मुक्कामपोष्ट सनसवाडी : अर्थात सोशल नेटवर्कींग

Submitted by ऋयाम on 28 August, 2010 - 01:21

गोलबलाय्जेशन झालं, इंटरनेट आलं...
माहिती देतो म्हन्ता म्हन्ता, सग्ळा येळच घेउन गेलं...

'बगु तरी.. ' म्हन्ता म्हन्ता, "सनसवाडीला" येऊन पोचलो...
"जरा-जरा" म्हन्ता म्हन्ता, काय सांगु, 'इतलाच' झालो!

गाडी ही नॉन-श्टॉप, गाडी हाय थेट...
हायच आमची सनसवाडी, लय लय लय्च ग्रेट!

* * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * *

"हट.. कॉलेजच बरं होतं... " कॉम्प्युटर शट-डाउन करता करता मंदार म्हटला...
"कॉलेजात परीक्षेचा वैताग.. मास्तर फार बोर मारायचा... 'सकाळी ७ ला लेक्चर.. याच्या काकानं ठेवलं होतं.. "
पंकया बरोबर म्हणायचा, "याची पोरं याला झोपु देत नसतील...म्हणुनच सकाळी उठुन आपल्याला पण बोलावतो हा येडा..... "

कंपनीत आल्यापासून हा 'पी. एम.' ! चायला, हे सगळे पी.एम. असे का वाय झेड असतात? सारखं डोक्यावर बसतात.. "स्टेटस काय आहे?" अरे काय घंटा स्टेटस?
आत्ताच रिक्वायरमेंट चेंज झालिये... थोडा वेळ दे... जरा चहा पिऊ दे की.. आला लगेच कैफेटेरिया मधे.... काय? तर म्हणे "स्टेटस काये??"........ कोणाची तरी चिडचिड...

"राहुल कुठाय रे??"
"बिझी आहे फार... "
"थांब बोलावतो त्याला. ब्रेक्स हवेतच मधे मधे. किती काम करशील? तो पिसी आत ओढुन घेईल म्हणाव."
आत जाऊन बघतो तर काय? राहुल्या कॉम्पची स्क्रीन आणि सीपीयुचं डबडं यांना एकमेकांच्या दिशेने ओढुन त्यांचा त्रिकोण करुन स्वतः त्यात थोबाड घुसवुन काहीतरी टाईप करत होता. आणि खुसुखुसु करत हसत होता..
गुपचुप जाऊन बघितलं... "आयला! हे काय??? " "दाखव की."
"बाय इव्हिटेशन ओन्ली." राहुल.
"मग दे की इव्हिटेशन."
थोडे आढेवेढे घेतलेच राहुलनं, पण शेवटी आम्हाला ' इच्छित ' गावी नेलं, ती आमची ' सनसवाडी! ' अर्थात, आमचं 'ओरकुट' !!! Happy आमचं पहिलंवहिलं 'एस एन एस' अर्थात 'सोशल नेटवर्किंग साईट'!
लव्हेंडर रंगाची ती सुंदर स्क्रीन अजुनही जशीच्या तशी माझ्या डोळ्यासमोर आहे! एकदम लख्ख! Happy

'ही कोण रे???' राहुलला विचारलं होतं.
'अरे जस्ट अ फ्रेंड...' राहुल.
'चला, बरं झालं...' खरंच बरं वाटलं होतं... ' आपली लाईन क्लिअर... '
नंतर कळलं, सर्व सुंदर पोरींचं होतं तसं, तिचंही कंपनीत शिरल्या शिरल्या एका दुष्ट टी. एल. शी लग्न ठरलं होतं. जाऊदे. कशाला जुनी लग्नं आठवा?

तर, जीमेल तेव्हा नवंच आलं होतं, आणि तेही 'बाय इन्व्हीटेशन ओन्ली'. एका मित्राला कुठुन तरी मिळालं होतं, आणि तो सगळ्याना हत्तीवरुन साखर वाटतात तसं जीमेल इन्व्हीटेशन वाटत होता...
"आडनाव.नाव" किंवा "नाव.आडनाव" असा आयडी घ्या... असं मास्तरानी सांगितलं होतं, त्याप्रमाणं ते घेतलं आणि तेच कायमचं चिकटलंय...

