Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
ऑर्कुट किंवा इतर चॅट वर अनोळखी लोक अस...

Hitguj » My Experience » ऑर्कुट किंवा इतर चॅट वर अनोळखी लोक असे approach होतात... « Previous Next »

  Thread Posts Last Post
Archive through July 03, 200720 07-03-07  6:34 pm
Archive through July 04, 200720 07-04-07  12:23 pm
Archive through July 06, 200720 07-06-07  7:24 pm
Archive through August 13, 200720 08-13-07  3:38 pm
Archive through August 21, 200720 08-21-07  4:31 pm
Archive through August 23, 200720 08-23-07  7:17 pm
Archive through November 03, 200720 11-03-07  11:57 am
Archive through December 04, 200720 12-04-07  7:21 am
Archive through December 11, 200720 12-11-07  7:23 pm

Deepanjali
Wednesday, December 12, 2007 - 4:10 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

छे .. मैत्री तुटायची भीती कसली ?
I guess इथे लोक कुठल्या गंभीर गुन्ह्यां बद्दल नाही तर online chat करताना लोकांना आलेल्या अतिशय personal communication बद्दल लिहित आहेत .
माझ्या friends नी orkut किंवा इतर chat वर इतर कोणाशी किती personal होयचं याच्याशी माझा काय संबंध ?
ज्या व्यक्तीला त्याचे बोलणे आवडत नाही ती बघून घेइल .
मला स्वत : ला फ़रक पडण्या सारखे काही झाले तर गोष्ट वेगळी , otherwise दुसर्‍यांच्या personal life बद्दल मात्र ,
I really don't care!
:-)



Lalu
Wednesday, December 12, 2007 - 2:29 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>मला स्वत : ला फ़रक पडण्या सारखे काही झाले तर
हां, तेच. कशामुळे फरक पडावा ती गोष्ट प्रत्येकासाठी वेगळी असणार हे मान्य आहे. पण तसं झालं तर आपल्या मित्रमैत्रिणीशी स्पष्ट बोलावं, एवढंच म्हणायचं होतं. आणि या बीबीवर बाकी काय लिहिलंय त्याच्याशी मी वर जे लिहिलंय त्याचा काही संबंध नाही. लिहावं वाटलं म्हणून संदर्भ सोडून सोयिस्करपणे तुझ्या पोस्ट मधली वाक्ये उचलली. :-)

Asami
Wednesday, December 12, 2007 - 4:52 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझ्या friends नी orkut किंवा इतर chat वर इतर कोणाशी किती personal होयचं याच्याशी माझा काय संबंध ? >>एकदम बरोबर. परत प्रत्येकचे personal space चे मापदंड वेगळे असतात त्यामूळे सरसकट अमका किंवा अमकी असा आहे हे कोण कशाच्या basis वर ठरवणार ?

P.S. हि फ़क्त DJ च्या note शी संबंधीत टिप्पणी आहे.


Kasturii
Monday, April 28, 2008 - 7:55 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हा बी.बी बघितला आणि रहावले नाही म्हणुन लिहिते. माझे तर लग्न झाले आहे आणि फ़ारसे मित्रमैत्रिणी नाहीत. एकदा याहू चाट वर गेले होते. तिथे यु.के मधील २ मुले भेटली. लग्न झालेली thts wht they told me. पण त्यांचे म्हणणे असे की भारतिया बायका stupid आहेत काहिही विचारतात त्यांचा हा सुंदर विचार ऐकुन मी काढता पाय घेतला. आणि एक अतिशय किळासवाणा अनुभव सांगते. जर इथे असे लिहिणे अनुचित वाटले तर mod हि पोस्ट काढुन टाकावी. एक असाच so called decent guy भेटला होता. आम्हाला बोलुन एक ५-१० मिनिटे ज़ाली असतील नसतील त्याने विचारले की माझा फोटो बघणार का? आता त्याच्या बोलण्यावरुन तो अतिशय सभ्य वाटत होता. मी हो म्हटले.आणि वेब कम चे invitation स्विकारले. आणि मला अतिशय धक्का बसला कारण he was showing his private there. !! असे हिडिस वाटले की बास तेव्हा पासुन no cam, no pic !!!

Dakshina
Monday, April 28, 2008 - 8:58 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कस्तूरी.... जनरली याहू चॅटवर... असले 'आंबटशौकिन' च जास्तीचे असतात. मुलंच काय? पण मुली ही असतात. मुलांचं तर मला ऐकून वगैरे ठावूक होतं पण एकदा चुकून मी याहूचॅट वर गेले तर तिकडे सेम असा प्रकार मझ्याबरोबर मुलीने केला होता..... मी जन्मात कधी चॅटरूम मध्ये गेले नाही.

Deepanjali
Monday, April 28, 2008 - 9:10 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पण अनोळखी लोकांशी chat ला सुरवात च कशाला करायची मुळात ??
मग हे असे अनुभव येतात म्हणण्याला काय अर्थ आहे !


Zakki
Monday, April 28, 2008 - 1:23 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पण अनोळखी लोकांशी chat ला सुरवात च कशाला करायची मुळात

लहानपणी नि तरुणपणी सुद्धा, एक प्रचंड उत्सुकता असते सगळ्या गोष्टींची. असे सगळे अनुभव लवकर येऊन गेले की मग पुढे कुणाशी मैत्री करायची, आपण काय करणे चांगले आहे, हे ठरवता येते, डोके ठिकाणावर ठेवले तर!!

