बोलावणे
Posted
15 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
15 वर्ष ago
6
दिवस बदलत गेले शब्दा मधून माझ्या
नव्या व्याख्यांच्या ऐरणीवर घाव सोसतोच आहे
अर्थ पाळलेली सारी दारे "सावधान" च्या पाट्यांमागे...
तुमच्या गळ्यात शब्दांनो पाहतो मालकीचे पट्टे घट्ट रुतणारे
तुमच्या गुरकावण्यातले इमान ? लाळ गाळतेच आहे
चेहरे रेखलेली सांज नायकिणीच्या घरी
आज शब्दांचा गाव सारा लालदिव्यांचा बाजार आहे....
विकले नाहीच ज्यांनी इमान आपले कसल्याच अर्थाला
अशा शब्दांचा प्रदेश कोण्या अज्ञाताच्या दिशेला ...
ह्या मिथकाच्या वाटेवरचा एक हत्ती
पिसारा फ़ुलावून कित्येक दिवस खुणावतो आहे!
~ ० ~
जमले तर इथेही प्रतिक्रिया द्या:
विषय:
प्रकार:
शेअर करा
विकले नाहीच ज्यांनी इमान आपले
विकले नाहीच ज्यांनी इमान आपले कसल्याच अर्थाला
अशा शब्दांचा प्रदेश कोण्या अज्ञाताच्या दिशेला ... >>>>>> वाह !
व्वा... झकास!
व्वा... झकास!
वा! शब्दांचा गाव.. किळसवाणा
वा! शब्दांचा गाव.. किळसवाणा जबरदस्तीच्या स्पर्षासारखा..
शब्द, अर्थ...
शब्द, अर्थ... त्यापुढे..?
त्रागा उमगतोय..
..............................!
मस्त! एकदम आवडली.
मस्त! एकदम आवडली.
कळली का माहित नाही, पण पकडून
कळली का माहित नाही, पण पकडून बांधून ठेवतेय.