निसर्गचित्रे

Posted
13 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
13 वर्ष ago

यंदाच्या उन्हाळ्यात अमेरिकेच्या दोन टोकांना असलेल्या दोन निसर्गरम्य राज्यांना भेट देण्याचा योग आला. तिथली ही काही निसर्गचित्रं.

Maui (Hawaii) - हालेकाला पर्वतशिखरावरून दिसणारा सूर्योदय
4. Maui - sunrise.jpg

Maui (Hawaii) - हालेकाला पर्वतशिखरावरून परत खाली उतरायला लागतानाचे दृश्य.
6. Maui - Clouds.jpg

Maui (Hawaii) - समुद्र
7. Maui - Wialia beach.jpg

Maui (Hawaii) - आभाळात रंगलेले नाट्य
8. Maui - beach.jpg

Maui (Hawaii) - Hana: वाटतंय की नाही अगदी कोकण?
5. Maui - Hana.jpg

आता अमेरिकेचे दुसरे टोक - मेन (Maine) - Acadia National Park
कॅडिलॅक पर्वतशिखरावरून -
2. Cadillac.jpg

Jordan Pond
3. Jordan pond.jpg

विषय: 
शब्दखुणा: 

खासच...

धन्यवाद मंडळी!

दुसर्‍या प्रकाशचित्रात flare टाळायला हवा होता हे खरंच. पण वेळ आणि संधी नेहमी सांगून येत नाही आणि आपल्याला हवा तितका मुक्कामही करत नाही. Happy

त्या प्रकाशचित्राबद्दल सांगायचं तर - ते जवळपास दहा हजार फुटावर असलेल्या शिखरावरून परत खाली येताना काढलेलं आहे. चित्रात रस्ता आहे. ढग आहेत. पाणी नाहीये. (ढग कमी असते तर ते ही दिसलं असतं). रस्त्याला वळण असं होतं की वाटावं हा रस्ता त्या समोरच्या ढगात जाऊन संपतो आणि मग आपण ढगांमधून तरंगत जायचं. इथे दिसतंय त्यापेक्षाही प्रत्यक्षात बघताना ते खूपच महान होतं.

इथे ढग खाली आणि आपण वर असतो. सूर्योदय पाहण्यासाठी पर्यटकांची खूप गर्दी असते. कधी Maui ला जाणार असाल तर इथे जाणं आवश्यक आहे. पण हो .... हे ठिकाण हवाईमध्ये असलं तरी चांगलं उबदार जॅकेट, हातमोजे, कानटोपी वगैरे घेऊन जा. या शिखरावर पहाटेच्या वेळी तापमान शून्याच्या जवळपास असतं.

मोठ्या आकारात पहायचे असतील तर इथे पहा - http://www.flickr.com/photos/paragkan
(शोधावे लागतील Happy )

दुसर्‍या प्रकाशचित्रात flare टाळायला हवा होता हे खरंच. पण वेळ आणि संधी नेहमी सांगून येत नाही आणि आपल्याला हवा तितका मुक्कामही करत नाही

>> हे फोटोशॉप मध्ये fix करता येईल का?

परागकण,
जबरी फोटो, दुसर्‍या फोटो बद्दल खूप कुतुहल आहे मला.
त्यात रस्त्यासारखं दिसतंय ती धावपट्टी आहे का? आणि अचानकच ढग दिसतायंत पुढे मला एकदम धस्स झालं... Happy
पण फोटो प्रचंड म्हणजे प्रचंड आवडले..

सहिच Happy

Pages