स्तुपांची मंदिरं- भाग ४ (तिरुपती बालाजी-१)

Submitted by मधुकर on 18 August, 2010 - 14:36

परंपरागत कथा:

पहाडीच्या नावा संबंधीत दंतकथा:
काही पुराणांत तिरुमलाईचा उल्लेख आहे. त्यांत प्रमुख आहे वराह पुराण आणी भविष्योत्तर पुराण. संक्षेपात या कथा अशा आहेत.
पहाडीची पवित्रता सांगणा-या दंतकथा आणि विष्णुची वैकुंठवासाची दन्तकथा या दोन्ही भिन्न आहेत. (संदर्भ: राघवाचार्य: हिस्ट्रि ऒफ तिरुपती, तिरुमलाई तिरुपती देवस्थानम, खंड:२, ३०, सन १९५३)
या कथांमध्ये पहाडिला विभीन्न नावांनी ओळखले जाते याअचे कारणे सांगितली आहेत. ती नांवे आहेत वृषभाचल, अन्जनाचल, शेषाचल, वेंकटाचल इ. हि गोष्ट तर स्पष्ट आहे कि, वेंकटाचल हे नांव पुर्ववर्ती नांव वेंगाडम वरुन ठेवल्या गेले. सर्व महान कथांचा आग्र आहे कि, हे नाव यासाठी प्रयुक्त झाले कि एक ब्राह्मणाला एक बदनाम, चांडाळ जातीच्या नारिसोबत राहिल्याने जे पाप झाले, ते पाप वेंकटेश्वराचे दर्शन केल्याने जळून नष्ट झाले. परंतु महान संस्कृत विद्वान, शब्द व्युत्पतीत निपुन पंडीत सुद्धा आज पर्यंत “वेंकट” शब्दावरुन असा अर्थ काढला जाऊ शकतो हे सांगण्यास सफल झाले नाहीत. (संदर्भ: राघवाचार्य, ३०)

मुर्ती स्वयंभू आहे अशी दंत कथा:
श्री सितापती यांचे कथन आहे कि, भगवंताच्या क्रिडाद्री किंवा शेषाचलम वर स्थित स्वामी पुष्करणी वर दिव्य मंदिरात भगवान श्रीनिवास स्वयं प्रकट झाले, तसेच हे क्रिडाद्रि किंवा शेषाचलम भगवंताचे निवास श्री वैकुंठम मधुन खास धरती वर आणले गेले. भगवंताचे हे प्रकटीकरण श्वेत वराह युगात झाले होते. या युगात भगवंताची पुजा सर्व प्रथम करनारे ब्रह्मा स्वत: होते. भगवंत तेंव्हा मुर्ती बनले आणि कलियुगात अर्चावतार धारण केला. हि मुर्ती एक मुंग्याच्या वारुळात एका तोंडमान राजाला एका रंगदास च्या सहाय्यतेने मिळाली आणि कृषी वैखानस याने सर्वप्रथम त्याची पुजा केली. (संदर्भ: सितापती: श्री वेंकटेश्वर,१५,द्वितीय आवृत्ती १९७२)

भृग कृषीने विष्णुच्या छातीवर लाथ मारली:
भगवान धरती वर का आले? (पी. एम. मुन्नीस्वामी चेट्टी च्या माहात्म्यावरुन संक्षीप्त केली गेलेली कथा काही या प्रकारे आहे.
यज्ञफलासाठी योग्य अधिकारी देवतेच्या शोधात भृग कृषी ब्रह्मा आणि शिव दोघांच्या निवासस्थानी गेले असता त्याना दोघेही अयोग्य आढळले. नंतर ते विष्णूकडे गेले तिथेही तेच, मग मुनिवराने भगवंताच्या छातीत लाथ मारली. ज्यावर कृषीला शिक्षा करण्या ऐवजी विषूने विचारले कि, “द्विजांत सर्वश्रेष्ठ असलेल्या कृषीच्या पायाला ईजा तर पोहोचली नाही ना?” त्यावरुन मुनीने विष्णुला यज्ञफल मिळविण्याला सुयोग्य देवता जाहिर केले. परंतु लक्ष्मीला राग येतो व त्या धरतीवर निघुन येतात. भगवंत बायकोला शोधत शोधत पवित्र पुष्करणीच्या किना-यावर चिंचेच्या झाडाय्च एक मुंग्याच्या वारुळात स्थानापन्न झाले. एक हजार वर्षानी चोल राजांच्या शासनकाळात ब्रह्मा आणि रुद्र हे गाय आणी वासरु या रुपात भगवंतालाल दुध पाजण्यासाठी आले. एका गुराख्याने गायीकडे काठी फेकुन मारल्याने भगवंताला कपाळावर जखम झाली. यामुळे चोल राजाला शाप मिळाला. तरी सुद्धा शाप मुक्तीचे आश्वासन मिळाले कि, तो आकाशराजा च्या रुपात जन्म घेऊन आपल्या मुलीचा विवाह भगवंताशी करेल आणि रत्नजडीत सुवर्णमुकुट भेट म्हणुन भगवंताला अर्पण करेल.

नंतर जेंव्हा आकाशराजा तोंडमंडलम वर शासन करित होता तेंव्हा त्याला शेतात नांगरताना एक कमळ मिळाले, त्या कमळात एक बालिका होती, त्या मुलिचे नाव पद्मावती ठेवण्यात आले. वयात आल्यावर एके दिवशी पदमावतीची भगवंताशी गाठ पडते व ते लग्नाची मागणी घालतात. त्यांची आई वकुलादेवीच्या मध्यस्थीने विवाह ठरतो. करविरपुरम ( कोल्हापुर का ?) येथे असलेल्या लक्ष्मीला या ठरलेल्या लग्नाची माहिती मिळताच त्या सुद्धा येतात. पदमावती इतर कुणी नसुन वेदवतीच आहे. जिला रावण सितेच्या ऐवजी घेऊन गेला होता, हि माहिती मिळाल्याने लक्ष्मी खुष होते. एक हजार वर्षात परत करण्याच्या कराराने कुबेराकडुन कर्ज घेऊन मोठ्या धुमधामीने पदमावतीचे भगवंताशी लग्न होते. या लग्नात आकाशराजाने मुकुट भेट दिला आणि देवतांनी वधुवरांवर पुष्पवृष्टी केली.

नंतर काहि वर्षानी आकाशराजा मरण पावला. त्याचा पुत्र वसुदान हा गादिवर आला. परंतु आपले काका राजा तोंडमान याचा योग्य तो सन्मान केला नाही. राज्याच्या वाटणिवरुन दोघांत युद्ध झाले. श्रीनिवासाने आपले शंख आणि चक्र तोंडमान राजाला दिले व स्वत: वसुदानाच्या बाजुने सामिल झाले. भयानक युद्ध होऊन एके समयी चक्र स्वंय भगवंतावरच चालविल्या गेले. भगवंत बेहोश झाले आणि युध्द बंद झाले. युध्दविराम झाला, वाटण्या झाले व हे सगळं मिटवुन भगवान अगस्त्य आश्रमाला चालते झाले. एके दिवशी भगवंताने तोंडमान राजाला त्यांच्यासाठी मंदिर निर्माण करण्यासाठी सांगितले आणि तोंडमानाने मंदिर बनविले. हि आहे कथा.

परंतु ब्रम्हांड पुराणात वसुदान व तोंडमान यांच्यामधिल युद्धाचा उल्लेख नाही. ब्रम्हांड पुराणा नुसार तोंडमानाच्या शत्रुनी त्यावर हल्ला केला. तोंडमान पळत पळत एका सुरुंगाद्वारे मंदिरात येतो. त्यानी भगवंताची प्रार्थना केली. भगवंताने प्रकट होऊन त्याला शंक चक्र दिले व त्याचा विजय झाला. नंतर त्यानी भगवंताला शस्त्र अदृशय रुपात धारण करायची विनंती केली. नंतर कित्येक वर्षानी रामानुज आले. शैव-वैष्णव वादातुन भगवंताला मुक्त करण्यासाठी रामानुजाने भगवंताना विनंती केली कि भगवंताने शस्त्र दृश्य रुपात धारण करावे व भगवंताने परत ते शस्त्र दृश्य रुपात धारण केले व एकदाचा वाद निकाली निघाला.