सनसवाडीमध्ये आलो, त्या दिवशी 'काही म्हंजे काही' कळलं नाही. मग उगाचच त्या मित्राच्या प्रोफाईलमध्ये डोकावुन, ' प्रेक्षणीय ' प्रोफाईल्स शोधण्याचं काम हाती घेतलं. ' मुझसे दोस्ती करोगी? ' टाईप प्रश्न धडाधड करु लागलो. आता काहींनी ' होकार ' दिला, काहींनी ' नकार '. होकार दिलेल्यांना 'मैत्री खात्यात' जमा केलं, आणि पुढे जात राहिलो.

कंपनीमधे 'नाईट्स' म्हणजे काय हे समजु लागलं होतं. आता, कामाला पर्याय नाही, पण मग अधुनमधुन विरंगुळा म्हणुन 'ओर्कुटींग' चालु झालं होतं. पण काही काही लोक तासनतास विरंगुळ्यातच घालवु लागल्यानं कंपनीलाही त्यावर बंदी घालणं भाग पडलं. आणि मग सुरु झाला 'प्रॉक्सी वॉर्स' चा खेळ!
माहित नसेल त्यांच्यासाठी थोडक्यात सांगतो, की इथे म्हणत असलेला 'प्रॉक्सी' म्हणजे काय? तर एक 'प्रॉक्सी सर्व्हर'. म्हणजे, आपल्याला ओरकुटला जायचंय. पण म्हणुन आपण डायरेक्ट 'www.orkut.com' ला गेलो, तर कंपनीला ते समजतं! पण आपण तसं न करता 'kproxy.com' अशा साईटला जायचं, जो असतो आपला प्रॉक्सी सर्व्हर! आणि तिथे परत अशी सोय असते, की आपण आपल्याला 'हवी ती' अर्थात 'ओरकुट'ची लिंक टाकुन ओरकुटींग करु शकतो. कंपनीला वाटतं, की आपण 'के प्रॉक्सींग' करतोय, प्रत्यक्षात आपण ओरकुटींग!!! Happy काय आनंद झाला होता!
पण नेटवर्क अ‍ॅडमिन एवढाही 'हा' नव्हता. त्याला समजलं, की अचानक सगळे 'के-प्रॉक्सिंग' का करु लागले? आणि लगेच त्यावरही बंदी.
मग मजुर गटाकडुन नवी प्रॉक्सी शोधली गेली. बंदीही लगेच आली!! नवी प्रॉक्सी, बंदी!
आणि शेवटी मजुर गटानं हार मानली आणि प्रोफाईलमधे पांढरा झेंडा : - 'नो ओरकुट ईन ऑफिस!!! Sad '

* * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * *

पण मग कंपन्यांनीही 'जाऊ दे..' करत एखादं मशीन 'कॉमन अ‍ॅक्सेस' साठी ठेवलं, जिथुन 'काय वाट्टेल ते' अ‍ॅक्सेस होईल. आणि मग तिथे रांगा लावुन लोकांनी असं 'रेशनवर' ओरकुटिंग चालु केलं...

'एवढी काय खासियत? 'असं का झालं??' 'ओरकुटमधे असं काय विशेष होतं?' हे प्रश्न सगळ्यांना पडतीलच असं नाही. पण माझ्या पिढीतल्या (जनरेशन म्हणु का??) लोकांवर (मुलामुलींवर म्हणु का??) मात्र ह्या गोष्टीनं जबरदस्त प्रभाव टाकला आहे. त्यामुळं आमच्यासाठी हा चांगलाच जिव्हाळ्याचा विषय आहे, ज्यावर मी काही तास्/काही पानं सहज खर्च करु शकतो.

इंटरनेट आलं ते 'इमेल' घेऊन. त्याच्या बरोबर चॅट पण. ते 'आय्-एम-आर-सी' का काय होतं, ते पहिलं चॅट. नंतर याहु आलं. मग हॉटमेल आलं. रेडीफ. सिफी. काय्काय.... सगळ्यांचे चॅट क्लायंट आणि सगळीकडे टीपी. पण त्यात जे मिसिंग होतं, ते सगळं ओरकुटनं भरुन काढलं.

  1. प्रोफाईल पिक्चर
  2. सुरुवातीला १६/३२ फोटो अपलोड सुविधा
  3. मित्र म्हणुन अ‍ॅड करणे आणि मग 'स्क्रॅप टाकणे' सुविधा
  4. आवडीचे विडीओ
  5. कम्युनीटीमधे भाग घेणे, स्वतःची चालु करणे
  6. एखादा किती कुल/हॉट/सेक्सी आहे हे सांगणे
  7. एखाद्याचा फॅन/पंखा होणे!! --> हे सगळ्यात गाजलं! (मै तेरा फॅन - तु मेरा फॅन)

एक ना अनेक कारणांमुळं ओरकुट सगळ्यांच्या मनात घुसलं आणि घर करुन राहिलं.
तसं मग ओरकुटबरोबरच इतरही आले. हायफाय वगैरे. पण ते नाही आवडलं कधीच.

