अवघी विठाई माझी (१९) मांसाचे फळ - टोमॅटो

Posted
9 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
9 वर्ष ago
Time to
read
1’

100_0718.JPG

कांद्याच्या खालोखाल आपल्या जेवणात मानाचे स्थान मिळवून बसलेली भाजी
म्हणजे हे मांसाचे फळ, अर्थात टोमॅटो. हे फळ आपल्याकडे पहिल्यांदा आले
त्यावेळी त्याला मांसाचे फ़ळ असेच म्हणत असत. आणि आजही आपण त्याला
देवाच्या नैवेद्यात स्थान दिलेले नाही.

आपण बाजारात गेलो, कि थोडे का होईना टोमॅटो घेऊन येतोच. कुठल्याही
भाजी आमटीत ते वापरता येतात. शिवाय आपली ती खास कांदा टोमॅटो कोशिंबीर
आहेच.
आपल्याकडे टोमॅटोच्या स्वादाबाबत आग्रह धरला जात नाही. झाडावर पिकलेला
टोमॅटो खुपच स्वादिष्ट लागतो. पण आपल्याकडची वाहतूक व्यवस्था बघता, असे
शक्य होत नाही. पिकायच्या बेतात आलेले टोमॅटोच खुडले जातात. बाजारात येईपर्यंत
ते पिकून लाल होतातही, पण स्वादाला ते जरा कमी होतात.
तशी टोमॅटोची चव म्हणजे उमामी. हि चव असते, चीज, सोया सॉस, मानवी दूध
अश्या काही पदार्थांची. टोमॅटोचा आणखी गुणधर्म म्हणजे शिजवल्यावर ना त्याचा
रंग बदलत ना स्वाद. त्यामूळे ज्या पदार्थात तो वापरु, त्याचा स्वाद खुलतो.
आपल्याकडे साधारण एकाच रंगाचे व आकाराचे टोमॅटो मिळतात. वरच्या फ़ोटोतले
सुंदर रंगाचे आपल्याकडे दिसले नाहीत कधी.
भल्यामोठ्या आकाराचा बीफ़स्टेक टोमॅटो आपल्याकडे पुर्वी दिसायचा. साधारण १०
सेमी व्यासाचा हा टोमॅटो, चांगलाच दळदार असतो. चेरी टोमॅटो आता आपल्याकडे
दिसतात. पण तेही नेहमीच्या रंगातच. या प्रकारातही, एक वाईन रेड रंग दिसतो.

100_0849.JPG

भारताच्या उत्तरेकडे आंबटपणासाठी टोमॅटोच वापरला जातो. कांदा आणि टोमॅटोची
आपली ती खास ग्रेव्ही, नूरजहाँ राणीने शोधून काढली असे म्हणतात.
तसे टोमॅटोचे अनेक खास पदार्थ आपण करतो. सूप, सार, भूर्जी करतोच, पण
टोमॅटोचा ज्य़ुस आपल्याकडे तितकाचा प्यायला जात नाही. ताजे टोमॅटो मिक्सर
मधून काढण्यापेक्षा, जो तयार ज्यूस मिळतो, त्याला जास्त चांगला स्वाद असतो.
त्यात थोडिशी साखर, मीठ, चिमूटभर लाल तिखट किंवा मिरपूड (सोसत असेल
तर टॅबेस्को सॉस ) बर्फ़ाचे खडे आणि ताजा पुदीना, वापरुन केलेले पेय,
ताजेतवाने करते. (विमानातले माझे हे आवडते पेय.)

100_0965.JPG

वरच्या फ़ोटोतले मंद मलाई का साग, हि वहिदा रेहमानच्या आवडीची भाजी.
त्यासाठी तीन चार कांदे अगदी बारीक चिरुन, लोण्याच्या जिर्‍याच्या फ़ोडणीवर
परतायचे. अगदी मंद आचेवर गुलाबी करायचे. मग त्यात अगदी थोडी हळद
व लाल तिखट घालून, बारीक चिरलेले तीन चार टोमॅटो टाकयचे, तेही मंद
आचेवर शिजवून छान एकजीव करुन घ्यायचे. थोडे मीठ घालून, त्यावर क्रीम
टाकायचे (कुठलेही क्रीम चालेल, मी डबल वापरले आहे.) क्रीम टाकल्यावर मात्र
भाजी उकळायची नाही, गरम झाले कि पुरे. मग जरा निवल्यावर हिरवी मिरची
बारीक चिरुन टाकायची. सोबत पुदीना पराठा आहे. या भाजीत जास्त मसाले
वापरु नयेत. क्रीमच्या जागी, कोकोनट क्रीम चालेल, पण चव अर्थातच वेगळी
लागेल.

Solanum lycopersicum हे टोमॅटोचे शास्त्रीय नाव. हे बटाटा, वांगे
मिरची यांचे कूळ. वांगे आपल्याकडे आधीपासून असले तरी, बटाटा, मिरची व टोमॅटो
पोर्तूगीजांनी आणले असण्याची शक्यता आहे.
टोमॅटोचे उगमस्थान दक्षिण अमेरिका, खास करुन पेरु. तिथून ते स्पॅनिश लोकांनी
जगभर नेले. पण पुर्वी युरपमधेहि त्याला विषारी समजत असत. कदाचित टोमॅटोच्या
मूळ जाती विषारी असण्याची शक्यता आहेही. पण आज दिसणारे मोठे, रसदार
फळ मात्र मानवी प्रयत्नाचे फलित आहे. एकंदर ७,५०० जाती लागवडीखाली आहेत.

सध्या भारत हा एक महत्वाचा उत्पादक देश आहे, पण आपल्याकडे अजून तो
टिकवण्याचे प्रयत्न होताना दिसत नाहीत. टोमॅटो पावडर, उन्हात वाळवलेले टोमॅटो
अजूनही आपल्याकडे मिळत नाहीत (कच्चे टोमॅटो मात्र बहुदा आपल्याकडेच आवडीने
खाल्ले जातात. )

टोमॅटोला उष्ण हवामान लागते. त्याचे झाड रस्त्याच्या कडेने उगवलेले दिसते. पण
त्याला नीट आधार दिला, तर ते छान वाढते.
टोमॅटोमधे क्षार आणि लोह भरपूर प्रमाणात आढळून येते. टोमॅटोमध्ये मॉलिबडेनम, जीवनसत्त्व ब 1, फोलेट, लोह, नियासिन, जीवनसत्त्व क, मॅंगेनीज, फॉस्फरस, जीवनसत्त्व इ, जीवनसत्त्व अ, पोटॅशियम असते. तसेच लायकोपेन हे अँटीऑक्‍सिडंट पण आढळते. लायकोपेन या अँटीऑक्‍सिडंटचा उपयोग कर्करोगाच्या पेशींच्या विरोधात लढण्यास होतो. लायकोपेनचा ब्रॉंकायटिसवर उपयोग होतो तसेच रक्ताभिसरण क्रिया योग्य ठेवण्यासाठी त्याचा उपयोग होतो. टोमॅटो उकडल्याने किंवा उष्णतेने लायकोपेन नष्ट होत नाही म्हणून प्युरी, केचप हे पदार्थही आपण वापरू शकतो. लायकोपेनमुळे ऍन्टिट्यूमर गुणधर्म निर्माण होतात. म्हणूनच कोलॅन आणि प्रॉटेस्टसारख्या कर्करोगात प्रतिबंधात्मक कार्य होते, असे संशोधनातून आढळले आहे. टोमॅटो सर्व वयोगटांस उपयुक्त आहे. गर्भवतीपासून वृद्धांपर्यंत सर्वांनी टोमॅटो खावा. मात्र मुतखडा, सूज, संधिवात, आम्लपित्त अशा आजारांत डॉक्‍टरांचा सल्ला घेऊनच टोमॅटो वापरला जावा.

विषय: 
प्रकार: 

आता दोन आठवडे रजा बरं का. मित्रमैत्रिणींना भेटून ताजातवाना होतो, मग आणखी काहि भाज्या सादर करतो.

ताजे टोमॅटो मिक्सर
मधून काढण्यापेक्षा, जो तयार ज्यूस मिळतो, त्याला जास्त चांगला स्वाद असतो.
त्यात थोडिशी साखर, मीठ, चिमूटभर लाल तिखट किंवा मिरपूड (सोसत असेल
तर टॅबेस्को सॉस ) बर्फ़ाचे खडे आणि ताजा पुदीना, वापरुन केलेले पेय,
ताजेतवाने करते. (विमानातले माझे हे आवडते पेय.) >>>>> काय सांगता? मी सुध्दा विमानप्रवासात टोमॅटो ज्यूसच पिते. खूपच आवडतो. गंमत म्हणजे तोच घरी प्यायला एवढी मजा येत नाही. का कोण जाणे!

दिनेशदा, तुमची या सदरातली अनुपस्थिती नक्कीच जाणवेल - तरी तुम्ही आणखी नविन सादरीकरण करणार ह्या बातमीने आनंद वाटला. वाट पाहू तुमच्या नविन पोस्टीची! मला वाटतं तुमची पोस्टस ज्या सगळ्यांना आवडतात त्या सगळ्यांना असेच वाटेल.

अमी

टोमॅटोमध्ये व्हायटामिन A, C, K जास्त प्रमाणात असतात. पण लोहाचे प्रमाण अगदी नगण्य असते. तसेच कॅल्शिअमचे सुद्धा.

सही.. माझ्याकडे पण यावेळी खूप heirloom टोमॅटो लागले आहेत. टोमॅटो , ताजे मॉझरेला चीज, बेसिल आणि किंचित ऑलिव्ह ऑईल. यमी अगदी Happy

आमच्या फार्मर्स मार्केटमधले चेरी रेड, स्वीट यलो आणि चेरोकी पर्पल.

washt_0.jpgrangit.jpg

हिलिबिली-
hillibilli.jpg

घरचे हिरवे
bingreen.jpggreentomato.jpg

भरुन-
cutgreen.jpgfilled.jpggrilled.jpg

उलट्या झाडाचे टोमॅटो लागलेत पण अजून लहान आहेत.

काय भरलंस हिरव्या टोमॅटो मध्ये?

तसंच एक शंका, कच्चे टोमॅटो म्हणजेच हिरवे टोमॅटो का की हिरवे टोमॅटो अशी वेगळी जातच असते?

मस्त लेख आणि ती ग्रेव्ही पण खासच Happy
बाकी सशलने माझे दोन्ही प्रश्न आधीच विचारले आहेत त्यामुळे ते परत विचारत नाही.

चीज पण घरीच करतेस का ? >> नाही गं ते मात्र शोधून आणायच ताजं ताजं..:)
कच्चे टोमॅटो म्हणजेच हिरवे टोमॅटो का की हिरवे टोमॅटो अशी वेगळी जातच असते? >> सशल, माझ्याकडे एक हिरव्या टोमॅटोची जात आहे. ते लाल टोमॅटोपेक्षा गोड आहेत. पण कितीही मोठे झाले तरी हिरवेच रहातात.. (Aunt Ruby’s German Green). लालुच्या फोटॉतले मात्र बहुतेक हिरवे टोमॅटो वाटतायत. हिरव्या जातीचे नाही.

सशल तु ज्या ग्रीन टोमॅटो बद्दल बोलती आहेस ते टोमॅटीलो. मेक्सिकन फुड मध्ये वापरतात. अतिशय आंबट असतात. सालशा मध्ये भरपुर वापरतात. याची एकदा कच्च्या टोमॅटोसारखी भाजी मी केलेली. इतकी आंबट झालेली कि टाकून द्यावी लागली.
कच्चे टोमॅटो हे ग्रीन(च) असतात. पण ग्रीन टोमॅटो म्हणजे कच्चे टोमॅटो असतीलच अस नाही. Proud (चु.भु.दे.घे.)

.

लालू, हिलिबिली मी खुप शोधला पण नाही मिळाला.
ते भरलेले टोमॅटो, ढेमस्यासारखे दिसताहेत. मस्त.
रचना, पिकूनहि हिरवे राहणारे टोमॅटो, मलापण नवीन.

मस्त लेख! Happy

मला शाळेत 'कार्यानुभव'ला बागकाम होते त्यात टोमॅटोचे रोप लावणे, त्याची जोपासना वगैरे करायचे होते. मी लावलेल्या रोपाला इतके सुंदर टोमॅटो लगडले होते, की परीक्षक बाईही खूष झाल्या! Happy मात्र दुसर्‍या दिवशी शाळेच्या गच्चीतल्या त्या झाडावरचे टोमॅटो अलगद गायब झाले होते!!!

टोमॅटोचे ग्रामीण/ अपभ्रंशित उच्चार देखील मजेशीर असतात. टमाटर, टंबाटू, टामाटू, टमाटा, ट्यॅम्यॅटो .... Proud
माझी आजी त्याला थेट 'टोमॅटो' असे म्हणायची नाही. (तिच्या लहानपणी, कोकणातल्या घरी टोमॅटो खाण्यावर बंधने होती!) ती त्याला 'लाल बटाटा' किंवा 'लाल वांगं' अशा सांकेतिक शब्दाने उल्लेखायची.

स्नेहा ती वरीलप्रमाणेच. क्रीम घालायचे नाही, फोडणीला आवडते मसाले टाकायचे. (मला बडीशेप आवडते ) तिखट जरा जास्त. मग त्यात हवे तर दाण्याचे कूट घालायचे. (पनीर वापरले तर पनीर भुर्जी होईल.)

माझ्याकडचे हिरवे कच्चे आहेत. पिकून लाल होतात.
'स्ट्फ्ड' साठी तुमचे आवडीचे सारण भरु शकता. त्यात टोमॅटोचा काढलेला गरही वापरता येईल किंवा मग त्याची चटणी, कोशिंबीर करुन भरायला दुसरे काही चालेल. कांदा, बटाटा, चीज, ब्रेडकम्स, खोबरे, कोथिंबीर, दाण्याचे, तिळाचे कूट आणि आवडीचे मसाले यांचे कसेही कॉम्बिनेशन करुन.

दिनेश, तुमची रजा होती ना दोन आठवडे?

Pages