"झटकून टाक जीवा दुबळेपणा मनाचा, फुलला पहा सभोती आनंद जीवनाचा"
असेच काही वर्णन करता येईल आमच्या तीन दिवसाच्या भिमाशंकर-जुन्नर्-लेण्याद्री-शिवनेरी-माळशेज घाटाच्या भटकंतीचे. आठवड्याभराच्या कामाचा कंटाळा आणि त्याच त्याच नेहमीच्या रूटिनने आलेला मनाचा दुबळेपणा घालवण्यासाठी आम्ही चार मित्र, मी, प्रसाद कुलकर्णी (माबो आयडी प्रकुल२४), राहुल क्षीरसागर आणि अभिषेक पाताडे असे निसर्गाच्या सान्निध्यात "गटारी" साजरी करण्यासाठी निघालो. निसर्गाची बेफाम नशा सोबतीला असल्यावर "फेसाळणारे प्याले" हवे कुणाला?
फेसाळणारे धबधबे हेच आमच्यासाठी नशेचे प्याले होते, तोंडी लावायला सोबतीला होती गाडीत वाजणारी धुंद गाणी आणि आमचे कॅमेरे :).
"एकच प्याला" च्या धर्तीवर "एकच फोटो" असे करत करत तब्बल ६००च्यावर फोटो काढले. 
त्याच बेधुंद भटकंतीची हि चित्रझलक. 
==================================================
==================================================
प्रचि १
प्रचि ८ गणेशखिंड (जुन्नर) – ऊन सावली पाठशिवणीचा खेळ
प्रचि ३३ भिमाशंकर दुपारी २:३० वाजता
प्रचि ३४ भिमाशंकर दुपारी २:३० वाजता
प्रचि ३५ वातावरणच असे होते कि या छोट्याला सुद्धा नाचण्याचा मोह आवरला नाही. अगदी बेफाम होऊन हा ज्युनिअर राजेश खन्ना भर रस्त्यात येणार्या जाणार्या गाड्यांची पर्वा न करता नाचत होता.
प्रचि ३७ धुक्यात हरवलेले श्री क्षेत्र भिमाशंकर
==================================================
==================================================


































दाट धुक्यामुळे आणि पाऊस भरपुर
दाट धुक्यामुळे आणि पाऊस भरपुर असल्याने काही चित्रे गाडीतुनच घेतली आहे (काचा लावून). त्यामुळे काही प्रचि हि Quality Wise तितकी खास नसतील
योगेश, अप्रतिम फोटो. स्पेशली
योगेश, अप्रतिम फोटो. स्पेशली तो खिंडीतला फोटो... भातलावणीचे फोटो अन घाटातून काढलेले ती भाताची हिरवी गार खाचरे..
मन अल्हाद अल्हाद जाहले,
सौंदर्य निसर्ग जेव्हा पाहीले..
मस्तच रे यो२४ प्रचि ९ सह्ही
मस्तच रे यो२४
प्रचि ९ सह्ही आहे आणि ती मक्याची कणस़ं..तोंपासु
सहीच योगेश... तिथं असण्याचा
सहीच योगेश... तिथं असण्याचा फील आला...
चुकुन दोन वेळा पोस्ट्लं
चुकुन दोन वेळा पोस्ट्लं
मस्तच
मस्तच
छान ! मस्तच !
छान ! मस्तच !
मस्त
मस्त
योग्या मस्तच रे, धमाल केलीत
योग्या मस्तच रे, धमाल केलीत तुम्ही लोकांनी
मी जाणार होतो काल, पण नाही गेलो.
हुश्श! ही प्रचि पाहून जीवात
हुश्श! ही प्रचि पाहून जीवात जीव आला...

सुरेखच आली आहेत नेहमीप्रमाणे...
एक प्रदर्शन भरवण्याइतके फोटो नक्कीच असतील नै तुझ्याकडे?
मस्त आहेत सगळेच फोटो. ते
मस्त आहेत सगळेच फोटो. ते धुक्यात हरवेलं वातावरण मस्तच वाटतंय.
छान फोटो
छान फोटो
सहीच फोटो.. गेले तीन वर्षॅ
सहीच फोटो..