पण अजुन लोकांना त्याची खरी गंमत माहितीच नव्हती. शाळेतले मित्र-मैत्रिणी, ज्यांच्याशी काहीच संपर्क राहिला नव्हता, ते अचानक ओरकुटवर भेटायला लागले, आणि 'ओरकुट म्हणजे वरदान!' असं काहीसं लोकांना वाटुन गेलं. मग एकमेकांच्या ओळखी, आपले जुने दिवस वगैरे नॉस्टेल्जिक 'टेस्टिमोनिअल्स'चा पाउस पडला. काही इनोदी लोकांनी 'हा माणुस लय भारी आहे वगैरे वगैरे..' लिहुन मग शेवटी 'हे सगळं खोटं आहे!!' किंवा 'मला बंदुक दाखवुन हे लिहुन घेतलं आहे' वगैरे पाणचटगिरी करुन घेतली.
आणि रेडीमेड टेस्टीमोनिअल्सनी तर वैताग आणला. हे बघा: रेडिमेड टेस्टीमोनिअल्स

मधेमधे गम्मतही असे. म्हणजे एखादी अ‍ॅक्शन नीट पुर्ण न होता, काही 'एरर' आली, की 'बॅड बॅड सर्व्हर. नो डोनट फॉर यु...' Happy 'भविष्य' तर ऑल टाईम हीट! हे बघा : -

bhavishya.jpg

किंवा हे बघा: -

एक वर्ष वाचलं Wink
chuk.jpg

ह्या सगळ्याचं मुळ काय पण? हे कोणी काढलं आणि का?
याचं उत्तरही यथावकाश सगळ्यांना मिळालं,
'श्री. ओरकुट बुयुक्कोतेन'.
त्याची ष्टोरी सगळ्यांना माहित असेलच, पण म्हणे की त्यानं त्याच्या 'बिछडे हुए प्यार को मिलने दे वासते' ही साईट बनवली. आणि नंतर ती एवढी फेमस झाली की काय बोला!! खरं खोटं तोच जाणे... ओरकुट.

आता... 'शिष्ट' (म्हटलो तर त्यांना राग येईल, पण मला तसंच वाटतं, अशा) लोकांनी आपापल्या प्रोफाईलवर 'मी इथे फक्त माझ्या मित्रमैत्रिणींना भेटायला आले(क्ष) आहे. उगाच मैत्री करायचा प्रयत्न करु नये..' असे सेल्समनला बाहेर काढणारे बोर्ड्स टांगले. तुमची मर्जी, पण माझ्या मते, 'एवढं काय त्यात?'
'दुर्लक्ष' करा की!!! पण नाही....
* 'क्ष' : च्या जागी 'ली' वाचा.

ह्यामागचं कारणही होतं म्हणा... काही महाभाग फार पोचलेले असल्यानं कदाचित बरोबर असावं. (अशा कोणी 'महाभाग्या' होत्या असं ऐकिवात नाही.) हे लोक काय करतात, तर ओळख ना पाळख, डायरेक्ट स्क्रॅप! "हॅल्लो. आय एम टिंबटिंब. " आणि मग रोजच्या रोज एचटीएमएल स्क्रॅप्सचा पुर! 'F.R.I.E.N.D.S.'

---------------------------------------------------------------------------------------------------------------------

oooO
(....).... Oooo....
.\..(.....(.....)...
..\_)..... )../....
.......... (_/.....
oooO
(....).... Oooo....
.\..(.....(.....)...
..\_)..... )../....
.......... (_/.....
oooO
(....).... Oooo....
.\..(.....(.....)...
..\_)..... )../....
.......... (_/.....
oooO
(....).... Oooo....
.\..(.....(.....)...
..\_)..... )../....
.......... (_/.....
.oooO
(....).... Oooo....
.\..(.....(.....)...
..\_)..... )../....
.......... (_/.....
ONLY FEW PEOPLE CAN ENTER MY HEART....ONZ THEY DO THEY R SPECIAL..NO WONDER U R SPECIAL...LUCKY TO HAV A FRND LIKE U..

