एकाकीपणा

Submitted by रेव्यु on 16 August, 2010 - 02:25

गेले तीन महिन्यापासून मी एकटा राहत आहे.असा प्रसंग आयुष्यात फार क्वचित आला.माझे वैयक्तिक अन वैवाहिक जीवन फार आनंदात गेले आहे.लग्नाला तेहेतीस वर्षे झालीएत.
मी अनेक प्रकारे स्वतःला गुंतवून ठेवत आहे निवॄत्त झालो तरी कॉलेजात आठवड्यातील चार दिवस शिकवायला जातो.साय,न्काळी वाचतो,लिहितो,गाणे ऐकतो,तरीही एकाकी पणा खायला उठतो.घरात एकटा बसलो कि उद्विग्न होतो.आणखी काही आठवड्यानी पत्नी परदेशातून परत येयील.
कुणाशीतरी चार शब्द बोलायला जीव कासावीस होतो.आधी मी इतका हळवा कधी नव्हतो.
असे का झाले कळत नाही.लौकिक द्रुष्ट्या सर्व काही स्थिर स्थावर आहे.मग असे का?
कोणी सांगू शकेल का?

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

रेव्ह्यु, तुमचा एकाकीपणा तुमच्यामुळेच आहे असं म्हणावं लागेल. शोधात आनंद निश्चित सापडतो अन आनंदात माणूस कधीच एकला नसतो. तेव्हा जिथे मन रमेल तिथे आनंद शोधण्याचा प्रयत्न करा. त्यासाठी बरेच ऑप्शन्स आहेत. चांगले अन वाईट सुद्धा. वाईटामधे कदाचित लवकर आनंद मिळेल पण तो फार काळ टिकणार नाही. अन जर टिकवता आलाच तर तुमच्यात जो बदल घडेल तो इतरांनी नकारला तर पुन्हा तूम्ही एकटे पडाल. तेव्हा वाचन, लेखन, चिंतन किंवा मग अध्यात्म या सगळ्यांमुळे एकटेपणात बरेच सोबती भेटतील.

रेव्ह्यु घरात दुसरी कुणीही व्यक्ती नसताना जाणवणारा एकटेपणा साहजिक आहे. मी बदलीमुळे ५ १/२ वर्षे एकटा दुसर्‍या शहरी होतो, तेव्हा ऑफिसमधे १०-१२ तास गेले तरी घरी असल्यावर एकटेपणा जाणवायचाच. अगदी माझे व घरमालकाचे घर आतून जोडलेले असले आणि त्यांची मुले माझ्याकडे मी त्यांच्याकडे जायचो तरी.
घरात पाय टाकल्या टाकल्या म्युझिक सिस्टमवर आवडीची गाणी लावून घरात कुणीतरी असल्याचा भास निर्माण करायचो. देवापुढे दिवा, अगरबत्ती प्रार्थना (जे मुंबईला असताना कधी करत नसे) करायचो. पुस्तकांचीही सोबत व्हायची...

भरत आणि सूर्यकिरण
दोघानाहि धन्यवाद्.पण भरतनी संगितल्या प्रमाणे घरात कुठलातरी नाद शेवटी निर्माण करतो अन मग थोडा एकाकीपणा दूर होतो.सायंकाळी देवासमोर दिवा लावून- येतात तेवढ्या प्रार्थना केल्याने उद्वेग कमी होतो.मला प्रिय असलेले सर्व छंद मात्र बरेचदा साथ देत नाहीत्.वाईट छन्द्/व्यसने नाहीतच.
काही दिवस हा माझा मार्ग एकला मानावा लागेल.

