आषाढ अमावस्या - "दीपपूजन" कि "गटारी" ?

Submitted by जिप्सी on 13 August, 2010 - 00:10

नुकतीच "आषाढ अमावस्या" झाली. आषाढ अमावस्या म्हटले कि सहसा कुणाच्या लक्षात येणार नाही, पण गटारी आमावस्या सगळ्यांनाच माहित आहे. Happy
श्रावण सुरू होण्याआधीचा एक दिवस म्हणजेच "गटारी". श्रावणात महिनाभर मांसाहार करत नसल्याने या दिवशी मद्यसेवन आणि मांसाहारावर उभा आडवा हात मारला जातो. जे लोक श्रावण पाळत नाही ते सुद्धा गटारी दणक्यात साजरा करतात, अर्थात "पीने वालो को पीने का बहाना चाहिए" ;-), मग तो वर्षभरातील कुठलाही दिवस असो.
श्रावणात सगळीकडे हिरवेगार वातावरण असते. या दिवसात वर्षभर न दिसणार्‍या रानभाज्या बाजारात येतात, माश्यांच्या पैदाशीचा हा काळ, याच महिन्यात आपले बरेचसे सणही येतात आणि पावसाचे दिवस असल्याने मांसाहार पचायला देखील जड असते. म्हणुनच या महिन्यात मांसाहार वर्ज्य मानला जातो.

==================================================
==================================================
आषाढ अमावस्या हि "तमसो मा ज्योतिर्गमय" असा संदेश घेऊन येणारी मंगलमय मानली जाते. हा दिवस दिव्यांची अमावस्या साजरा केला जातो. घरात असलेले सगळे दिवे लख्ख धुऊन पुसुन त्यांची पुजा केली जाते. या दिव्यांच्या रूपात आपल्या जीवनातील अंध:कार नाहिसा व्हावा हि या मागची भावना.

==================================================
==================================================
"दिव्यांची अवस", जरी खरं असल तरी आज किती जणांना हे माहित आहे? किंवा किती जण हि अमावस्या या पध्दतीने साजरी करतात? या इतक्या सुंदर दिनाला "गटारी" हे नाव कुणी दिले कुणास ठाऊक.
सध्या गटारी म्हणजे दाऊ, मटण, चिकन, मासे यांच्यावर आडवा हात मारणे. यामुळेच हि अमावस्या बदनाम झाली आहे. आषाढातला शेवटचा रविवार तर यांच्या हक्काचाच. मद्यसेवन करून गटारात लोळणे हिच खरी गटारी यांच्यासाठी. आज कितीतरी पर्यटनस्थळे यामुळे बदनाम झाली आहे.
नुकताच आषाढातल्या शेवटच्या रविवारी "माळशेज" घाटातुन येण्याचा योग आला. मनात विचार होता मस्त पावसात माळशेज पूर्ण बहरलेला असेल, पण जसजसे खुबी फाट्याच्या पुढे यायला लागलो तसंतसे "गटारी" साजरा करणार्‍यांचा हैदोस जागोजागी दिसु लागला आणि तेंव्हाच लक्षात आले कि माळ्शेजची काय अवस्था असणार आजच्या दिवशी :(. आणि खरोखर तसंच झाले. लांबच लांब गाड्यांची रांग, मद्यधुंद अवस्थेतील "पर्यटक" (?), अंगावरच्या कपडयांचेही भान नसलेले "ज्येष्ठ नागरीक" (?), चिखलातच बसुन मटन/चिकन, दारू पिणारे आणि रस्त्याच्या कडेलाच धबधब्यात बेफाम होऊन नाचणार्‍या स्त्री/पुरूष (हो! स्त्रियासुद्धा!!!) यांचा हैदोस बघुन खरंच किळस वाटली. आतापर्यंत फक्त ऐकुन होतो याबद्दल पण प्रत्यक्षात बघितल्यावर जास्तच दु:ख झाले.
माझ्या लाडक्या माळशेज घाटाची अशी अवस्था बघुन खुप वाईट वाटले. नेहमी हिरव्यागार निसर्गाने बहरलेला, पांढर्‍याशुभ्र धबधब्यांना अंगावर खेळवणारा, बघताक्षणी मन प्रसन्न करणारा हा घाट, या गटारी साजर्‍या करणार्‍यांमुळे अक्षरशः काळवंडला होता.
नेहमीच आनंद देणारे धबधबे याक्षणी मला माळशेज घाटाचे अश्रु भासत होते. कदाचित सार्‍यांचे प्रताप बघुन धबधब्याच्या रूपात माळशेज घाट आपल्या अश्रुंची वाट मोकळी करत असावा. Sad

==================================================
==================================================
आता तुम्हीच ठरवा आषाढ अमावस्या कशी साजरी करायची.
"दिव्यांची पूजा" बांधुन कि "गटारात लोळण" घेऊन.

==================================================
==================================================

गुलमोहर: 

४,५ आणि ७ प्रचि गाडीतून्/बसमधून घेतले आहेत का?

दिव्याचा [२रा] आणि जागूचा एकदम मस्त फोटो....

योगेश, फोटोंचा विषय चांगला निवडलास! हा विरोधाभास डोळ्यांना कितीही खुपला, मनाला डाचला तरी सध्याचे वास्तव आहे! आणि ते मान्य न करणे म्हणजे आंधळेपणा ठरेल. गटारीचे हे स्वरूप गेली अनेक वर्षे आहे, पण सध्या त्याला उधाण आलंय! सरकारच्या महसूलवाढीच्या उदार धोरणामुळे दारूविक्री, दारू पिणे, तरुण पिढीत बोकाळलेली दारू हे तर खूपच सर्रास आहे. अगदी शाळकरी पोरेही आजकाल निवांत बियर वगैरे पीत असतात. त्यामुळे वेळीच पावले उचलली नाहीत तर ही दृश्ये अजून भीषण होत जाणार! मग माळशेज किंवा दुसरा कोणताही निसर्गरम्य देखावा म्हणजे दारुड्यांचा धिंगाणा घालण्याचा रस्ता/ अड्डा असा समज झाल्यास ते वावगे ठरू नये! सिंहगडावर मांसभक्षण व दारू पिण्यास परवानगी नाकारल्यावर त्याच्या पायथ्याशी आता अशा पार्ट्या बोकाळल्या आहेत. उद्या माळशेजमधे अशा पार्ट्यांवर बंदी घातली तर त्याच्या आजूबाजूने ते लोण फोफावेल.

योगेशच्या नेहमीच्या फोटोंप्रमाणे नजरेस सुखावणारे फोटो टाकून त्यावर छान छान प्रतिक्रिया देणे इथे अपेक्षितच नाहीय. 'गटारी' आणि 'दिव्याची अवस' यातला विरोधाभास दाखवणारे ते फोटो आहेत.
तो विरोधाभास हाच या फोटो फीचरचा उद्देश आहे. Happy हो ना रे योगेश?

तो विरोधाभास हाच या फोटो फीचरचा उद्देश आहे. हो ना रे योगेश?>>>>>अगदी खरंय ललिता. मला फक्त एक दिवस दोन वेगवेगळ्या प्रकारे कसा साजरा करतात तेच दाखवायचे होते. एक पूर्णपणे धार्मिक आणि दुसरा फक्त धागडधिंगा.
खरतर, ते प्रचि विभात प्रदर्शित केल्यामुळे असेल कदाचित, कारण प्रचि विभाग म्हटले तर येथे दर्जेदार फोटोच अपेक्षित असणार.

Pages