उन्हाळ्याची सुट्टी

Submitted by प्रीति on 24 August, 2010 - 09:19

माझं लहान पण भरपुर मजेत गेलयं. खास करुन उन्हाळ्याच्या सुट्ट्या Happy
जसे परीक्षेचे वेध लागयचे तसेच आजोळी जायचे पण Happy
परीक्षा झाली की दुसरे दिवशी आजोळ. जाताना बाबांना एकटं सोडुन जाताना वाईट वाटायचं.
जायला पुर्ण एक रात्र लागायची पण मजा वाटायची.

खुप सारी मामे आणि मावस भावंडं जमलेली असायची, धमाल एकदम.
उन्हाळ्याचा कार्यक्रम पुर्ण ठरलेला. उशीरा उठायचं, चहा/दुधासोबत ब्रेड खायचा. खालच्या आणि वरच्या स्लाईससाठी खुप भांडणं व्हायची, मग आळीपाळीने तो ब्रेड सगळ्यांना मिळायचा.
मग मस्त बंबाच्या पाण्याने अंघोळ करायची आणि खेळतं बसायचं. थोड्याच वेळात जेवायचं तयार असायचं, मस्त आंब्याचा रस, भरड भाजी, गरम पोळी Happy

मग नंबर यायचा पत्त्यांचा. तुफ़ान पत्ते खेळणं व्हायचं. पत्ते खेळताना मधेच कुल्फ़ीवाला किंवा पेप्सिकोला वाल्याची आरोळी ऎकु यायची आणि सगळी मुलं पत्ते सोडुन तिकडे धुम ठोकायची.

संध्याकाळी तिखट मिठाचे कुरकुरीत चुरमुरे किंवा आजोबा गावाबाहेर फ़िरायला घेऊन जायचे आणि नरडे (फ़िंगर्स) घेऊन द्यायचे.
रात्री जेऊन गच्चीवर झोपायला जायचं. भरपुर गप्पा व्हायच्या. आकाशाकडे बघत कधी झोप लागायची, कधी कळायचं पण नाही. मधे कधी रात्री पाऊस आला तरी तोंडावर पांघरुण घेऊन झोपायचं. अगदीच जोरात यायला लागला की मग झोपेतच पळत आत जायचं.

कधी कधी बैलगाडीतुन शेतात जायचो. तिथल्या ओढ्यात पाणी असलं तर खेळायचो. कैर्‍या तोडणे, मस्त खाणे पिणे व्हायचे.

आंबे टोपलीत ठेवलेले असायचे, कधी पाहिजे तेव्हा कितीही खा. जांभळं, सिताफ़ळं पण मनसोक्त खायचो.

मोठ्या मामाकडे शहरात गेलो की त्याच्या घरी फ़्रिजमधला बर्फ़ घेऊन खाणे, टि.व्ही बघणे उद्योग असायचे.
आईस्किम खाणे, पिक्चर बघायला जाणे ह्या आमच्यासाठी खुप मोठ्या गोष्टी असायच्या.

रिझल्ट लागल्याचं बाबांचं पत्र यायचं.

दोन महिने कसे गेले कळायचच नाही. शाळा सुरु होणार असायची आणि सगळ्यांची परतिची वेळ यायची. रडारडा होऊन निरोप समारंभ व्हायचा.

पुर्ण वर्षासाठी ही दोन महिन्यांची शिदोरी पुरे असायची ...........

आत्ता मला हे का आठवलं असं वाटेल....तर ह्याचं कारण म्हणजे राम!!

रामला मागच्या महिन्यात उन्हाळ्याची सुट्टी लागली. जसं त्याला कळलं की सुट्टी लागणारे, त्यानी आजी, आबा येणारेत का विचारलं. आमच्या काही मनातही हा प्रश्न आला नव्हता. मी त्याला नाही सांगितलं. तो म्हणे, "का नाही?" मलाही वाटलं, खरच का नाही? मी श्री सोबत बोलून आजी, आबां बरोबर बोलायचं ठरवलं. माझ्या मनात हा कधी विचार आलाच नाही की त्याला पण उन्हाळ्याची सुट्टी पाहिजे. आता कदाचित राम मोठा झालाय आणि त्यालाही ब्रेक पाहिजे असतो. आजी, आबांसोबत बोलल्यावर कळलं की त्यांना जमणार नव्हतं, मग आम्ही रामला समर कॅंपला घातलं. तो बिल्कुल खुष नव्हता. रोज उठून तेच डिस्कशन, मी घरी का नाही राहु शकत, आजी, आबा का नाही येत. मला वाटायचं, काय मी ह्याच्यावर अत्याचार करतेय. रामाच्या बाबतीत खुप वाईट वाटत होता. आई, बाबाही बिझी आणि लेकराला सुट्टीची मजा पण घेता येत नाहीए. खुपच गिल्टी फिलिंग पण येत होतं, काय करावं कळत नव्हतं. खरच मी किती नशीबवान आहे, मला माझी प्रत्येक सुट्टी मजा करायला मिळाली. तेवढ्यात आईचं यायचं पक्क झालं आणि एकदम आम्ही रिलाक्स झालो. रामला तर जेव्हा कळलं तेव्हा मला तो म्हणे , "Mama, I am thousand happy" आणि एकदम मला भरुन आलं. आजी आलीए आणि राम छान मजा करतोय, एकदम खुष आहे. एकदम हलकं हलकं वाटतयं.

गुलमोहर: 

मस्तच... पुढच्या पानावर लिहित असताना अचानक वारा आल्यावर पाने उलगडून रम्य भुतकाळात गेल्या सारखं वाटलं अगदी.

>>तिखट मिठाचे कुरकुरीत चुरमुरे

आजच चुरमुरे आणून करेन Happy धन्स प्रीति. पुन्हा भूतकाळात जायची सोय असती तर काय हवं होतं आणखी? खरं तर हे असे आजोळावरचे लेख माबोवर एकत्र करून ठेवले पाहिजेत कुठेतरी. निदान भविष्यात वाचायची तरी सोय राहील.