Submitted by विजयकुमार on 30 August, 2010 - 01:44
आता उठावे पंख घेवुनी
वेगे भेदावे उंच गगनाला
सुर्यामागे जाउनी लपुन राहावे
लागावा ना मागमूस कुणाला !
भले बेहत्तर राख जाहली
परत फिरुनी यावे धरणीवर
कण कण होवुनी तरंगावे
रानोमाळी बागडणा-या वा-यावर !
स्वप्नात जावूनी वेचावे मोती
भले जागेपणी हाती पत्थर
पत्थारातुनी लेणी कोरीव उठवू
असेल नशीब जरका बलवत्तर !
वेचुनी काटे काढुनी जर
विणावे कलाबुती वस्त्र जरतारी
गोळा करुनी आनंदाचे गाठोडे
फिरावे भूतली सुख सौदागरापरी !
हसतील शहाणे म्हणतील वेडा
तमा कशास कुणाची बाळगावी
दुख मिळाले जरी अपरंपार
बिरुदे म्हणुनी शिरी वागवावी !
फोडुनी खडक उठवाव्या वाटा
पिऊनी सागरा अगस्ती बनावे
जळूनी गेली कुडी तरीही
आत्मानंदात व्योमी उत्तुंग विहरावे !
विजयकुमार.........
२६.०२.२०१०,मुंबई
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा
मस्त .
मस्त .
सह्हीए....
सह्हीए....:)
“फोडुनी खडक उठवाव्या
“फोडुनी खडक उठवाव्या वाटा”
….. जिद्द आणि दुर्दम्य आशावाद आवडला.
“है अंधेरी रात तो क्या दीपक जलाना कब मना है”
या ओळी आठवल्या
अभार!!!!
अभार!!!!