---------------------------------------------------------------------------------------------------------------------

₪┼┼┼┼┼┼┼┼┼┼┼┼┼┼┼┼┼┼┼┼┼┼┼┼┼┼┼┼┼┼┼┼┼┼┼₪
₪┼██┼┼┼┼██┼████┼┼┼███┼┼┼████┼██┼┼█┼┼₪
₪┼██┼┼┼┼██┼█┼┼┼█┼█┼┼┼█┼█┼┼┼┼┼██┼█┼┼┼₪
₪┼██┼┼┼┼██┼█████┼█┼┼┼█┼█┼┼┼┼┼███┼┼┼┼₪
₪┼██┼┼┼┼██┼█┼█┼┼┼█┼┼┼█┼█┼┼┼┼┼██┼█┼┼┼₪
₪┼██┼┼┼┼██┼█┼┼█┼┼█┼┼┼█┼█┼┼┼┼┼██┼┼█┼┼₪
₪┼┼██████┼┼█┼┼┼█┼┼███┼┼┼████┼██┼┼┼█┼₪
₪┼┼┼┼┼┼┼┼┼┼┼┼┼┼┼┼┼┼┼┼┼┼┼┼┼┼┼┼┼┼┼┼┼┼┼₪
█████████████████████████████████████

---------------------------------------------------------------------------------------------------------------------

F'SHIP IS NOT COLLECTION OF HEART
BUT IT IS SELECTION OF HEART
ALL FRD ARE NOT TRUE
BUT TRUE FRD ARE VERY FEW
AND I ALWAYS LIKE YOU.....ask the God to
Always protects you and bless you:

¨¨¨_..._¨¨¨¨¨¨¨¨¨¨¨¨¨¨¨¨ _..._
,.~´¨¨`~.¨¨¨¨¨¨¨¨¨¨¨¨.~`¨ ¨ ~.
/¨ ¨ ¨ ¨ ¨}¨¨¨¨¨¨¨¨¨¨¨{ ¨ ¨ ¨ ¨ ¨\
.\¨._.'`~~/.¨¨¨¨¨¨¨¨¨¨¨¨\~~`'._¨ /
.{_,}¨ ¨-(. ¨¨¨¨¨.¨¨¨¨¨¨¨)- ¨ {,_}
.¨,'-,___.' ¨¨¨¨¨ .-. ¨¨¨¨¨¨ '.___,-',
¨./¨ ¨|_ /|¨¨¨..Hi,..¨¨¨¨¨|\ _|¨ \
¨/¨ ¨.`|_/¨¨¨....Have ..¨¨¨¨\_| `¨ ¨\
./¨ ¨\ /.¨¨¨¨¨¨¨Nice.¨¨¨¨¨¨¨.\¨ ¨/ ¨ \
/¨ ¨ .'--;_ ¨¨¨¨¨ Day.¨¨¨¨¨¨¨_;--' .¨ ¨.\
¨ ¨ ¨ ¨_\`\¨¨¨¨ | |.¨¨¨¨¨ ¨/` ¨ ¨ ¨ ¨ /_
\¨¨¨¨¨¨/ |`-._¨ | |`¨¨¨¨¨ ¨\¨ ¨.___.-'| \

---------------------------------------------------------------------------------------------------------------------

अबाऊट मी मधे कायकाय?! म्हणजे :-
१. इश्श! माझ्याबद्दल मीच काय सांगु? तुम्हीच ठरवा!
२. मी इतका भारी आहे, की काय सांगु? मी ह्याँव. मी त्याँव.
३. रेडीमेड अबाऊट मी

लोकांनी मग ओरकुटावर फोटोवर फोटो टाकायला सुरुवात केली!! मी इथे जाऊन आलो, तिथला फोटो!
थोडे दिवसात सगळेच शिकले. त्यामुळे 'कुणाच्याही' फोटो अल्बममधे पुढीलप्रमाणे फोटो दिसतातच!