Uday123
Monday, April 28, 2008 - 8:34 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आम्हाला बोलुन एक ५-१० मिनिटे ज़ाली असतील नसतील त्याने विचारले की माझा फोटो बघणार का? आता त्याच्या बोलण्यावरुन तो अतिशय सभ्य वाटत होता.
--- सभ्य पणाचा 'बुरखा' पांघरुन बरीच मंडळी समाजात वावरत असतात, ओळखणे कठीणच असते, काही ठिकाणि तर दिवस-महीने लागतात. पण ५-१० मिनिटांच्या ओळखीमधेच जर तो फ़ोटो दाखवायच्या गप्पा करतो आहे, त्याचवेळी कुठेतरी शंका नावाची पाल चुकचुकायला हवी होती. 'आपली भेट तर झाली आहे आता फ़ोटो मधे काय वेगळे दिसणार आहात कां? असुद्या तुम्हालाच पुढे ते कामात येतील असे म्हणुन सुटायचें. तुमचे संपर्क देण्यापेक्षा तुम्हीच समोरच्या व्यक्तिचे विचारा, म्हणजे तुम्हाला टाळायचे असल्यास पर्याय रहातो.


Ajjuka
Tuesday, April 29, 2008 - 2:58 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>पण अनोळखी लोकांशी chat ला सुरवात च कशाला करायची मुळात ??<<

मग आपण मायबोलीवरतरी एवढा मोठा परिवार जमवू शकलो असतो का? आपणही सगळे एकमेकाला अनोळखी होतोच की.

Dakshina
Tuesday, April 29, 2008 - 4:28 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मग आपण मायबोलीवरतरी एवढा मोठा परिवार जमवू शकलो असतो का?
आपणही सगळे एकमेकाला अनोळखी होतोच की. >>>>
यात खूप तथ्य आहे.

Princess
Tuesday, April 29, 2008 - 4:32 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दीपांजलीला अनुमोदन. अनोळखी लोकांशी चॅट करायचीच कशाला... अगदी बरोबर.
अज्जुका, आपण याहू चॅट रुमची मायबोलीशी तुलना करुच शकत नाहीत. मायबोलीवर मलातरी नाही वाटत की कुणी अनोळखी असतांना चॅट करत असेल. इथे आधी पब्लिक फोरम वर ओळखी होतात. आणि नंतर आवडी निवडी जुळल्यात तर एकमेकांचे एमेल्स दिले जातात. कुणाची कथा कविता आवडली किंवा मग आपल्या गावाच्या बीबीवर कुठलातरी ओळखीचा धागा मिळाला किंवा काही दिवस बीबीवर बोलुन झाले की मगच चॅटिंग होते.

खरडवहीची सुविधा आत्ता दिलीय पण याधी तर आपण सगळे मायबोलीवरच ओळखी करुन घेत होतो ना? आणि ती एक गोष्ट जुन्या मायबोलीवर मला तरी खुप आवडायची/ आवडते.

मायबोलीवर आल्यावर मी सुरुवातीला सगळंच वेड्यासारख वाचत सुटले मग तुझे लिखाण आवडल म्हणुन, जयु, श्यामली, लोपाचे लिखाण आवडले म्हणुन, वैभव आणि निनावीच्या कविता आवडल्यात म्हणुन तुमच्या सर्वांशी ओळख करुन घेतली. मेल्स केल्यात.

सिंहगडावर चक्कर मारल्यामुळे पी एसजी, श्र आणि अजुनही खुप मित्र मैत्रिणी जमवता आलेत.

साधारणपणे चांगले वाईटाचा अंदाज आल्यानंतर मग मैत्री करता येणे हाच मायबोलीचा खरा फायदा आहे. maayboli rocks!!! :-)

मी पहिली कथा इथेच लिहिली त्यानंतर रोमातल्या काही मायबोलीकरांनी मला मेल केल्यात. त्यात एक मला माझ्या गावातला एक कधीही न बघितलेला मुलगाही भेटला. नंतर ओळख झाली, मैत्री झाली. आणि आमच्या आई वडिलांची सुद्धा ओळख झाली.


Princess
Tuesday, April 29, 2008 - 4:36 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे हो एक लिहायचे राहिलेच... हे माझे वैयक्तिक मत आहे. यात तुला किंवा इतर कोणालाही दुखावण्याचा उद्देश नाही. तसे होत असल्यास मा.बु.दो.स. म. मा.क.
(माझ्या बुद्धीचा दोष समजुन मला माफ करावे)
मी तुझ्या लिखाणाची फॅन होती, आहे आणि राहणार. पण आपली मत वेगवेगळी असु शकतात ना :-)


Deepanjali
Tuesday, April 29, 2008 - 4:37 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मायबोली ही public intereactions होणारी community आहे , तिथे पब्लिक मधे बोलणे किंवा views मांडणे आणि Yahoo-orkut सारख्या private chat वर कोणी तरी add केलं म्हणून ओळख नसताना एखाद्याशी chat करायला सुरवात करणे यात फ़रक आहे .


Ajjuka
Tuesday, April 29, 2008 - 10:20 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तांत्रिक फरक आहेच पण तरीही अनोळखी व्यक्तीशी संवाद साधणे हे आलेच की.
आणि माझ्या माहितीप्रमाणे इथे १ - २ वाक्यांपुरतीच ओळख असलेले अनेक जण याहूवरच चॅट करायचे जीटॉक येण्यापूर्वी.
चाळणी असायला हवी, तारतम्य असायला हवे हे ठीक पण हे करूच नये, ते करूच नये याला काही अर्थ नाही असे माझे मत. जे जगातल्या सगळ्यांनाच चुकीचे वाटू शकते. पण माझी बुद्धी अशीच चालते.


चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators