बाराखडी

Submitted by ह.बा. on 1 September, 2010 - 06:30

आता पुन्हा प्रकाशाचा
अंधाराशी सामना होईल
झोपडीत मिणमिणता दिवा
पुन्हा एकदा विझून जाईल
शब्दांचा झरा पुन्हा
महलातुनच वहायला लागेल
गरीबापासून बाराखडी
दूर दूर जायला लागेल
ज्ञान मिळायचं पुर्वी जेव्हा
छडी लागायची छम छम
छडी गेली नी पैसा आला
हाच एक आहे गम
दलालानी सारी सारी
शिक्षण व्यवस्था नासवली
पैशासाठी सरस्वतीला
बाजारात बसवली
नगरपालिकेच्या दिव्यांखाली
राबतात जे गुणांसाठी
त्यानाच पुन्हा प्रश्न पडतोय
आजचं शिक्षण कुणासाठी?

गुलमोहर: 

छान . Happy

वा वा हबा... जळजळीत वास्तव...

जरा ''मिणमिणता दिवा'' असं कर मित्रा....

खरय मित्रा Sad
काहीही म्हण साध्या सरळ शब्दात थेट आतपर्यंत जावुन पोचणं तुझ्याकडुनच शिकावं.

नगरपालिकेच्या दिव्यांखाली
राबतात जे गुणांसाठी
त्यानाच पुन्हा प्रश्न पडतोय
आजचं शिक्षण कुणासाठी?

अप्रतिम...!!!

छडी गेली नी पैसा आला
हाच एक आहे गम
दलालानी सारी सारी
शिक्षण व्यवस्था नासवली
पैशासाठी सरस्वतीला
बाजारात बसवली

हणमंतराव........... आपल्याशी पुर्णपणे सहमत..................

सही .