  1. दिल चाहता है मधला सावल्यांचा
  2. उगाचच ... इकडे तिकडे बघताना, जसं की आमचा फोटो काढतच नाहीये कोणी
  3. गॉगल घालुन. इथे चार जणं एकच गॉगल आळीपाळीनं
  4. ताज महाल तळहातावर, मनोरे बोटाच्या चिमटीत
  5. उडी मारताना
  6. पाठमोरा

हा टॉल डार्क हँडसम : -
tall dark handsome.jpg

हा तो डीसीएच : -

फोटोवरुन एक झोल मात्र झाला! 'आयडी थेफ्ट'!! कोणीही कोणाचेही फोटो बघु शकत असल्यानं त्यावर कोण काय प्रोसेस करेल आणि काय दुरुपयोग करेल भरवसा राहिला नाही, आणि ओरकुटचं 'व्युएबल बाय फ्रेंड्स ओन्लि' दिसु लागलं... थोडी तरी सुरक्षितता. सारं कसं आलबेल होऊन गेलं होतं...

उगाचच : -

'आयडी थेफ्ट' : तोंड काळं नको अगदी, म्हणुन हिरवं केलंय...

पण लोकांना कुठं माहित होतं, की शांतपणे पण स्टेडीपणे दुसरंच काही मागुन येत होतं. 'चेहेरे-पुस्तक'
अर्थात 'फेसबुक'. ' असं कोणी येईल, आणि दबक्या पावलांनी येऊन एके दिवशी (ऑगस्ट २०१०) मधे नं. ऑफ युजर्स च्या बाबतीत भारतात सगळ्यात पुढे जाईल? '

नवलाईचे दिवस संपले आणि मग लोकांनी ओरकुटलाही नावं ठेवायला सुरुवात केली. 'ओरकुट-बोरकुट' नावाच्या कम्युनिटीज काढल्या. 'अरे!?' ओरकुटमधे काय बोर व्हायचंय? म्हातारे झालायत काय? नवे मित्र मिळवा!!! ' असं म्हणणं कदाचित जास्तीच होईल पण मला काही बोरकुट वगैरे वाटलं नाही.

तीनेक वर्षांपुर्वी असेल, कोणाचं तरी इमेल आलं ' सी माय फोटोज ऑन फेसबुक - टिंबटिंब.' मला प्रश्न पडला, अरे! हा 'टिंबटिंब' ओरकुटवरही 'टिंबटिंब'गिरी करत असतो सदानकदा. तिथं काय कमी पडते म्हणुन ह्या नवीन 'टिंबटिंब' वर 'टिंबटिंब' टाकले? ओरकुटवर बघीन की...
पण मला तरी काय माहित होतं? ओरकुटवर जे सगळं टिंबटिंबगिरी आहे, तीच सगळी ह्या फेसबुकवर आहे, पण ओरकुट वाल्यांना परवडणार नाहीत अशा 'लग्झुरीज' फेसबुकात होत्या.

  1. स्टेटस
  2. स्टेटस वगैरे कशावरही लोकांचे कमेंट्स
  3. स्टेटस वगैरे काहीही लोकांना 'लाईक' करता येणं
  4. लिंक शेअर करणे
  5. विविध अ‍ॅप्लिकेशन्स

एकुण काय? चाळीतल्या लोकांना फ्लॅटमधे जाण्यासारखं असं माझ्या मनात येतं ह्याबद्दल. कारण लोक तसंच बोलु लागले.
'अरे? अजुन ओरकुटावर?? ' किंवा
'हंहं... मी... हंहं.. आजकाल फेसबुकवर असतो.. युनो... (युनो सायलेंट) ' किंवा
'ओरकुट ना? नाही. हल्ली तिकडे 'कोण' असतं?? ' .....आयला! मी असतो की!!!

म्हणुन म्हणतो, ओरकुट 'आमचं' आहे. आणि थोडं चुकलं-माकलं तरी ते मराठीमधे आहे! हे बघा: -
marathi.jpg

बाकी, त्या फेसबुकावर 'बिनकामाचे धंदे' तरी किती? उगाच ती 'इस्टर एग' शोधायची. 'सकाळी उठ, अंडी शोध. ' नाहीतर मग शेती कर! घरात एवढी कामं पड्लीयेत तेव्हा ऑनलाईन शेती कोण करणार?? पण तरी लोक करतात आणि एकमेकांना मदत मागतात. 'मी आलु-गोबी करायला घेतलाय, पण माझ्या शेतात आलु नाहीये आणि गोबीही. मदत करा... बदल्यात मी वांगी देतो... ' मला तरी ते कळत नाही, आणि कळुन घ्यायची इच्छाही नाही.
बरं, हे अ‍ॅप्लिकेशन्स नुसतं गुपचुप(!) खेळुन काम संपलं असंही नाही. 'तो' काय खेळला, हे माझ्या प्रोफाईलवर कशाला दाखवतात? किंवा "'क्ष' ने तुझं एक गुपित सांगितलं आहे." असं काही माझ्या पानावर का द्यावं? का मी जाऊन आता त्या क्ष चं एखादं गुपित फोडावं का?? (Has answered a question about you!) बर, मी गेलो उतर द्यायला तर माझीच 'पर्सनल इन्फो' अ‍ॅक्सेस होईल म्हणतात. हे काय नाटक?
आणि चुकुन म्हणुन कोणाच्या एखाद्या स्टेटस ला हसुन स्मायली टाकला, की बास!!! नंतर कोणी कोणी त्याच्यावर काय लिहीलं हे मला 'इ-मेल' करुन पाठवतात. 'टु मच इन्फो!!!'

