अन्वयाची फांदी...

Submitted by कमलाकर देसले on 17 August, 2010 - 23:39

"प्रगल्भ समजेच गार पाणी"
बहुतेक जण आंघोळीसाठी कोमट पाणी घेतात. कधी कधी होते असे कि पाणी नको तितके तापते. तसेच्या तसे अंगावर घेतले तर कातडी सोलून काढेल इतके.
मग आपण काय करतो? अतिशय तापलेले ते कडक पाणी तसेच अंगावर घेतो?नाही. कि मग ते अंगावर टाकण्याच्या लायकीचे नाही म्हणून फेकून देतो? व दुसरे पाणी तापत ठेवतो? नाही. असेही आपण करत नाही.
मग आपण काय करतो? त्या अतिशय तापलेल्या पाण्याला थंड होण्याची वाट पाहतो? नाही.थोडी वाट पहिल्याने पाणी अपोआप थंड होते सुद्धा. पण असे पाणी थंड होण्याची वाट पाहणे हा शुद्ध वेडेपणा असतो. आपण असा वेडेपणा करत नाही.
.........तर मग आपण करतो काय? बरोबर,आपल्याला हवं तितकं कोमट होईपर्यंत त्या अतिशय तापलेल्या पाण्यात थंड पाणी ओततो. म्हणजे-जसे आहे तसेच्या तसे तापलेले पाणी अंगावर घेत नाही.ते अति तापले म्हणून फेकूनही देत नाही. ते फेकत नाही म्हणून दुसरे पाणी तापवत ही नाही. आणि त्या अतिशय तापलेल्या पाण्याची थंड होण्याची वाटही बघत नाही. हे मूर्खपणाचे पर्याय आपण हाताळत नाहीत. पाणी हवं तितकं कोमट होईल तोवर त्यात गार पाणी ओतताम्याचा योग्य पर्याय आपण हाताळतो बस, योग्य पर्यायाची निवड म्हणजे 'विवेक" . याच विवेकाचा वापर आपण आपल्या दैनंदिन जीवनात करतो का ? बायका तमोगुणी आहे ,भांडखोर आहे . नवरा संतापी आहे . बॉस चिडखोर आहे ,मुलगा शोघ्रकोपी आहे आणि आपण काही याहून वेगळे नसतो. तमोगुण,संताप,चिडचिड,भांडखोरपणा हे सगळं स्वभावाच्या पाण्याचं तापलेपण,अति तापलेपण नाही का ?
ज्याक्षणी आपला पार्टनर,बायको,नवरा,बॉस ,मित्र,मुलगा आपल्याशी किंवा आपण यांच्याशी भांडतो ,चिडतो तेव्हा त्यांना तसेच प्रतुत्तर देणे व त्यातून अधिक क्लेश करून घेणे म्हणजे खूप तापलेले पाणी अंगावर घेणे होत नाही का? संतापाची प्रतिक्रिया म्हणून बायको बदलणे,नवरा सोडणे ,बॉस तोडणे, किंवा मुलाला झोडणे हे म्हणजे पाणी अति तापल्या सारखे होते. ते काय कामाचे म्हणून न वापरता फेकणे असे होते नाही का? किंवा संतापाची योग्य व्यवस्था लावता येत नसल्याने
निरुत्तर,मख्ख,होऊन,राहणे म्हणजे पाणी थंड होई पर्यंत वाट पाहत बसण्यासारखे नाही का ?
अशा संतापलेल्या क्षणी आपल्या तप्त स्वभावाच्या पाण्यात "प्रगल्भ समजेच गार पाणी" त्यात टाकतो का? तसे आपण टाकू शकलो तर संबंध तुटणे तर दूरच आपले संबंध इतरांसाठी सहयोगी ठरू शकतील. बादलीभर कोमट पाण्यात फक्त आपलीच अंघोळ होते. जास्त तापलेल्या पाण्यात गार पाणी ओतून दुसऱ्या एक-दोघांचीही अंघोळ होतेच ना?
संबंधांच पाणी अतिशय तापणार नाही याची काळजी घेणे.किंवा तापलंच खूप तर "प्रगल्भ समजेच गार पाणी" त्यात ओतून आपल्याच संबंधांना अधिक उपयोगी बनवणं.काय करू शकतो आपण?

" दुखावल्या भावना की
मग मनही कापते
दाह वाढता वाढता
पाणी मनाचे तापते

पाणी तापले मनाचे
अंगावर घेऊ नये
खूप तापले म्हणुनी
त्याला बोल लावू नये

गार पाणी घातल्याने
जसा कमी होतो ताप
विवेकाचे गार पाणी
शांत करते. संताप
- कमलाकर देसले

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

छान लिहिताय दादा. पुलेशु. वाट पाहतोय

आणि दादा, प्रत्येक पोस्टनंतर आपलं नाव टाकायची आवश्यकता नाहीये, ते आपोआप येतंच की.....

कमलाकर देसले | 18 August, 2010 - 12:10 नवीन

thanks चिमुरी भेटुया पुढील लेखात "अन्वयाच्या फांदी"मध्ये -कमलाकर देसले Happy

छान लिहिले आहे , उपदेश पण चांगला आहे. संत साहित्याची, अभंगाची आठवण येते. अगदी सोप्या , दैनंदिन जीवनातल्या उदा. मधुन खूप थोर उपदेश सहजपणे आला आहे.
forwarded mail मधुन जाण्याजोगे contents आहेत.
प्रत्यक्ष व्यवहारात असे 'प्रगल्भ समजेच गार पाणी' टाकु शकणारे अगदीच थोडे लोक असतील नाही. बहुसंख्यांकडे अशी समज असणे संभवत नाही.