Submitted by जया एम on 1 September, 2010 - 08:39
मेघ उगा पुन्हा कोसळून उरात फुटले
दूर दिशांमध्ये प्राक्तनाचे रहस्य दाटले
मन भिजले पाखरू काय शोधते कळेना
त्याला घरट्याची दिशा इच्छा असून मिळेना
ओल्या थेम्बातून पानावर उमटले काही
चित्रलिपीचे संदेश ऋतू घेउनिया येई
गच्च पारंब्या धरून पाणी उतरले खाली
वृद्ध वडाला कोणाची चिंब आठवण आली
पाणी पाऊस पाऊस मन मंथर मंथर
पाणी डोळ्यात डोळ्यात जीव अंथर अंथर
हले पाण्याचे झुंबर हळू मनाच्या महाली
थोडी किलकिली झाली दारे, पुन्हा बंद झाली
गुलमोहर:
शेअर करा
आवडली!!!
आवडली!!!
जुने पाणीच चांगले होते
जुने पाणीच चांगले होते
दोघान्चे आभार!
दोघान्चे आभार!
छान वातावरणनिर्मिती!!
छान वातावरणनिर्मिती!!
वाह.........!!!!!!!!!!!!!!!!!
वाह.........!!!!!!!!!!!!!!!!!!
शेवटची तीन कडवी मस्तजमून आली
शेवटची तीन कडवी मस्तजमून आली आहेत.
सुंदर
सुंदर
आभारी आहे. मनातल्या प्रतिमा
आभारी आहे. मनातल्या प्रतिमा आणि प्रकटीकरण यान्च्या मधल्या पोकळीत काहीतरी हरवून राहून गेले ते सापडलेच नाही. शेवटी तशीच लिहून टाकली...
जया... <<मनातल्या प्रतिमा आणि
जया... <<मनातल्या प्रतिमा आणि प्रकटीकरण यान्च्या मधल्या पोकळीत काहीतरी हरवून राहून गेले ते सापडलेच नाही. शेवटी तशीच लिहून टाकली...>>
नव्हे... तुझ्या कवितांमधे मला तरी हे हरवलेपण सापडतय आणि निव्वळ वेड लावणारं आहे. सापडतय सापडतय म्हणेपर्यंत माझ्याच मनाच्या वलयांमधे कुठे हरवतं.
फार सुंदर लिहिता. अजून लिहा.
फार सुंदर लिहिता. अजून लिहा.
पाणी पाऊस पाऊस मन मंथर
पाणी पाऊस पाऊस मन मंथर मंथर
पाणी डोळ्यात डोळ्यात जीव अंथर अंथर >> सुंदर .