असो. तर मुद्दा काय, तर ह्या फेसबुकावर आता सगळेच येऊ लागलेत. माझी पाचवीतली भाचीही माझ्या आईला 'ए तु फेसबुकवर येत जा ना.. गप्पा मारत जाऊ' वगैरे म्हणते. तसं मी आईबाबांना सक्त ताकिद दिली होती, की हे सगळं तरुण लोकांचं आहे. इथं उगाच कशाला येता? निवांत बसा 'झी-मराठीमधे'.
पण आजकाल तसं काही राहिलेलं दिसत नाही, त्यामुळं उद्या एखाद्यानं अगदी 'टिंबटिंब' जोक मारला, 'एखाद्या पोरीवर अगदीच सरळसरळ लाईन वगैरे मारली' तर कधी मम्मी-पप्पा बघत असतील आणि कधी काय झोल होईल सांगता येत नाही. तर काळजी घ्या!

पण.. हळु हळु ओरकुटही बदललंच.
हे आमचं जुनं ओरकुट.
amachya weli.jpg
* डाव्या कोपर्‍यात ती 'नवी आवृत्ती लवकरच!!!' ची रिक्षा दिसतीये का??
* आता पुढची आवृत्ती येऊ घातलीये. आलीच आहे खरं तर काही महिन्यांपुर्वी, पण मी तिला टाळतोय. कारण त्यात आहे, 'टु मच इन्फो!!!'

'बदल हीच एक स्थिर' गोष्ट आहे म्हणतात! 'तिथं' आहेत, तशीच 'इथं'ही आता अ‍ॅप्लिकेशन्स आली आहेत, ज्यांची काही गरज नाहीये! स्टेट्स आहेत. फोटोवर कमेंट्स आहेत. प्रायव्हसी म्हणता, ती इथेही थोडीफार वाढली आहे. अनोळखी लोकांना किती माहिती दाखवायची हे ठरवु शकतो आपण. पण मग ओरकुट ही गुगलची कंपनी आहे. तेच गुगल, जे आपले सगळे ई-मेल 'बिंदास' 'वाचतात' आणि आपण काहीही करु शकत नाही. त्यामुळं ही प्रायव्हसी रिलेटीव्ह झाली...

एक मात्र खरं, ह्या 'माहिती'मुळं आपण 'फार जास्त कनेक्ट' झालो आहोत, असंही वाटतं.. कधीकधी वाटतं, खरंच इतकी कनेक्टेड रहाण्याची गरज आहे का? एकमेकांना उपलब्ध(!?) नसणंही महत्त्वाचं आहेच की!!

पण जाऊद्या. जास्ती किस नको पाडायला.. शेवटी, ओरकुट काय - फेसबुक काय? संवादाची साधनं आहेत. मैत्री वाढवायची, ती टिकवुन ठेवायची साधनं आहेत. चांगली उपयोगाला आली तर चांगलंच आहे. त्या 'फेसबुकाला' काही नावं नाही ठेवणार, असेल ते भारी. फ्लॅटमधे राहताना लय 'गारगार' वगैरे!
पण संवादासाठी म्हणाल, तर पहिलिवहिली म्हणुन असेल, आपल्याला बाबा आपली ती 'चाळ' प्रिय आहे.
आपली सनसवाडी - आपलं ओरकुट! Happy

गुलमोहर: 

मस्त लिहीलंय Happy

सेल्समनला बाहेर काढणारे बोर्ड्स>>> Happy

मात्र येथे लोक कसे अ‍ॅप्रोच होतात याबद्दल एक बीबी होता. सापडला तर लिन्क देतो.

