सिगारेट : वैधानीक नाही फक्त इशारा

Submitted by नितीनचंद्र on 23 August, 2010 - 10:01

मयुरेश, मित्रा हे विडंबन नक्की नाही तुझ्या विचारांचे
नक्कल करणे आहे तुझ्या हुकमी हुंकाराचे
------------------------------------------------

कसा अडकलो कोण जाणे
तिच्या सावळ्या केशपाशात
आत आत गुंतत गेलो
घुसमटत घुसमट्त अजाणवयात

एक दिवस माझे मलाच कळले
जिच्या संगतीत मी घालवला एकेक क्षण
दु:खाचा वा वेदनेचा
माझा भास होता
ती पण जळते माझ्या बरोबर, दु:खाच्या क्षणी
सोडते सुस्कारा आपल्या खोल वेदनेचा

उशीरा कळले ती आहे अभिसारीका
कोणाच्याही हाती जाणारी
अग्नीच्या साक्षीने
आभास निर्माण करणारी
साहचर्याचा, सहवेदनेचा

ह्रदयापाशी नेली म्हणजे
क्षणभरासाठी मती गुंग करणारी
आपल्या काळ्या केशकलपात
मागे आठवण ठेवणारी
पुन्हा भेटण्याची हुर हुर लावणारी

तीला तिचेच दु:ख दुर करता येत नाही
ती काय आपले दु:ख समजणार ?
ती फक्त जळणार आणि जाळणार जवळ घेणार्‍याला
लुबाडणार आणि
खात्रीन खिसे भरणार त्या मावशीचे
गोंडस वैधानीक इशारा देणार्‍या

गुलमोहर: 

!!!

झकास नितीनदा....

<<उशीरा कळले ती आहे अभिसारीका
कोणाच्याही हाती जाणारी
अग्नीच्या साक्षीने
आभास निर्माण करणारी
साहचर्याचा, सहवेदनेचा>>> हे तर खासच ! 77.gif

प्रचंड आवडली Happy

तीला तिचेच दु:ख दुर करता येत नाही
ती काय आपले दु:ख समजणार ?
ती फक्त जळणार आणि जाळणार जवळ घेणार्‍याला
लुबाडणार आणि
खात्रीन खिसे भरणार त्या मावशीचे
गोंडस वैधानीक इशारा देणार्‍या>>>> मस्त मस्त मस्त!!!!