Submitted by अज्ञात on 26 August, 2010 - 00:48
एकदा वेडी अवस्था बोडक्या खडकापरी
तीर सुकलेले; जळावर अंबराच्या झालरी
शांतता निर्वस्त्र होती वलयहीन सरोवरी
पर्ण पाचोळ्यात दडलेला पवन कोठेतरी
मनगढी एकांत; गुदमर कोण आक्रंदे उरी
चंद्र ओसांडे शशीधारा; मनोहर बासरी
पंख कल्पांचे वयाला कंकणे फुलपाखरी
नितळ अवकाशात अवचित मेघ; ओघळती सरी
शब्द झाले चांदण्या उल्का प्रपाते वैखरी
वादळी वार्यात घोंघावून गेली भिंगरी
सार हे; होते नि नव्हते एक ती होती दरी
आंसवांची माणिके स्वप्नांतली हळवी परी
........................अज्ञात
गुलमोहर:
शेअर करा
वाह...!!!
वाह...!!!:)
सह्हीच! शब्द झाले चांदण्या
सह्हीच!
शब्द झाले चांदण्या उल्का प्रपाते वैखरी
वादळी वार्यात घोंघावून गेली भिंगरी
सार हे; होते नि नव्हते एक ती होती दरी
आंसवांची माणिके स्वप्नांतली हळवी परी>>> हे तर खूप भावलं!
बहूत खूब...!!
बहूत खूब...!!
गुरुजी.... धन्स....! अप्रतिम
गुरुजी.... धन्स....!
अप्रतिम ... हे सांगणे नलगे
(No subject)
वाsssssssssssssssssssssssssss
वाssssssssssssssssssssssssssssssह!!!!!!!!!!!!!!!
हळवी .... पंख कल्पांचे वयाला
हळवी ....
पंख कल्पांचे वयाला कंकणे फुलपाखरी
नितळ अवकाशात अवचित मेघ; ओघळती सरी
शब्द झाले चांदण्या उल्का प्रपाते वैखरी
वादळी वार्यात घोंघावून गेली भिंगरी----------------- क्या बात !!!
ग्रेट!
ग्रेट!
सुंदरच्,शब्द झाले चांद्ण्या
सुंदरच्,शब्द झाले चांद्ण्या उल्का प्रपाते वैखरी ...खरच छान जमले आहे.पहिल्या तीन शब्दातील हळुवारपणा व नंतरच्या शब्दतील राकटपणा एकदम जमला आहे.
समजली नाही.
समजली नाही.
सुंदरच आहे. बहुत बढिया
सुंदरच आहे. बहुत बढिया