बालपणाचे सखे

Submitted by आशिष पवार on 22 August, 2010 - 01:24

कोकिळा ताईंचा
मंजुळ आवाज
कुहु कुहु करते
जणू वाजे पखवाज

ससेभाउ सारखा
तुरु तुरु पळतो
पांढरा शुभ्र ढगांचा
कोट घालुन फिरतो

वाघाची मावशी
आमची मनी माउ
उंदीरच तिचा
आवडता खाउ

आमचा मोती
राखी घर -दार
चोरटे हि त्याला
घाबरती फार

आमचा मिठुदादा
मिठु मिठु बोलतो
हिरवी तिखट मिरची
आवडीने खातो

गुलमोहर: