प्रकाशचित्र स्पर्धा क्र. ३ : 'आधार' स्पर्धा नियम

Submitted by संयोजक on 12 August, 2010 - 18:33

Prakshachitre_Adhaar_Poster2010.jpg

मग तो मानसिक असो, शारीरिक असो किंवा आर्थिक असो...आधार देण्याच्या मनात दाटलेली अपार कणव आणि तो स्वीकारणार्‍याच्या डोळ्यात साठलेली कृतज्ञता. असेच काही क्षण टिपूया या भागात.
प्रकाशचित्र स्पर्धा क्र. ३ : 'आधार'
*****************************************************
स्पर्धेचे नियम :

१. एका आयडीतर्फे एका विषयासाठी एकच प्रवेशिका स्वीकारली जाईल.
२. छायाचित्र स्वत:च काढलेले असावे.
३. स्पर्धेसाठी पाठवलेले छायाचित्र या आधी मायबोलीवर किंवा इतरत्र प्रकाशित झालेले नसावे.
४. कॅमेर्‍याच्या सेटींगचे तपशील (शक्य असल्यास) देणे अपेक्षित आहे, मात्र बंधनकारक नाही.
५. पिकासा, फोटोशॉप किंवा तत्सम फोटो एडीटींग सॉफ्टवेअर वापरण्यास परवानगी आहे. छायाचित्रात असे काही बदल केले असल्यास ते नमूद करावे.
६. फाईलचे आकारमान २०० kb पेक्षा जास्त नसावे व छायाचित्राची मोठी बाजू (लांबी/रुंदी) ७५० पिक्सेल इतकी असावी.
७. छायाचित्रांवर स्वतःच्या नावाचा किंवा वेबसाइटचा लोगो न टाकता मायबोली गणेशोत्सव २०१० असा लोगो टाकावा.
८. स्पर्धेचा अंतिम निकाल परीक्षकांच्या मताने ठरवण्यात येईल. तो स्वीकारणे सर्व स्पर्धकांवर बंधनकारक राहील.

प्रवेशिका कशा पाठवाल?
१. स्पर्धेसाठी प्रवेशिका पाठवताना ती गणेशोत्सवाच्या संयोजकांना sanyojak@maayboli.com ह्या पत्त्यावर इ-मेल करून पाठवणे अपेक्षित आहे.
२. तसेच इ-मेल पाठवताना photography spardha : Aadhar असे सब्जेक्ट मधे लिहावे. (एक नम्र विनंती : स्पेलिंगमधल्या चुका टाळण्यासाठी इथूनच कॉपी-पेस्ट करावे.)
३. संयोजकांना इ-मेल पाठवताना, छायाचित्राच्या फाईलचे आकारमान हे २०० kb पेक्षा जास्त नसावे. छायाचित्राची मोठी बाजू (लांबी/रूंदी) ७५० पिक्सेल अशी हवी.
४. स्पर्धेसाठी छायाचित्र पाठवताना इ-मेलमध्ये छायाचित्राची प्रत जोडावी. त्याचबरोबर मायबोली आयडी लिहावा. छायाचित्राला शीर्षक असेल तर चालेल, बंधनकारक नाही.
५. प्रवेशिका संयोजकांना इ-मेल केल्यानंतर ती स्पर्धेच्या धाग्यावर प्रकाशित होण्यास २४ तासाची मुदत द्यावी. २४ तासानंतरही तुमची प्रवेशिका दिसत नसेल तर संयोजकांना इ-मेलद्वारे कळवावे.

प्रवेशिका स्वीकारण्यास गणेश चतुर्थीला सुरूवात होईल व अनंत चतुर्दशी पर्यंत स्वीकारल्या जातील.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्यवाद संयोजक,
एक शंका
आधार देण्याच्या मनात दाटलेली अपार कणव आणि तो स्वीकारणार्‍याच्या डोळ्यात साठलेली कृतज्ञता. असेच काही क्षण टिपूया या भागात.>>>>> या विभागात फक्त व्यक्तिचित्रण अपेक्षित आहे कि निसर्गचित्रही चालतील.

नाही फक्त व्यक्तिचित्रणच अपेक्षित नाही. निसर्गचित्रही चालेल फक्त ते विषयाला धरूनच असायला हवं.

प्रचि स्पर्धेचे सगळेच विषय मस्त आहेत.. पण प्रचि हे नक्की विषयाला अनुसरुन नक्की आहे का हे ठरवणे म्हणजे आव्हानच.. तेव्हा स्पर्धकांबरोबर परिक्षकांनादेखील शुभेच्छा... Proud

योरा.. अगदी खरं आहे तुझं , पण विषय मात्र भन्नाटच आहे. कल्पनातून आपल्याला हवे तसे विश्व निर्माण करता येते ना मग अश्या कल्पनांनी गणेश उत्सव खर्‍या अर्थाने उत्साहास साजरा होईल यात तीळमात्र शंका नाही.

प्रवेशिका स्विकारण्यास गणेश चतुर्थीपासून (११ सप्टेंबर) सुरुवात होईल व प्रवेशिका अनंत चतुर्दशीपर्यंत (२२ सप्टेंबर) स्वीकारल्या जातील. दिलेल्या तारखेआधी व तारखेनंतर कोणतीही प्रवेशिका स्वीकारली जाणार नाही. कृपया नोंद घ्यावी.

नमस्कार संयोजक मंडळी,

गणेशोत्सवा निमित्त आयोजित केलेल्या प्रकाशचित्र स्पर्धा - आधार साठी माझी प्रवेशिका पाठवली आहे.

धन्यवाद,

लाजो