क्रोशा - स्वेटर

Submitted by मीन्वा on 16 August, 2010 - 11:59

माझी नवी कलाकारी. (स्वेटरच्या खाली आहे ती कांथा वर्क असलेली ओढणी - (मी केलेली नाही - विकतची :P))

टोपी केली या स्वेटरवरची आणि छोटे शूज करायचा बेत आहे. एका ठीकाणी रहावं म्हणून टोपी इथेच टाकतेय.

IMG_2129.JPGIMG_2127.JPG

शूज

171.JPG

एकत्र असं दिसतंय.

165.JPG

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

हो पुण्यात स्वेटर बेबीच घालतात गं ! एरवी इतरांना पुण्यात स्वेटर घालायची संधी मिळतेय कुठे? Happy एक उद्योग म्हणून क्रोशा शिकायचा उद्योग बरा वाटतो. एम्ब्रॉयडरीपेक्षा कमी ताण येतो डोळ्यावर. बहीणीसाठी (ती मोठी आहे.) हाच प्रकारचा स्वेटर करायला घेतलाय. बघू यात मोठ्यांचा कसा जमतो ते. Happy

मस्तच झालाय ग.
रच्याकने, ती ओढणी कुठुन घेतलीयेस? मला घ्यायचीये तसली एक. Proud सुज्ञ मैत्रिणींच्या सांगण्यावरुन कांथा वर्कची साडी नाही तर आता ओढणीच घ्यायची ठरवलय.

मीन्वा मस्तच ! आणि असल्या ओढण्या सोनल हॉलमधे प्रदर्शनात होत्या. खूप व्हरायटी होत्या. तेव्हा न घेतल्याचा आता पश्चात्ताप होतोय.

एsss कसला गोड स्वेटर आहे. रंग पण सुंदर आहे. तू वीण कशी घालायची ते लिहीच मीनू....

पण लोकर विणायची म्हणजे ती माझ्या हाताच्या उष्णतेने काळी पडते. Sad

छान झालाय स्वेटर Happy माझीही अशीच ओढणी व सेमीपटियाला सलवार आहे. गोखले रोडवरच्या एका दुकानातून एकमेव उरलेला सलवार दुपट्टा सेट ५५० रुपयांना (बार्गेन करुन) घेतला होता.