काळ्या पिशवीत पिशवीत

Posted
11 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
11 वर्ष ago
Time to
read
<1’

(श्री विठ्ठल वाघांची क्षमा मागून)

काळ्या पिशवीत पिशवीत बॉटल हालते
बॉटल हालते बॉटल हालते

बाईल थयथया नाचते दोस्त घरी बोलवितो
घरी बोलवितो दोस्त घरी बोलवितो

घरन बाबा हाकलतो छंदी फंदीच्या जोडीला
जिभे सरसती नाचे घोट जाताच पोटाला
तरतरी मना येते मती न्हाती धूती होते
रंगीत पान्याच्या वासाची चाहूल आवशीला जाते
भय जिवाला पडते वाट दोस्ताची लागते
दोस्त बॉटल झाकतो मी चकना लपवितो

दोस्ता र आता कलटी र आता पळूया र माझ्या राज्या

पानी खिडकीतन वोतून वाट गुत्त्याची चालूया
तिथे उधार चालेना नगद लागते
अन्ना शेट्टीच्या गूत्त्यात चाल 'पेया'च पूजन
तिथ डोलकर हालती जनू करती भजन
जवा रंगीत पान्यात सोन चांदी लकाकते
सोन चांदी लकाकते आस जिवाला लागते

चाले पानी-चकन्याचा पाठशिवनीचा खेळ
खुर्ची बूडाला लागेना झाला कसला हा गोंधळ
काळ्या टेबला खालन डोला सपान पाहतो
डोला सपान पाहतो अन्ना गालात हासतो
काटा लागतो जिवाला स्वप्न पान्यात सांडत
स्वप्न पान्यात सांडत दुकान अन्नाच चालत

विषय: 
प्रकार: 

केदार Rofl
मी तर मनातल्या मनात गाउनही पाहीलं!! मस्तच जमलय.

मीही मोठ्याने गाउन पाहीले.....सहीच जमलय Wink

हा हा हा .. Happy मस्त!
-(आस्वादक) ऋषिकेश

रंगीत पान्याच्या वासाची चाहूल आवशीला लागते.. यात एक मात्रा जास्ती वाटली. या ऐवजी "....चाहूल आवशीला जाते" चालेल का?
-(चिकित्सक) ऋषिकेश

धन्यवाद रे ऋषिकेश Happy
पटेश एकदम. लगेच सुधारल Happy
रमणी आणि प्रकाश, तूमचेही आभार Happy

अरे वा. केदार. मजा आली वाचताना...

Rofl केदार!! मजा आली एकदम!

Happy
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
क्या मौसम आया है क्या मौसम आया है
गीत गाए नदीया बूँदो मे है सरगम..!!

धन्यवाद आशू , साजीरा आणि संजीत Happy

लई भारी भौ! यस्जीवर हे वाचलंच होतं, पुन्हा आता वाचताना मज्जामाडी!!
श्रावणात काळी पिशवी बघितल्यावर उगीच जीवाचं जळणं न् काय..!

***
हस्सरा नाचरा, जरास्सा लाजरा-
सुंदर साजिरा, श्रावण आला..!