सहस्त्रभुजा फैलावून मी
गगनभेदी गर्जना केली
आणि आभाळ उचलून घेत
सूर्याला टाळी दिली..
काहीच अशक्य नव्हतं मला
लक्षावधी अश्वांचा रथ
वायूगतीने सोडायचो आणि
आकाश, पाताळ, धरणीला
बेभान वेसण घालायचो..
माझ्या त्या सुसाट, बेफाट, अफाट रूपाकडं
कण आणि कण थबकून पाहायचा
डोळ्यांत भरून घ्यायचा..
वारा माझा गुलाम होता
ठोकरीत पाणी होतं
आणि तेज......हं
ते तर मीच होतो..!
पण दमलो भागलो ना
कि
तुझ्या कडं यायचो
मिठीत विसावायचो..
माझं सारं अवसान शैशव होऊन जायचं
न मागता तुलाच , सारं सारं समजायचं
अमर्याद शक्तीचा स्वामी
नाही फक्त तुझा..तुझाच मी
हीच तर माझी खरी ओळख होती
आधाराची मलाही थोडी गरज होती
शक्तीहीन अवस्थेत जेव्हां
तुझ्या ओंजळीत चेहरा लपवायचो
तेव्हां कुठूनतरी अक्षय उर्जेचे सोनेरी कण चमकून जायचे
आणि माझे बाहू पुन्हा फुरफुरू लागायचे...
आणि एक दिवस..
आठवतंय मला
तुझा चेहरा माझ्या ओंजळीत होता
अर्धोन्मिलीत नेत्र...लाडीक खळी
आव्ळलेल्या मुठीतली चाफ्याची कळी
मी थोपवू पाहीलं तेव्हां
निळाईच्या त्या जादूगाराला
रोखून पाहीलं त्याच्या
लाचार पावलांना...
पण
पण
माझा शक्तीपात झाला
प्रचंड शक्तीपात..
उंच कड्यावरून मी कोसळत असतांना
माझी अक्षय उर्जेची कुपी निसटून गेली..
तुझ्याशिवाय.....
आता दोन पावलंही टाकवत नाहीत
कातरवेळेची उन्हही झेपत नाहीत
वारा मला हासत असतो
आकाश वेडंवाकडं होत होत
वाकुल्या दाखवत असतं
सूर्य चक्क भाजून काढतो
आणि पाण्याविना कासाविस होतो..
माझी ही दशा
कण आणि कण थबकून पाहतो..
कारूण्यानं..कणवेन
तुझ्याशिवाय मी काही नाही
हे आता कळून चुकतं..
पण श्वास मोजत राहण्याखेरीज
आता हाती काही नसतं..
तुझ्याशिवाय......!!!
Kiran™
तुझ्याशिवाय मी काहीच नाही हे
तुझ्याशिवाय मी काहीच नाही
हे आता कळून चुकतं..
पण श्वास मोजण्याखेरीज
हाती आत काहीच नसतं.
फारच सुंदर भाऊ. अप्रतिम आशय.
गंगाधर मुटे™
आशय फार फार आवडला. कविता
आशय फार फार आवडला. कविता लांबली असे वाटले.
परावलंबीत्वाची एक परिसीमा आली या कवितेत! 'ती' ऐवजी ईश्वर गृहीत धरले तर मस्तच!
धन्यवाद!
-'बेफिकीर'!
बेफिकीर.. कुणीतरी विचारलं
बेफिकीर..
कुणीतरी विचारलं होतं..
उतारवयात जोडीदार साथ सोडून गेला तर काय होईल...त्या प्रश्नाचं उत्तर म्हणून ही कविता आहे.
तुमची कल्पना सुरेखच
गंगाधरजी...खूप दिवसांनी भेटलो...धन्यवाद
किरणजी अप्रतीम आहे तुमची
किरणजी अप्रतीम आहे तुमची कविता.................. खुपच सुंदर
जबरी रे...
जबरी रे...:)
वा किरण...... शेवटचं ''
वा किरण...... शेवटचं '' तुझ्याशिवाय'' हा शब्द चटका लावून जातो...
अप्रतिम रचना....
अप्रतिम रचना....
छानच! ओघवती शब्दरचना !!
छानच! ओघवती शब्दरचना !!
.माझ्या सर्व मित्रांचा मी
.माझ्या सर्व मित्रांचा मी मनापासून आभारी आहे.....
मस्तच, एकदम आशयगर्भ रचना!!
मस्तच, एकदम आशयगर्भ रचना!! भुषणजींशी सहमत(ईश्वराच्या मुद्दयावर)
केवळ ग्रेट .
केवळ ग्रेट .
कणखर, छायाजी धन्यवाद
कणखर, छायाजी
धन्यवाद
तुझ्याशिवाय..... आता दोन
तुझ्याशिवाय.....
आता दोन पावलंही टाकवत नाहीत
कातरवेळेची उन्हही झेपत नाहीत
वारा मला हासत असतो
आकाश वेडंवाकडं होत होत
वाकुल्या दाखवत असतं
सूर्य चक्क भाजून काढतो
आणि पाण्याविना कासाविस होतो..
आयुष्यात पठारावस्था येतेच्....जिथे अप असते ना डाउन्.......फक्त अस्तो संथ श्वास्.....आणि तिथेच उमगते आपल्या माणसाचि ओळख.....या भावनेचे हे जणु सचित्र वर्णन आहे........अतिउत्तम्.....खूप खूप आवडली.......:)
सुरेख
सुरेख
खुप अवडली !!
खुप अवडली !!
"तुझ्याशिवाय मी काही नाही हे
"तुझ्याशिवाय मी काही नाही
हे आता कळून चुकतं..
पण श्वास मोजत राहण्याखेरीज
आता हाती काही नसतं.."
..... हे अधिक आवडलं
प्रभावी आशय.
योगिता, चेतना, संध्या आणि
योगिता, चेतना, संध्या आणि उल्हासकाका
मनापासून आभार सर्वांचे
एक बोचरी व्यथा...
एक बोचरी व्यथा...
खूप अंतरमुख करुन जाते...मला
खूप अंतरमुख करुन जाते...मला आई आणि मुलगा अशी ही भासली!
अप्रतिम...
अप्रतिम...