टाकाऊतून टिकाऊ स्पर्धा नियम

Submitted by संयोजक on 22 August, 2010 - 06:27

TakaooTunTikaoo_Poster_2010.jpg

ग्लोबल वॉर्मिंग, रिसायकल - रिड्युस - रियुज, कॉम्पोस्टींग हे शब्द सतत कानावर पडतात. आपण नक्की काय करावे हे समजत नाही. काहीतरी करावेसे मात्र वाटते. नुसते हातावर हात ठेवून बसून चालणार नाही असे वाटते. गणेशोत्सवाच्या निमित्ताने आपण एक नवीन संकल्प सोडूया की जे जे शक्य आहे ते ते सर्व मी कोणत्या ना कोणत्या प्रकारे पुनःपुन्हा वापरणार. म्हणूनच -

गेल्या ४ वर्षातल्या कित्येक ड्रेसेसच्या बाह्या पिशवीत पडून आहेत?
गेल्या कित्येक वर्षांत आलेल्या पत्रिका, भेटकार्डं साठवून ठेवलीत?
जॅम, सॉसच्या बाटल्या साठवल्या आहेत?
रिमॉडेलिंगच्या वेळच्या टाईल्स शिल्लक आहेत?
जुने कपडे वापरावेसे वाटत नाहीत आणि टाकून द्यावेसे वाटत नाहीत?

काय करावे सुचतेय का? बघुया कल्पकतेने आपण हे सामान वापरून एखादी वस्तू बनवता येते का? अरे वा! काहीतरी सुचले? मग चला तर मायबोलीच्या 'टाकाऊतून टिकाऊ' या स्पर्धेमध्ये भाग घेऊयात!!!!

'टाकाऊतून टिकाऊ' या स्पर्धेसाठी नियम -
१. ही स्पर्धा फक्त मायबोलीकरांसाठी आहे.
२. या स्पर्धेसाठी तयार केलेल्या वस्तू स्वतः तयार केलेल्या असाव्यात.
३. तयार झालेल्या कलाकृतीचा फोटो येथे देणे बंधनकारक आहे.
४. कलाकृतीसाठी लागणार्‍या साहित्यात अर्ध्याहून अधिक वस्तू वापरल्या नसत्या तर टाकून दिल्या असत्या अशा प्रकारच्या असाव्यात.
५. टाकाऊ वस्तू कशी वापरली गेली हे लिहिणे आवश्यक आहे.
६. तयार झालेली कलाकृती वापरली जाईल, कोणाला भेट देता येईल अशी असावी.
७. या स्पर्धेला विषयाचे बंधन नाही. एखाद्या पदार्थापासून ते बागेतल्या कचर्‍याचे व्यवस्थापन ते घरातल्या बाटल्यांना रंगवून पुनर्वापरापर्यंत कोणतीही कलाकृती यामध्ये समाविष्ट करता येईल.
८. शक्य असेल तर फोटोसहित टप्प्या-टप्प्याने वस्तू कशी तयार केली (फोटो दिलेत तर उत्तम), हे लिहीले तर ज्यांना तुमची कलाकृती तयार करावी असे वाटेल त्यांना समजण्यासाठी सोपे पडेल.
९. या स्पर्धेचा निकाल परीक्षकांमार्फत लावला जाईल आणि तो बंधनकारक असेल.

प्रवेशिका कशा पाठवाल?
१. स्पर्धेसाठी प्रवेशिका पाठवताना ती गणेशोत्सवाच्या संयोजकांना sanyojak@maayboli.com ह्या पत्त्यावर इ-मेल करून पाठवणे अपेक्षित आहे.
२. तसेच इ-मेल पाठवताना Taakaautun Tikaau असे सब्जेक्ट मधे लिहावे. (एक नम्र विनंती : स्पेलिंगमधल्या चुका टाळण्यासाठी इथूनच कॉपी-पेस्ट करावे.)
३. संयोजकांना इ-मेल पाठवताना, छायाचित्राच्या फाईलचे आकारमान हे २०० kb पेक्षा जास्त नसावे.
४. स्पर्धेसाठी छायाचित्र पाठवताना इ-मेल मधे छायाचित्राची प्रत जोडावी. त्याच बरोबर मायबोली आयडी लिहावा.
५. प्रवेशिकेमध्ये ४ पेक्षा जास्त छायाचित्रं नसावीत. प्रत्येक पायरीचे छायाचित्र अपेक्षित नाही, परंतू जोडत असलेले छायाचित्र कोणत्या पायरीचे (स्टेप) आहे हे त्या पायरीचा क्रमांक देऊन व्यवस्थित नमूद केलेले असावे. महत्त्वाच्या व आवश्यक अशाच पायरीचे छायाचित्र जोडावे.
६. प्रवेशिका संयोजकांना इ-मेल केल्यानंतर ती प्रवेशिका स्पर्धेच्या धाग्यावर प्रकाशित होण्यास २४ तासाची मुदत द्यावी. २४ तासानंतरही तुमची प्रवेशिका दिसत नसेल तर संयोजकांना इ-मेल करावी.

प्रवेशिका स्वीकारण्यास गणेश चतुर्थीला सुरूवात होईल व अनंत चतुर्दशीपर्यंत स्वीकारल्या जातील.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

संयोजक,
मेल, मायबोलीच्या संपर्कातुन करायचा कि स्वतःच्या इमेलमधुन? (म्हण्जे रेडिफ वगैरे) कारण इथल्या संपर्कातुन मेल केली तर फोटो जोडायला काही ऑप्शन नाहिये. आणि रेडिफ मधुन मेल केली तर मराठी फाँट नाहि. तर मिंग्लीश मधे लिहीलं तर चलेल का?

धनुडी,

तुम्ही इथे मराठीत तुमचा मेसेज लिहा. तो रेडीफ किंवा अन्य कोणत्याही इमेलमधे कॉपी करुन त्या इमेलला फोटो जोडा आणि sanyojak@maayboli.com या इमेल आयडीला पाठवुन द्या.

संयोजक,

वर प्रवेशिका कश्या पाठवाल मधे लिहीलय की ४ पेक्षा जास्त छायाचित्र नसावित, परंतु जर जास्त छायाचित्र वर्ड डॉक मधे मर्ज करुन २००केबी पेक्षा कमी साइज मधे टाकली तर चालेल का?

.

धन्यवाद संयोजक.

माझ्या प्रवेशिके मधे प्रचि ३ आणि ४ वर खाली झालेले आहेत. ते नीट कराल का प्लिज

नमस्कार संयोजक,

माझी दुसरी प्रवेशिका पाठवली आहे.

२ इमेल्स आहेत. पहिली प्रवेशिका आणि अजुन एक.

२ री इमेल कृपया चेक कराल का प्रवेशिका प्रकाशित करायचा आधी Happy

धन्यवाद Happy

संयोजक,
दुसरी प्रवेशिका आज दुपारी ४ पर्यन्त पाठवते , चालेल ना ?
तयार आहे पण फिनिशिंग कोट वाळला नाहीये अजुन.

संयोजक,
अजुन एक फोटो अ‍ॅड करता येइल का कालच्या एंट्री मधे ?
जर चालत असेल तर इमेज इमेल केली आहे.

Pages