डोंगर-चांदणं असा बॅक्ड्रॉप असलेला ऑपेरा पाह्यलास का आमच्या थिएटरमधे? ऑपेरा रांचची डे टूर घेतलीस?

सॅन्टा फे चं नाव काढल्यावर मला एकदम सदगदित आणि नॉस्टॉल्जिक इत्यादी व्हायला झालंय...

गणेशोत्सवातल्या ह्या लोकप्रिय खेळाला दिलेल्या भरघोस प्रतिसादाबद्दल सर्व मायबोलीकरांचे आभार ! ह्या निमित्ताने सगळ्यांना घरबसल्या तुम्ही काढलेली प्रकाशचित्रे त्याबरोबरच अनेक ठिकाणेही बघायला मिळाली. गणेशोत्सवाच्या सांगतेबरोबरच हा धागा आता बंद होत आहे.

Pages