ऋयाम, मस्त लिहिलेय.
ते शेती, कॅफे न काय्काय, राहिलच की !!
पण हे खरे आहे, माझे अनेक वर्षांपूर्वी बिछडलेले मित्रमैत्रिणी इथे भेटले. (मी ऑर्कुटवर नव्हतो, थेट फेबु वरच आलो.)

>मात्र येथे लोक कसे अ‍ॅप्रोच होतात याबद्दल एक बीबी होता. सापडला तर लिन्क देतो.
>ते शेती, कॅफे न काय्काय, राहिलच की !!

हो. राहिलंच आहे. वेळ कमी पडलाय हो. बेक्कार बिझि झालोय. अपडेट करीनच Happy आभार्स!! Happy

मस्तच............ चेह्रेरेपुस्तक

छान माहिती दिलेय, जुन्या आठवणी ताज्या झाल्या (आजकाल आठवणी देखिल किती लवकर जुन्या होतात ना??) भारतात लोकानां ओरकुट आगोदर 'ईडींयाटाईम्स-डेटिंग' माहिती होत, पण त्यानीं झटपट पैसा कमवण्यासाठी युजर्स कडूनच चार्जेस आकारायला सुरवात केली आणि फ्लॉप-शो करून बसले,

ऋयामा, खरं आहे रे बाबा, ऑर्कुट ते ऑर्कुट च शेवटी, (लाजो च्या भाषेत) थोबाड-पुस्तक असू दे, नाहीतर ट्वीटर नाहीतर अजून काही.. उसकी बात नही किसीमे.

ऑर्कुटला उद्देशून.....

जो बात तुझमे है
थोबाड्-पुस्तक में नही, ट्वीटर में नही Proud (जो बात तुझमे है, तेरी तसवीर मे नही च्या चालीवर)

ओरकुट ना? नाही. हल्ली तिकडे 'कोण' असतं?? ' .....आयला! मी असतो की!!! >>>>>> मी पण, मी पण!

यावर समस मधून एक जोक आला होता........
(दिवार च्या डायलॉग्ज वर आधारित)
देखो आज तुम कहा हो और मै कहा
आज मेरे पास ऑर्कुट है, फेसबुक है, ट्वीटर है, लिंक्ड इन है........ तुम्हारे पास क्या है???
.
.
.
.
मेरे पास 'काम' है!!! Lol

http://www.maayboli.com/hitguj/messages/644/127566.html?1209464401
ही घ्या लिंक.
छान लिहिलंयस!
पण ऋयामा आता ऑरकूट बोरकूट झालंय खरं.. Wink
मुळात ऑरकूट गूगल अकाउंटशी जोडलेलं आहे आणि त्यामुले सेफटी कमी. फेबु तुमच्या इमेल ला जोडायचं की नाही ते तुम्ही ठरवू शकता. याचमुळे मी मुळात फेबुकडे खेचली गेले. Happy

>>>चाळीतल्या लोकांना फ्लॅटमधे जाण्यासारखं असं माझ्या मनात येतं ह्याबद्दल. >>> हे बाकी अगदी खरं.
माझे काही जुने मित्र मैत्रिणी भारताबाहेर गेलेत ते ऑरकुट्वर नाही पण फेबुवर सापड्ले. त्यावेळी सेम असे वाटलेले.
बाकी बिनकामाच्या धंद्याना पर्याय नाही Proud पहिल्यांदा वाटायचे की मी एकटीच करतेय की काय नंतर नेबर लिस्ट बघितली की कळते आपल्या जोडीला बरेच आहेत. Happy

खूपच आवडला लेख Happy
ऋयाम हा लेख फेबुवर शेअर व्हायलाच हवा Happy

हा हा हा.... मी ओर्कुटला जोडून कुर्कुट हा शब्द वापरते...... किंवा चिरकूट! Wink
एक मात्र आहे, की ओर्कुट काय किंवा फेबु.... मला जाम बोअर होतात आजकाल..... दोन्हीकडे खच्चून फ्रेन्डलिस्टा वाहत आहेत, मी अ‍ॅप्समध्ये फारशी इंटरेस्टेड नसल्याने वाढदिवसांच्या शुभेच्छा, खुशखबर, हालहवाल इतपतच उपयोग आहे सध्या! शाळा - कॉलेजातले जेवढे भेटायचे होते ते भेटले.... आता अजून नवं काही येतंय का ह्या प्रतीक्षेत! Wink

आवडला. ऑरकुट प्रचंड बोअर झालंय हे खरं. जावंसं ही वाटत नाही आता. फेसबुकही त्याच मार्गाने जायला लागलंय. पण ह्या सगळ्यातून बाहेर पडलं तर करायचं काय?

