शब्द ----नाट्य----भाग ५--जयनीत दिक्षित

Submitted by जयनीत on 29 August, 2010 - 12:04

पहीला- ए तुझी तर्,खुप झालं,आता गेलाच तू,
(पहीला वकिलाच्या आगांवर धावतो आणि त्याची कॉलर पकडतो,दुसरा त्याला हात धरुन मागे खेचतो)
दुसरा- ए थांब, थांब आज नको नंतर बघु ह्याला,साहेब म्हणाले की आधी प्रेमानी समजवून बघा,समजला तर ठीक्,नाही तर बघू म्हणे काय करायचं ते,आपलं काम आपण केलं,आता साहेब बघतील ह्याचं काय करायचं ते.
पहीला-ठीक आहे,पण ए वकिल्,तू सांभाळुन रहा रे,तू खुप अकड दाखवून राहीलास हं बघतोच तुला.
वकील- अबे जा जा,खुप पाहीलेत तुझ्या सारखे आपल्या साहेबांचे चपराशी,चल नीघ.
पहीला-चपराशी! चपराशी म्हणतो मला?
(परत आंगावर धावतो,वकिल ही उसळुन त्याला मागे ढकलतो,दुसरा पहील्या ला मागीए ओढतो)
पहीला- सोड सोड मला,साला मला चपराशी म्हणतो!
दुसरा- ए आज फक्त आज राहू दे म्हटलं ना, साहेब म्हणाले ना एकदम काही करू नका म्हणुन्.आज नको ऐक माझं.
पहीला- ठीक आहे,ठीक आहे.पण बघतोच तुला,चपराशी म्हणतो का?
वकिल्-हो रे म्हंटल काय करशील?
पहीला-तू बघच्,उद्याच गाडी खाली घलतो तुला.
वकिल्-अबे कोणाला सांगतोस ह्या बाता?असे दम तर आता करून दाखव ना?

गुलमोहर: 
शब्दखुणा: