उरलेल प्रेम... भाग ५ अंतीम

Submitted by किश्या on 11 August, 2010 - 01:28

http://www.maayboli.com/node/18410 भाग १ साठी.
http://www.maayboli.com/node/18421 भाग २ साठी.
http://www.maayboli.com/node/18476 भाग ३ साठी.
http://www.maayboli.com/node/18551 भाग ४ साठी.

आम्ही बराच वेळ बसुन परत येताना, रसीकाचा पाय खड्यात गेल्यामुळे मुरगळला आणी तीला हताला धरुन घेउन येत असताना. श्रुती आमच्या मधे मधे करत होती. मला काही कारणच कळेना. घरी आल्या आल्या........

"मावशी हे दोघे नवरा बायको सारखं चालत होते."
"काय?" आम्ही दोघेही किंचाळलो.

आणी थोड्यावेळाने आम्ही सगळेच हसायला लागलो.
लगेचच अभय अन् रघु दारात आले.
"चला."
ते बघुनच मला अंदाज आला होता की कुठे जायच आहे ते. मी गपचुप त्यांच्या पाठीमागे नीघालो. लगेचच मागुन रसीका म्हणाली.
"लवकर ये रे."
"हो."
आम्ही परत गंगेच्या काठाला आलो, मस्त सीग्रेट पेटवली दोन हार्ड कश मारुन जरा तरतरी आली.
"का रे, तुला रसीका आवडते का?" अभय.
"छे रे. काहीही काय म्हणतोस. ती मुंबईची आहे, कदाचीत तीचा स्वभाव मोकळा असु शकतो मी ऊगाचच गैर समज करुन घेत आहे."
"तुला एक गोष्ट सांगु का?" रघु.
"हं.."
"तु तिच्यात जास्त अडकु नकोस. ती तुझ्या लायकीची नाही."
"असं का म्हणत आहेस?"
"नाही रे, तस नाही पण तीच मुंबईला नक्की कोणीतरी असणार, म्हणजे boyfriend वगैरे. असं आज काल तरी शक्य नाही की मुंबईच्या मुलीला कोणीच boyfriend नसावा."
"मलाही तेच वाटत आहे. " अभय.
"नाही रे. ती तशी नाही. ती खरचं खुप गोड आहे." मी.
"बरं एक काम करं तीला काहीच बोलु नको, म्हणजे तीला propose तु करु नकोस जे व्हायच असेल ते होऊदे, आणी please तु तिच्या बाबतीत जास्त भावणिक राहु नकोस."
"हं... सोडा चला घरी."
"कोणी तरी वाट पाहत आहे बुवा." टोमणा आलाच.

*****************************************************
असं होत होत सात आठ दिवस नीघुन गेले. तीच्यात अन् माझ्यात बराच मोकळेपना आला होता. मी तीच्या साठी बाहेर जाणे पण सोडुन दिले होते. मी घरीच आसायचो. एकच दिनक्रम असायचा सकाळी उठने, खाणेपीणे अन् आईला पीडणे. तिचा अन् माझा काही ना काही गोंधळ चालु असायचा, या दरम्यानं मी तीच्यात चांगलाच गुंतलो होतो. खरं तर मनात रघुचे अन् अभय चे वाक्य ही घुमत होते ते डोक्याला पटतं पण होते. पण म्हणतात ना मनापुढे काही चालत नाही म्हणुन, माझही काहीस तसचं झालं होतं.
आणी एक दिवस तीला जायची वेळ आली. एके दिवशी संध्याकाळी.

"अरे विजु, रसीकाच्या पप्पाचा फोन आला होता. तीला परत बोलवल आहे, तर तीला एकटीला नको पाठवायला, तु जाशील का मुंबईला? सोडुन ये तीला अन् तुही मुंबई बघुन ये." पपा.
"काय? राहुद्याना पपा हीला इथे आत्ताच तर आली आहे ती."मी.
"अरे आत्ताच कुठे? ७ दिवस झाले की. तीच्या पपाला करमत नाही बाबा रसीका शीवाय."

माझी अन् रसीकाची एकदाच नजरानजर झाली. तीच्या डोळ्यात पाणी पाहुन मला कसतरीचं झालं.
"ठीक आहे. मी जातो."
त्या रात्री आम्ही एकमेकांना काहीच बोललो नाही. रात्री जेवणं ही गेल नाही.
माझ्या मनात फार कसतरी होते. काहीतरी चुकल्या चुकल्या सारखे वाटत होते. रात्र तशीच जागण्यात आणी विचार करण्यात गेली.
दुसर्‍या दिवशी दुपारी नीघण्याची तयारी झाली. आम्ही तालुक्याला आलो. रात्री १० वाजता बस होती. बसच reservation केले होते म्हणुन जागेचा प्रश्न आला नाही. बस निघाली. तास दिड तास कोणीच काहीच बोललो नाहीत.
"मला मुंबई ला गेल्यावर तुझी फार आठवण येईल." रसीकाचा हळुच आवाज आला.
".........."
"थोडे दीवस आजुन थांबली असतीस तर बरं झालं असतं"
"नाही रे पपा ला नाही करमत माझ्याशीवायं."
"मग आता काही बोलायला काही point च नाही."
"......." बहुतेक तिच्याकडे बोलायला आता काहीच नव्हतं.

परत बराच वेळ शांततेत गेला.
"तुला एक विचारु का?"
"मला माहित आहे तुला काय विचाराच आहे ते."
"तुला कसं काय माहीतं?"
"आपल्या माणसाच्या मनातलं जाणुन घ्यायला, बोलायची गरज पडत नाही."
"म्हणजे काय?"
"काही नाही, हं तु विचार काहीतरी विचारणार होतास ना?"
"काही नाही."

बराच वेळाने शांत बसुन तीने अचानकच विचारलं.
"तुझं माझ्या वर प्रेम आहे ना? "
"काय?"मी जवळजवळ कींचाळलोच.
"खंर सांग. खोटं अजीबात बोलायच नाही."
"माहीत नाही."
"तुला माहीत नसेल पण......."
"पण काय?" मी
".........."

"सांग ना, पण काय?" मी
"I LOVE YOU."

मी फार खुश झालो होतो. खर तर त्या वेळेस शब्दच नव्हते माझ्याकडे काही बोलायला. मी नुसताच तीच्याकडे पाहात होतो. त्या वेळेस ती मला नीरागस मुली सारखी वाटली. असं वाटल की तो क्षण कधीही पुढे जाउ नये.
"तु मझ्याशी लग्न करशील ना?"
"हे काय विचारणं झालं? मी तर तुला पाहील्याच्या दिवशीच तुझ्या प्रेमात पडलो होतो."
"ते मला दुसर्‍या तीसर्‍या दिवशीच कळाले होते."
"कस काय?"
"मी तुला माझ्या आनंदबद्दल सांगीतले होते. तेव्हा."
"तेव्हा कस काय?"
"कळाले, मुलीनां 6th sence असतो."
"बरं बाई"
"पण, मी आपल लग्न झाल्यावर job करणार बरं का?"
"हो, कर ग तुला कोण आडवतय."

अशा गोड गप्पात मुंबई कधी आली समजलच नाही. सकाळी मुंबईला उतरल्यावर. घरी जावुन त्याच दिवशी मुंबई बघायला बाहेर पडलो. खुप भटकलो, सगळी मुंबई पालथी घालुन झाली. movie पाहीला. ते विश्वच माझ्यासाठी नवीन होत आणी भटकाला माझी होणारी जीवणसाथी. ती खुप काळजी घेत होती माझी. असं माझ्या आयुष्यात पहील्यांदाच होत होत.

एके दिवशी संध्याकाळी चर्चगेट ला.
"मला उद्या नीघायला हवं."
"का रे जाशील ना, रहा ना काही दीवस."
"नाही गं गेल पाहीजे. मला खुप कामे आहेत."
"हो का? कसली. माझ्यापेक्षा महत्वाची?"
"हो ना. आता मला लवकर माझ शीक्षण पुर्ण करुन job करायचा आहे आणी तुझ्यासोबत लग्न करायच आहे."

हे म्हणताच ती फार गोड हसली.
...............................................आणी त्याच दिवशी रात्री मी मुंबई सोडली. एक नवीन धेय्य घेउन............मनात तीच प्रेम घेउन.

*****************************************************
आज पाच वर्षानंतर..................
(पुणे, ऑफीस)
माझा cellphone वाजला, बघीतला तर रसीकाच्या भावाचा होता.
'अरे, ह्याचा फोन कसा काय?'
"हॅलो."
"अरे रसीकाच लग्न ठरल आहे, आनंद सोबत तु ये या महीन्याच्या १६ तारखेला."
"ठीक आहे मी बघतो. मी meeting मध्ये आहे तुला नंतर call करतो, bye."
मी फोन कट केला.
*****************************************************
काय शॉक बसला. पुढे मी परत आल्यावर तीने संर्पक तोडला. आमचा काहीच संर्पक राहीला नाही मी मात्र ती आज ना उद्या call करेल याच आशेवर आज पर्यंत होतो. पण आज ती ही आशा संपली, तीने त्या आनंद सोबत लग्न केले आज ती ही पुण्यात आहे. मी ही आता एक soft. engg. झालो आहे. मी खुश आहे पण एकच खंत आहे की मी तीला त्या नंतर तीला काही विचारु शकलो नाही अन् अजुनही तिला माझ्या मनातलं तीच उरलेल प्रेम तीला दाखवु शकलो नाही.

समाप्त..................
*****************************************************
टीप :- माझी पहीलीच वेळ आहे कथा लिहण्याची. ही कथा थोडीशी काल्पणीक आसुन बरेच काही सत्य आहे. जर तुम्हाला ही कथा रटाळ वाटली किंवा भरकट आहे असं वाटल तर क्रपया आपल्या सुचनांच स्वागत आहे. अपेक्षा ठेवतो की तुम्ही मार्गदर्शन कराल.

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

चिंगी ती माझ्याशी खोटं बोलली होती.....
हे मला त्या दिवशी कळालं ज्या वेळेस तीच्या भावाचा फोन आला होत..>>
बाप रे, तिला जर त्याच्याशी लग्न करायचं होतं तर मग तो मेला, हे इतकं मोठं खोट कसं काय बोलली ती??:(

आनंद Dead... आनंद जिवंत... अपुर्ण प्रेमाचा शेवट असाच करावा लागतो
.
....शेवट जरा घाइत केल्या सारखे वाटले, असो लेख छान आहे,
smileyvault-cute-big-smiley-animated-023.gif

ए शेवट असा नसावा यार , मला वाट्त तिला लगेच खोट ठरवु नकोस किती ही झाल तरी तिनं तुला मुम्बइ दावली व्हती..........मग तव्हा आनंद ?

एक नम्बर,

भावा, खुप म्हणजे खुप लवकर सपवलिस, अजुन २ भाग चालले असते.

वाईट वाट्ले, पण, पहिल्या प्रेमाचा शेवट बहुदा असाच होतो ...

या कथेइतकी ग्रेट कथा आजतागायत वाचली नव्हती. पहिल्या लिखाणातच बुकरची मजल गाठलीये तुम्ही. यापुढे काही लिहिलं नाहीत तरी चालेल असं महान लिहून गेला आहात तुम्ही.

किश्या, तुमचा हा पहीलाच प्रयत्न आहे...त्यामुळे प्रोत्साहन तर देतोच आहे. त्याच बरोबर एक अनाहूत सल्लाही देतो. मायबोलीवर गुलमोहोर नावाच्या विभागात फेरफटका मारा व तिथल्या जुन्या, जाणत्या लेखकांच्या कथा, कवीता वाचा. प्रोत्साहन तर मिळेलच, पण तुम्हाला तुमच्या कथेच्या (पटकथा आणि लिखाण) दर्जा बाबत सत्यता लक्षात येईल.....आणि पुढील लेखनात "असं आज काल तरी शक्य नाही की मुंबईच्या मुलीला कोणीच boyfriend नसावा." अशी घाउक वाक्ये टाळा, तुमच्या नकळत तुम्ही बर्याच जणांच्या भावना दुखवत असाल...असो...
पुलेहाशु

नीधप तु मला टोमणा मारत आहेस का? >> तुला अजुन शंका आहे का ? Wink
अरे पण तुझा पहीला प्रयत्न आहे... अजुन सुधारणा होईल, विनायक चा सल्लाही योग्य आहे.
कथा वाचताना अर्धवट सोडुन द्यावि असे वाट्ले नाही... हे पहिले यश ...
कथा फुलविता अली असती अजुन चांगली .... पण चांगला प्रयत्न होता ...
पुलेशु

"असं आज काल तरी शक्य नाही की मुंबईच्या मुलीला कोणीच boyfriend नसावा." अशी घाउक वाक्ये टाळा, तुमच्या नकळत तुम्ही बर्याच जणांच्या भावना दुखवत असा,>>>
हे वाक्य एका खेड्यात रहाणार्‍या मुलाचे आहेत. अशी भावना आज काल खेड्यात सर्वच तरुनांमधे आहे. थोडासा गावकीपणा यावा म्हणुन ते वाक्य टाकल आहे.
कुणाच्या भावना दुखावल्या असतील तरं मोठ्या मनाने क्षमा करा...

अजब प्रेम की गजब कहाणी!

किसन राव आपल्याला गोष्ट पटली त्याही पेक्षा तुमच्या मित्रांचा सल्ला योग्य होता हे शेवटी खर झाल्याचे समाधान वाटले.

किश्या, कथा सुन्दर तर होतीच पन मलासुद्ध्हा अस वाट्ल कि खुप लवकर सान्गता केलीस....
मस्त रन्ग चढ्ला होता रे....... आणि तेवढ्यात सन्पली पण.... Sad अजून खूप वाचायची ईच्छा होती) असो....
पहिलाच प्रयत्न होता, पण खरच सान्गतो खूप छान होता मित्रा..... पुलेशू..... )

विनायक, पुढील लेखनात "असं आज काल तरी शक्य नाही की मुंबईच्या मुलीला कोणीच boyfriend नसावा." अशी घाउक वाक्ये टाळा, तुमच्या नकळत तुम्ही बर्याच जणांच्या भावना दुखवत असाल>>>>> मला या वाक्याचा नक्की सन्दर्भ कळाला नाही. मझ्यामते तरी त्याने (मुंबईच्या मुलीला कोणीच boyfriend नसावा) अस बोलून सत्य परिस्थितीच मान्ड्ली आहे.... मला तरी यात काही वावग दिसत नाही आणी त्यमुळेच की काय, कुणाच्या भावना दुखावल्या जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.... असो हे माझ मत.........
तुमच्या प्रतिक्रियेच्या विरोधात नाही मी, पण एक माझा विचार मान्डला........

thanks स्मितहास्य.खर तर ह्या कथेचे श्रेय माझ्या एका जवळच्या मीत्राला जाते.कारण त्यानेच मला लीहण्याला भाग पाडले. डोक्यात आजुन एक दोन "कीडे" आहेत बघुयात कधी लिहुन होतात ते..

कथा ठीक... पहीला प्रयत्न स्तुत्य होता... सुधारणेला वाव आहे. आशा आहे आण्खी चांगलं वाचायला मिळेल तुमच्याकडून.
डोक्यात आजुन एक दोन "कीडे" आहेत बघुयात कधी लिहुन होतात ते..>>वळवळू द्या किडे लवकर Happy

पक्का?? लॉक किया जाय?? Light 1

by the way संपुर्ण कथा नाही आवडली, पण मधे मधे वर्णन / प्रसंग / संवाद चांगले आहेत.
प्रयत्न करत रहा. जमेल. शुभेच्छा.

प्रयत्न चांगला आहे. हळूहळू सफाई येईल. लिहिते रहा. किडे वळवळू देत म्हणजे लिखाण होईल. कथेत जर्म शोधायचा असतो खरं काय किंवा खोटं काय नव्हे. जो तो ज्याचा त्याचा अनुभव मांडत असतो किवा विषय. त्याची मांडणी,स्टाइल, फिनिश बघा म्हणजे झाले.

ही कथा थोडीशी काल्पणीक आसुन बरेच काही सत्य आहे.>> खरेच?
सकाळी चहा बनवून देणारी आणि दुपारी एका ताटात जेवणाचा हट्ट करणारी मुलगी? पटेल असेच फेका राव. उगाच टुकार पिक्चर पाहुन लिहायला बसु नका

Pages