गेले तीन वर्षॅ भिमाशंकरला जाउनही या धुक्यापायी आजुबाजुचं काहीच दिसलं नव्हतं. यंदा पाऊस कमी झाल्याशिवाय जायचंच नाही असं ठरवलयं निदान १५ सप्टेंबर पर्यंत तरी.
मस्त रे योगेश
मस्त रे योगेश
दक्षे, काय विचार आहे. ह्या
दक्षे, काय विचार आहे. ह्या गणेश उत्सवात योग्यच्या छायचित्रांचं प्रदर्शन भरवायचं का मग पुण्यात ?
खल्लास... लय भारी भिडू... सही
खल्लास... लय भारी भिडू... सही फ्रेश प्रचि आहेत.
मस्त रे.. एकदम फ्रेस करतोस बघ
मस्त रे.. एकदम फ्रेस करतोस बघ तू..
योगेश, वाट्टच पाहत होतो मी
योगेश, वाट्टच पाहत होतो मी
छान
छान
मस्त!
मस्त!
मस्तच... आमच पण जायच
मस्तच...
आमच पण जायच घाटतय...भिमाशंकरला..
आहा!!मस्त!!!!!!!!!!!!
आहा!!मस्त!!!!!!!!!!!!
वा!
वा!
मस्तच फोटु रे योग्या
मस्तच फोटु रे योग्या
मस्त रे एकदम.. एसटीचा फोटु लै
मस्त रे एकदम.. एसटीचा फोटु लै भारी..
प्रचि . ३१ मस्त आले
प्रचि . ३१ मस्त आले आहे..
अवांतर .. १०० च्या स्पीड नी गाडी नका चालवत जाऊ ..
चांगले फोटो आहेत. फक्त
चांगले फोटो आहेत. फक्त यावेळेस भीमाशंकराच्या देवळाचे एक दोन फोटो सोडले तर बाकी त्या परिसराचे distinctive फोटो वाटले नाहीत.
डिंभे धरण बांधून पूर्ण झालेले दिसते. पूर्वी आम्ही जायचो तेव्हा बहुधा काम चालू होते.
जुन्नर चा ही फक्त गणेशखिंडीचाच फोटो दिसला. शिवनेरी, लेण्याद्री वगैरे ठिकाणी गेला नाहीत का? हा मार्ग जुन्नर, नारायणगाव, मंचर आणि मग भीमाशंकर असा असेल ना?
अजून वर्णन सुद्धा वाचायला आवडेल. १०० स्पीडबद्दल किशोर शी सहमत.
प्रतिसादाबद्दल खुप खुप आभार
प्रतिसादाबद्दल खुप खुप आभार
@फारएण्ड
फक्त यावेळेस भीमाशंकराच्या देवळाचे एक दोन फोटो सोडले तर बाकी त्या परिसराचे distinctive फोटो वाटले नाहीत.>>>खरंतर दाट धुके आणि पाऊस आणि प्रचंड गर्दी यामुळे त्या परिसराचे फोटो काढता आले नाहीत (infact जास्त फिरताच आले नाही). म्हणुनच शिर्षकाप्रमाणे फक्त मुंबई ते भिमाशंकर असा प्रवासच दाखवला आहे.
जुन्नर चा ही फक्त गणेशखिंडीचाच फोटो दिसला. शिवनेरी, लेण्याद्री वगैरे ठिकाणी गेला नाहीत का?>>>> शिवनेरी, लेण्याद्री या ठिकाणी सुद्धा गेलो. पण फोटो जास्त असल्याने ते दुसर्या सिरीजमध्ये येणार आहेत
जास्त फोटो एका ठिकाणी प्रदर्शित केल्याने ते पान उघडायला वेळ लागतो नां :).
हा मार्ग जुन्नर, नारायणगाव, मंचर आणि मग भीमाशंकर असा असेल ना?>>>>नाही, आम्ही मंचरवरून न जाता जुन्नर्-घोडेगाव या मार्गे गेलो (त्यामुळे अंदाजे ३० किमी आणि जुन्नर्-नारायणगाव्-मंचर्-घोडेगाव असा वळसा वाचला). रस्ताही चांगल्या स्थितीतला आहे.
खुपच छान
खुपच छान
ज्युनिअर राजेश खन्ना >> एकदम
ज्युनिअर राजेश खन्ना >> एकदम सही
पण फोटो जास्त असल्याने ते दुसर्या सिरीजमध्ये येणार आहेत >> लवकर येउदे ...