भिंतीवर रंगवलेला घोडा

Submitted by धनुडी on 30 August, 2010 - 06:17

हा मी आमच्या गच्चीत रंगवलेला घोडा. एक भिंत मी रंगवली आणि मग रंगपंचंमीला जी सुरवात झालीये....सगळ्या भिंती रंगवल्या , एक माझ्या मोठ्या बहीणीने, एक माझ्या मुलाने.
अत्ता माझ्या कडे एकच फोटो आहे, घोड्याचा . ह्याची मी फक्त आउट्लाईन काढुन घेतली होती, बाकी डायरेक्ट्च रंगवला. खुप मजा आली होती. आता बरीच वर्ष झाली तरी अजुन उभा आहे तो. ...........

(............ ह्या फोटोतली माझी आई मात्र आता नाहीये................)ghoda.jpg

गुलमोहर: 

धनुडी मस्तच अगदी... !

भिंतीला मस्त गेरूचा रंग , अन त्यावर असे पांढरे घोडे ... घरच्या हॉल मधे दर्शनी भिंतीवर अश्या घोड्यांचा वॉलपेपर काय झक्कास दिसेल अन सोबत सौम्य पिवळ्या लाईट्सचा फ्लॅश.

मस्त आहे धनु. आईंच्या हातात कोकरू आहे का गं? भाव किती प्रसन्न आहेत त्यांच्या चेहर्‍यावर.
कलर स्कीम मस्त आहे घोड्याची.

लहान बाळाला खेळण्यासाठी जी प्लॅस्टीक air bag खेळणी असतात, तशीच अशी घोड्याच्या आकाराची कापडी चिंध्या भरून केलेली खेळणी सुद्धा बनवता येईल Happy

मस्तच आहे Happy

आमच्या एका मित्राने त्याच्या मुलाच्या रूमच्या चारही भिंतीवर रंगवले आहे असेल हत्ती, मासा वगैरे काय काय Happy

खूप छान!!!
ctrl + scroll up केला की फोटो मोठे दिसत आहेत....

धनुडी, छान झालाय घोडा. Happy त्यावर काही चिकटवले पण आहे का? की सगळे रंगच आहेत?

इथे डेकोरेटिव्ह वॉल पेन्टिन्ग बरेचजण करुन घेतात किंवा स्वतः करतात. स्टेन्सिल्स,फॉ पेन्टिन्ग, म्युरल्स. माझ्या शेजारणीने आर्टिस्टकडून करुन घेतलंय आणि एकीने स्वतःच पॅटर्न बनवून पेन्ट केलंय. वेबवर शोधलं तर खूप मिळतील.
इथे मुलांच्या रुमसाठी काही आहेत - http://www.mywonderfulwalls.com/

छानच Happy

अश्विनी, मिनोती, रैना,वर्षू, अरुंधती, स्मिता ,मामी, गणेश कुलकर्णी, दिनेशदा, अल्पना, वर्षा, भ्रमा, मिनी, अमृता, लाजो, लालू, रूनी, स्वाती, सिंडरेला, अशुतोष सगळ्यांना धन्यवाद. Happy
अश्विनी (मामी नाही म्हणणार) , हो कोकरुच आहे. आमच्या बाईकडे बकरी होती. ती समोरच राहायची तिने मुलांना दाखवायला म्हणुन आणंल होतं.
दिनेशदा Happy स्वप्नातला राजकुमार आता कोणासाठी?

लालू, ऑइलपेंटने रंगवलय सगळं . आमच्याकडे कलकत्त्याहुन आणलेला, एक मातीचा घोडा होता छोटासा. तो बघुन काढलाय. ( तो मातीचा घोडापण मी एकदा सगळा रंगवुन काढला होता, शाळेत असताना)

रूनी, Happy माझ्यापण मनात गुर्जरीटाइपची बेड्शीट होती हा घोडा रंगवताना . ते माझं फेव्ह. डिझाईन आहे. म्हणुन ते तसं उतरलं असेल.