मलाही अनेकदा एकाकी रहाण्याचे प्रसंग आले. पण अनेक छंद लावून घेतले असल्याने एकटा असताना सुद्धा काय करावे हा प्रश्नप्कधी पडला नाही, अजूनही पडत नाही. भटकंती खूप करतो. एकट्याने सुद्धा. सोबत कॅमेरा असल्यास उत्तमच. माझे छंद म्हणजे गणित (कोडी वगैरे), crosswords, प्राणीजगताची जमेल तेव्हढी माहिती
मिळवत रहाणे. सोबत पर्यावरणासंबंधती जनजागृती करणे. शाळा कॉलेजेस या संबंधी भाषणे देणे. आणि हल्ली संगणकामुळे विविध साईटवर गेल्यावर वेळ कसा जातो तेच कळत नाही. याहू आन्सर्स वर मी तासनतास घालवू शकतो. कळावे.

रिव्यु, एकाकीपणावर समविचारी दोस्तांसारखी दुसरी सोबत नाही! तुमच्या दोस्तांशी, परिचितांशी आपण होऊन संपर्क साधा.... त्यांना प्रत्यक्ष भेटा किंवा इंटरनेट/ ईमेल/ चॅट/ सोशल नेटवर्किंग/ समसच्या माध्यमातून त्यांच्याशी गप्पा मारा. आपले सर्कल वाढवा. नव्या लोकांशी ओळख करून घ्या. इथे माबोच्या कट्ट्यावर चक्कर टाकत जा.... कोणी ना कोणीतरी पडीक असतेच! Proud आणि ह्यातील काहीच शक्य नसेल तर मनपसंत संगीत, उत्तम पुस्तके ह्यांसारखे जवळचे मित्र नाहीत!
पत्रलेखनातही अगदी छान वेळ जातो. वृत्तपत्राच्या संपादकांपासून ते भारताच्या पंतप्रधानांपर्यंत, जवळच्या नातेवाईकांपासून ते दुरावलेल्या मित्रांपर्यंत, अनाथ - निराधार मुलांपासून ते लष्करात सीमारेषेवर लढणार्‍या जवानांपर्यंत..... आपल्या पत्राने कोठे काही फरक पडणार असेल तर.... लिखाणाने मनातील कोंदलेपणा नाहीसा होतो, भावना व्यक्त होण्यास जागा मिळते आणि आपली दुसर्‍याशी कम्युनिकेट करण्याची गरजही काही अंशी पूर्ण होते.
तुम्हाला फारच एकटे वाटत असेल तर स्काईपसारख्या माध्यमातून भारतातील पत्नीशी रोज गप्पागोष्टीही करू शकाल.

काही माणसे ठरवून एकटी राहतात. त्यांना एकटे राहण्यात सुख मिळते. स्वतःच्याच संगतीत किंवा निसर्गासमवेत राहताना त्यांना अजिबात प्रॉब्लेम येत नाही. काहीजण (विशेषतः गजबजलेल्या शहरांमधील लोक) अशा एकांतासाठी झुरतात. आणि काहीजण हा एकटेपणा खायला उठल्याचे सांगतात. प्रत्येकाच्या आवडीवर आहे शेवटी!
आणि अशा वेळी कधी हळवे होणे, भावनाविवश होणे, एकटेपणा खायला उठणे ह्यात अनैसर्गिक काहीही नाही. इतरांशी बोलणे - संवाद साधणे हीदेखील आपली एक गरजच आहे ना! आपल्या मनाची भूक आहे ती!

