Submitted by bhagwatn on 15 August, 2010 - 04:22
आज माझी सावली
मलाच सांगत होती
ऊठ, निघ आता
क्षणिक होतो सोबती
तुझ्याबरोबर मी लांबले
आखूड पण झाले
अवघडल्या तुझ्या क्षणाची
साक्षीदार मी झाले
सुखात जरी मी तुझ्या
साथ नव्ह्ते दयावयाला
दु:खात तुझ्या मी
तुझी सखी झाले
नसेन दिसले मी काळोखात
कारण मी तुझ्यात होते
कशी दिसणार मी
माझे आस्तीत्व तुझ्यात होते
ह्ळ्ह्ळलास जेव्हा तु
दु:खी मी पण झाले
टपकलेल्या आसवाना
पिऊन धन्य मी झाले
एकांतात तुझ्या
माझ्याशिवाय नसते कुणी
थरथरलास जेव्हा तु
हात दयावयास नव्ह्ते कुणी
हा खेळ सावल्यांचा
म्हणूनी सर्व झाले
म्हणू नको कधी असे
मी पोरकीच राहिले
नसशील तु या जगात
मीही नसेन त्यावेळी
व्यथा मी नसल्याची
कळेल तुला त्यावेळी
जमेल तेव्हा, जमेल तिथं
तु मला झिडकारलं होतं
मी मात्र तुझ्या पावलासी
जीवन माझं सांडलं होतं.
-भागवत नाकुरे, पुणे
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा
'जहाले'..? 'झाले' किंवा
'जहाले'..?
'झाले' किंवा 'जाहले' ठिक वाटतो..
कवितेचा आशय चांगला आहे.. अजून चांगली होऊ शकते..