विष्णु पुजा:

तिरुमलाईच्य़ा भगवंताच्या विष्णु रुपाचा उगम समजुन घेण्यासाठी आपणाला भारतातील विष्णु पुजेच्या उगमाबद्दल माहिती करुन घेणे आवश्यक आहे.

शतपथ ब्राह्मण आणि तैत्रेय आरण्यक यात एक कथा आहे ज्यात विष्णुला जो वेदातील अनेक देवतांपैकी एक होता, परम प्रमाताच्या पदावर या ग्रंथांद्वारा वाढवुन देण्याचे स्पष्टिकरण देण्याचा प्रयास केला गेला आहे. बौद्धायन गृह्यसुत्र (१,११,७) यात विष्णु च्या १२ नावांत नारायण हे सुद्धा एक नाव आहे. नंतरच्या काळातील वायु पुराण आणि महाभारत नारायणाचा विष्णु आणि वासुदेव कृष्ण यांची समानता मानतात. बौद्धायन गृहयसुत्रात “पद्मनाभ” हे नांव येते, हे दर्शविते कि, शेषशायी रुपाची सुद्धा कल्पना केलेली होती. रघुवंश यात कालिदास या रुपाचे चित्रण करतात.

पुरातत्वीय प्रमाण:

ग्वालियर जिल्ह्यात मंद्सोर मध्ये मिळालेले ४०४ इसवी चे संस्कॄत शिलालेख हे सर्वप्रथम लेख आहेत ज्यात विष्णुची स्तुती आहे. ना कि वासुदेव, कृष्ण, केशव किंवा संकर्षण यांची.
१) कानपुर जि. भितरगांव च्या पाचव्या शतकात बनलेल्या मंदिरात शेषाशयाची मुर्ती आहे. हि सर्वप्रथम मुर्ती मानली जाते.
२) दुसरी सहाव्या शतकात, ललितपुर जि. देवगढ च्या मंदिरात खेदलेली आकृती आहे.
३) बादामी येथील सहाव्य शतकातील लाल दगडाची मुर्ती आहे.
४) आठव्या शतकातली बिजापुर च्या ऐहोळ स्थीत मुर्ती.
५) आठव्या शतकातिल पल्लव कालीन महाबलिपुरम येथील विष्णूची मुर्ती याच रुपाचि आहे.

विक्रमादित्य (गुप्त वंशाचे पंचम सम्राट) यांच्या शासन काळात वराह विष्णु मुर्ती बनली होती. ती मध्यप्रदेशातीळ बिलसा आणि भोपाळजवळील उदयगिरी गुफेत मिळाली. तसेच एरण मधेय गुप्तांच्या एक जागिरदाराने हुणांच्या अधिपत्यात एक दगडाचे मंदिर याच देवतेच्या वराह रुपासाठी बनविले असुन त्यावर ५००-५१५ इसवी चा शिलालेख आहे.
नंतर विजयनगर राजांनी १४-१६ व्या शतकात वराह रुपाला स्विकारले. हे स्विकारणे इतके संपुर्ण होते कि त्याचे नाणे सुद्धा “वराह” म्हणून म्हटल्या गेले.