तुमचा एकटेपणा लवकरच दूर होवो ही सदिच्छा! Happy

रेव्युजी, आपलं उद्विग्न होण हे अस्वाभाविक नाही. पण त्याचं कारण व्यक्तिगत व त्यावरचा उपायही व्यक्तिनिष्ठच असण्याची शक्यता आहे. उदा. <<काही माणसे ठरवून एकटी राहतात. त्यांना एकटे राहण्यात सुख मिळते.>> मला स्वतःलासुद्धा अधुनमधून एकटं रहाणं ही गरज वाटते. पण खूप छंद असूनही एकाकीपणा सुद्धा मलाही जाणवतो. निवृत्तिनंतर त्यावर मला सुचलेला एक उपाय म्हणजे वेळ जाण्यासाठी कशात तरी मन गुंतवण्याऐवजी आपल्या मनाला खरंच कशात गुंतून रहायला आवडतं याचा शोध घेणं. ही गोष्ट वाटते तेवढी सोपी नाही व स्वतःला ते पटवणंही. मला पाककलेची मनस्वी आवड आहे हे मला आत्ता आत्ता कळलं ! मी त्यात इतक्या सहजपणे रमतो कीं आता हे सांगतानाही मला पूर्वीसारखा संकोच वाटत नाही. [ मी उत्तम स्वयंपाकी आहे असा मात्र गैरसमज करून घेऊ नये].
आपल्या आजवरच्या समाजातल्या प्रतिमेला साजेशी नसली तरीही आपल्या खरंच आवडीची एखादी गोष्ट असेल तर ती बिनधास्त करावी [ अर्थात, अहितकारी नसली तरच !]. हा आपला माझा एकाकीपणावरचा रांगडा उपाय.
यामुळे तुमचा उपाय शोधायला तुम्हाला मदत झालीच तर मलाही खूप बरं वाटेल.

रविम्द्र.अरुन्धती,भाऊ
तुम्ही संगितलेल्या गोष्टी बर्‍याच अंशी मी अन्गिकारल्या आहेत व त्यात रमतोही. पण कधी कधी असा मूड स्विन्ग होतो अन एकाकी पणा व्यपून जतो.काही तासानी पुनः सामान्य होतो.घरी असताना हे विशेषतः होते.मला घरातली शांतता प्लआन केल्याशिवाय सहन होत नाही कदाचित,
एनीवे खरोखर आपुलकीने तुम्ही मदत केली -धन्यवाद

घरातली कपाटे, खण आवरायला घेणे हा उत्तम उपाय आहे अशावेळी. आठवणींची सोबत होते , वेळ कसा जातो तेही कळत नाही.(आवरलेलेच असतील तर आधी पसारा करा)

<<घरातली कपाटे, खण आवरायला घेणे हा उत्तम उपाय आहे अशावेळी. आठवणींची सोबत होते , वेळ कसा जातो तेही कळत नाही.(आवरलेलेच असतील तर आधी पसारा करा)>>एकदम पटलं. मलाही खूप शांत वाटतं हा कार्यक्रम हाती घेतल्यावर !

<< >>
हा प्रकार केला मी आणखीच खिन्न अन भाव विवश झालो, कारण प्रत्येक वस्तूशी अनेक जिहाळ्याच्या आठवणी निगडित असतात अन त्या व्यथित करतात.-खरोखर

तुम्ही हळवे झालात, कारण एकच तुम्ही तुमच्या जिवणात काही बाबतित दुसरयावर अवलंबुन आहात जे एकटे असतांना प्रकर्षाने जाणवले.

होते असं कधिकधी. पण यातुन बाहेर पडण्याचा प्रयत्न्,हॉबी लावून घ्यावी अन्यथा डिप्रेशन येण्याचा संभव असतो. सोशल असणे हा त्यावरील उत्तम उपाय. एखादा क्लब किंवा वाचन अशी सोय करून घ्यावी.अन्यथा एखादे सामाजिक कार्य करण्यात गुंतून घ्यावे.

रेव्हू जी, सुदैवाने तुमचा आयुष्यात एकटेपणा हा अल्प काळा साठीच आहे.
मनाशी ठरवलेल्या काही गोष्टी करायच्या राहून गेल्या असतिल तर त्या पूर्ण करा.
कामा चा नादात जुन्या मित्र-मैत्रिणी शी सम्पर्क नसतो, तो करा;
तुमचा तुमच्या पत्नि बद्दल च्या भावना त्यान्ना पत्रा द्वारे कळवा- व्यक्त करायच्या राहीलेल्या भावना पोहोचवायला हे माध्यम फार छान आहे.

रेव्यु, तुम्ही म्हणताय ते चांगलच अनुभवलय.. एक वर्षभर..त्यामुळे समजू शकते..
भयानक फीलिंग असतं.. तो पिरियड आठवला तरी नको वाटतं..

बायकोला पटकन परत बोलवा/तुम्ही बायको आहे तिथे जा Happy