ऋयामा, लेख जबरा आवडला Happy

दिल चाहता है मधला सावल्यांचा
उगाचच ... इकडे तिकडे बघताना, जसं की आमचा फोटो काढतच नाहीये कोणी
गॉगल घालुन. इथे चार जणं एकच गॉगल आळीपाळीनं
उडी मारताना
पाठमोरा >>>>>>मी पण काढलेत असे भरपुर फोटो आणि केलेत ऑर्कुटवर अपलोड Lol Wink

किंवा चिरकूट!>>>>मीपण, मीपण Happy

मस्तच

>>>फेसबुक नंतर काय??
-> हे आहे की माबो! हे आहे, म्हणुन 'ते' बोर झालंय.>>>> माबोही कधी कधी बोअर होतं म्हणून बॅकप प्लॅन तयार ठेवावा लागतो. Wink

मस्त रे ऋयाम Happy

मलाही फेसबुक फारसं झेपत नाही, विशेष म्हणजे ते डेटा एक्सेस करणारे अ‍ॅप्लिकेशन्स.

मस्त रे....

>>ते 'आय्-एम-आर-सी' का काय होतं, ते पहिलं चॅट.
वाहवा.... mirc चॅट.... कॉलेजचे दिवस आठवले Happy

धन्यवाद सर्वांना वाचल्याबद्दल Happy
ओरकुटवेडे बरेच दिसतायत! चांगलं वाटलं Happy

धन्यवाद सर्वांना वाचल्याबद्दल Happy

>फेसबुक नंतर काय??
-> हे आहे की माबो! हे आहे, म्हणुन 'ते' बोर झालंय.

>>जो बात तुझमे है, किसी और मे नहीं.......
खरंच! पहिलं ते पहिलं!

>> (लाजो च्या भाषेत) थोबाड-पुस्तक
हे ल-----य भारी! "थोबाड-पुस्तक" Proud

>>मेरे पास 'काम' है!!!
Biggrin

नीधप,
लिंक्सबद्दल आभार Happy ओरकुटची सेफ्टी तेवढी नाहीये बहुतेक... म्हणुन मी सांगितलं बहिणीला... फोटो टाकत जाऊ नकोस... लोकं वाईट असतात... Happy खरंच आहे... Lol

नीलु,
>> जुने मित्र मैत्रिणी भारताबाहेर गेलेत ते ऑरकुट्वर नाही पण फेबुवर सापड्ले.
म्हणुनच म्हटलं ते चाळ आणि फ्लॅट Proud
फेबुवर शेअर म्हणजे ?

अरुंधती,
कुर्कुट पहिल्यांदाच Happy काय लॉजिक्क्क?? चिरकुट अजुन काही मित्र म्हणतात...
फ्रेण्डलिस्टा वाढतायत खर्‍या... फेबुवर माझेच दीडशे फ्रेंड्स आहेत...
हे म्हणजे फारच झालं. ओरकुटावर बोलत पण नाहीत. आणि उगाचच फेबुवर अ‍ॅड केलं.. काय नक्की काय म्हणायचं याला? Uhoh

योगेश२४,
तुमच्यासारखे वीर आम्हाला प्रेरणा देतात रे... मग आम्ही नक्कल करतो Wink

रा. रा. वि. कु,
होहो. आता प्रश्न... आधी ओरकुट की आधी माबो??

मं जो,
>मलाही फेसबुक फारसं झेपत नाही, विशेष म्हणजे ते डेटा एक्सेस करणारे अ‍ॅप्लिकेशन्स.
मला झेपतं हो... Light 1 पण ते डेटा अ‍ॅक्सेस म्हटलं की Angry येतो....

स्वरुप,
हो. एम.आय.आर.सी.!! माझं पण ११वीचं वर्षं होतं...

वत्सला,
लोकांना वाटलं मला खरंच काही पीएचडी मिळाली का काय? जे शक्य नाही! म्हणुन मग काढुन टाकलं. उगाच सारखं लोकांना किती ते "नाही हो, गम्मत करत होतो.." सांगणार?? Light 1
ते डॉक्टर म्हणजे... -> माझ्या प्रोफाईलमधे त्याचं उत्तर आहे... Wink

वाचणार्‍या सर्वांचे फार्स फार्स आभार्स!!! Happy