दक्षिण भारतात अनेक विष्णुक्षेत्रे होती पण तिरुमलाई नाही:
दक्षिणेत अनेक विष्णु मंदिरे होती ज्याना राजे महाराजे दान देत असत, त्यांची दानपत्रे उपलब्ध आहेत. यांचे विवेचन डॉ. एस. कृष्णास्वामी अयंगार देतात. (संदर्भ: हिस्ट्री ओफ तिरुपती. २ आवृत्ती, सन १९५२)

दानपत्र
१) पहिला लेख, काल गणनेत सर्वप्रथम ज्याला ब्रिटिश संग्रहालयात चारुदेवी ताम्रपत्र म्हटल्या जाते. हे प्राकृत लेख महाराज बुद्धवर्मन च्या शासन कालात युवमहारज बुद्धवर्मनची राणी तसेच बुद्धांकुर ची माता चारुदेवी ने “दालुर” नामक गावात नारायणाच्या मंदिरासाठी दिलेले दानपत्र आहे.
२) दुस-याला सिम्हवर्मन चे दानपत्र म्हटल्या जाते. प्रारंभी विष्णूची भागवत म्हणून स्तुती केली आहे, मेनमातुर ग्राम मधुन लिहले आहे. महाराज विश्नुगोप चा पुत्र महाराज सिम्हवर्मण ने लिहले होते.
३) तिसरे, ज्याला युवमहारज विष्णूगोपवर्मन चे उरवपल्ली दानपत्र म्हटल्या जाते, ज्यात युवराजाला परम भागवत म्हटल्या गेले आहे. हे कंडुकुरा नामक गावाच्या विष्णुहर देवतेच्या मंदिराला दिलेले आहे.
४) चौथे, महेंद्रतटक नदीच्या किनारी महेद्रपुर शहरात वसलेले विष्णूगृह मंदिरात आहे.
५) कांजीवरम मधे आहे.
६) महाबलिपुरम च्या आदिवराह मंदिराला दिले.
७) त्रैचन्नपल्ली जवळ पुन्डरिकाक्ष पेरुमाल मंदिरातील दन्तीपोट्टारासर चा नवव्या शासन वर्षाचा शिलालेख आहे. (माझ्याकडे असे २० शिलालेखांचा संदर्भ आहे)

परंतु या सर्वात, तेव्हाही, तिरुवेगडम चे विष्णू मंदिराच्या रुपात उल्लेखाचा अभाव आहे. कारण हे मुळात हिंदु मंदिर नसुन दक्षिणेतील हे एक बुद्ध मंदिर होते. म्हणुन याला वरिल विष्णु पुजेच्या काळात वैष्णवानी स्विकारलच नव्हतं.
तोंडमन इलम तिराईयन यांचे शसन समाप्त झाले असुन त्या काळी पल्लवाचे राज्य सुरु झाले होते. तेंव्हापासुन सहाव्या शतकाच्या अंतापर्यंत तीन वेगवेगळ्या गटातीळ राजांनी अनेक विभिन्न स्थानांवर आपले शिलालेख लिहले परंतु तिरुपती ईथे कुठलाच शिलालेख लिहल्या गेलेला नव्हता.

कलभार:
हे क्षेत्र कलभारांचे गढ होते, आणि त्यांचे जन्मस्थळ होते. हे कलभार बुद्ध असल्यामुळे ह्या सर्व बुद्धविरोधि राजा महाराजानी तेथे जावे अशी अपेक्षा आपण करु शकत नाही. तसेच त्यानी कोणतेही दान या मंदिराला दिलेले नाही. किमान तशी नोंद तरी नाही. जो पर्यंत तिरुमलाई हे शुद्ध बौद्ध मंदिर होते व कलभारांच्या हाथी इथला कारभार होता, तोवर हे मंदिर दुर्लक्षीत होते.
“अहोबिलम,” जेथे अलवारांपैकी केवळ एकटे तिरुमंगाई हेच गेले होते असे दिसते. ते स्थळ सुद्ध बरेच दुर्गम होते आणि आज सुद्दा दुर्गमच आहे. विजयनगरच्या संगम घराण्याच्या शासन काळात हे क्षेत्र प्रसिद्ध झाले. तालिकोटाच्या युद्धानंतर दुस-यांदा अंधारात बुडाले. तेथे कोणत्याही प्रकारची नियमित पुजा होत नसे. जेंव्हा कि असे सांगितल्या जाते कि, त्याची प्रतिष्ठापना पंचरात्र “आगम” शास्त्रानुसार अहोबिलम च्या जियारांद्वारे केल्या गेली होती. कडप्पा जि. एक नियोगी ब्राह्मण जो आगम शास्त्रीय पुजा पद्दती विषयी कसल्याही प्रकारचे ज्ञान नसणारा होता. तो स्वयंसेवी भावाने पुजा करित होता. हि पुजा पायथ्याशी असलेल्या “तिरुविलन कोईल” साठी होती. तेथुन पाच मैल वर पहाडिवर असली उग्र नरसिंह मुर्ती एका प्रस्तर गुहेत आहे. तेथे दररोज कोणतीही पुजा होत नव्हती. मंदिरच्या बाहेर आणी गोपुरमच्या आत पशुबली चढविल्या जस्त होती. ज्यामुळे भावनाशनी नदी जिच्या किनारी हे मंदिर आहे तिचे पाणि रक्ताने लाल होत असे.(यावर सविस्तर पुढे बघु)

आठव्या आणि नवव्या शतकात तिरुपतीच्या अतिशय निकटच्या शिव आणि विष्णुच्या मंदिराना अनुदान दिल्या गेले. जसे कि शिलालेखांद्वारे कलते, ते आहेत चित्तुर जिल्ह्यातील गुडिमालम शिलालेख, उत्तर अर्काट जि. तिरुअवलम आणि तिरुमुक्कुडल (वेंकटेश मंदिर). दान दात्यांमधे बाणा राजांचा सामावेश आहे. (मावली बाणा राया) यापैकी एक होते, विजयादित्त बाणराया ज्यानी नवव्या शतकाच्या शेवटी “तिरुचक्किनुर तिरुविलन कोईल” ला अनुदान दिले होते.
अशा प्रकारे तिरुमलाईचा उल्लेख अर्थात रामायण, महाभारत यात तर नाहीच पण विष्णु पुराणात किंवा दहाव्या दशकात ज्याचे संकलन झाले त्या भागवत पुराणात सुद्धा नाही. आसपासच्या हिंदु मंदिरांचा उल्लेख शिलालेखांत सापडतो पण तिरुमलाईचा नाहि कारण ते एक बुद्ध मंदिर होते म्हणुन त्याचा उल्लेख नाही. यावरुन दुसरा प्रश्न निर्माण होतो कि, जेंव्हा संगम काळात दुस-या किंवा तिस-या शतकात वेंगाडम इतके प्रसिद्ध स्थळ होते तर मग त्याची ख्याती नष्ट कशी झाली. कसे काय ते अंधकारात बुडाले ? आणि अचानक दहाव्या शतकात “भोग श्रीनिवास” मुर्तिची स्थापना होईस्तोवरचा समय या मंदिरासाठी महत्वपुर्ण का नव्हता. हे मंदिर विष्णु मंदिराच्या रुपात तेंव्हाच प्रसिद्ध झाले जेंव्हा बुद्ध हा विष्णूचा अवतार आहे हि बाब लोकांच्या डोक्यात घुसविल्या गेली. आणि तोवर कलभारांचे पतन झाले होते.

पुढिल भागात
१) वैखानसानी मंदिराचा ताबा कसा मिळविला.
२) अलवारांद्वारे काव्य / किर्तन रुपाने बालाजीचा प्रचार व प्रसार.
३) रामानुजाने कसे मंदिरावर वैष्णवांचे हक्क सिद्ध केले.
४) कलभारांची हाकलपट्टी करण्यात आली व तेथील बुद्ध भिक्षुकिना देवदासी कसे बनविण्यात आले.
५) तिरुपतीची मुर्ती मुळात बुद्धाच्या कोणत्या मुर्तीशी मेळ खाते.
६) आजुन बरच काही.

क्रमश:

गुलमोहर: