उरलेल प्रेम... भाग २

Submitted by किश्या on 4 August, 2010 - 06:32

http://www.maayboli.com/node/18410 भाग १ साठी.

खरं तर मला भीती वाटत होती घरी जाण्याची कारण, तिने जर का मला काही विचारल असतं तर माझ्याकडे तिला सांगण्यासारख काहिच नव्हतं. कारण, मी काही हुशार नव्हतो, माझे कपडे ही चांगले नव्हते. मुख्य म्हणजे मला इंग्लीश चा प्रोब्लेम होता.( सीनेमे बघुन बहुतेक.)

आणी मी तिला काय बोलणार होतो?
डोक्याचा पार भुगा झाला होता.मग विचार केला, अरे आपन येवडा कशाला विचार करत आहोत? नंतर लक्षात आल कि ती मला आवडली होती.
'च्यायला हे काही बरोबर नाही, तु कुठे आनं ती कुठे.'
तेवठ्यात समोरुन रघु येताना दिसला.
"चल येतोस का? थोडावेळ गंगेला बसुन येउ परत, जाताना सिग्रेट घेउन जाउ"
"चला"
सिग्रेट घेउन येताना प्पपा समोरच आले.
"ये अरं इकड कुटं फिरायला ? घरी जा."
"थोडया वेळने जातो." घाबरत चाचरत तेथुन नीघालो ते थेट घाट वर.
शांत संध्याकाळ झालि होती. मस्त एका जागेवर बसुन सिग्रेट पेटवली.
"अरे रघु एक मुलगी आली आहे यार घरी. फार छान आहे दिसायला."
"कुठुन आली आणी कुणाबरोबर?"
"मुंबई ची आहे. प्पपा बरोबर आलि आहे. लग्नाला गेले होते. अनं कशी आली माहित नाही."
"काय विचार काय आहे?"
"च्यायला विचार काय असनार? आपल कुठे नशीब चांगले आहे."
"मग जास्त विचार करु नकोस, सोड रे आनं ति तरी तुला पसंद करनार आहे? राहिल दोन दिवस आणी जाईल नीघुन."
" ते बरोबर आहे रे, पण...."
"सोड रे, जा घरी नाहितर म्हातारा ओरडेल तुझा, सकाळी उठ लवकर आनि गंगाला ये"
"ठीक, चल भेटु"

घरी यायला ८ वाजुन गेले. जेवणाची तयारी चालु होती. घरी गेल्या गेल्या तिच समोर आली.
"अरे विजु कुठे गेला होतास? किती बोर झाले आहे मी. काकु याला सांगा कि माझ्या बरोबर रहायला. नाहीतर मी एकटी काय करणार ईथे?"
"मी...............??"
"हो तुच"
"मी...........??"
"अरे मी मी काय लावलस हे, हीला ओलखत नाहिस का?" दादा.
"नाही"
"अरे ही ना प्रकाश काकांची मुलगी आहे. लग्नात म्हाणाली की मी गाव कधी बघीतलेल नाही तर मग मीच म्हणालो की चल म्हणुन, तर हीला गाव दाखवण्याची जबाबदारी तुझी."
"..................................."
मी मनातल्या मनात खुश.... चला ओळख होइलच.
रात्री मस्त जेवुन गच्ची वर झोपायला गेलो. कुठे तरी रेडीओवर गाणे लगले होते, 'प्रथम तुझ पाहता, जीव वेडावला...' आणी गोड विचार करता करता झोप कधी लागली कळालच नाही.
*****************************************************

अचानक कोणी तरी माझ्या कानात पाणी टाकले, उठुन बघतो तर समोरच रसीका उभी, घड्याळात पाहिले तर सकाळचे ६:३० वाजले होते. मस्त छान नदीवरुन येणारा वारा सुटला होता. सुर्य ही अर्धवट वर आला होता जणु काय तो ही आत्ताच उठला होता. आणी येनार्‍या वार्‍याचा उपभोग घेत होता. अश्या रोमँटीक वातवरणात समोर ती उठली होती. टवटवीत फुला सारखी, गालवर लोळणारे केस, डोळ्यात चमक, आणी ओठावर आत्ताच पिलेल्या दुधाचा एक थेंब, नाईट ड्रेस अगांवर चढवुन समोर हसत उभी होती.

"उठ ना आता, कीती वेळ झोपतोस?"

खरं म्हणजे मला ईतक्या सकाळी कोणी उठवत सुद्दा नाही, कारण मला खुप राग येतो, आणी मी कोण आहे हे न बघता त्याला कहीही बोलतो. म्हणजे आई प्पपा सुधा नाही. कारण घरचा मी शेंडे फळ ना. मग घरी काम करणार्‍या बाई ची काय टाप.

"काय काम आहे? १० मि. झोपु देत."
"अरे उठ रे" असं म्हणत तीने माझ पांघरुन ओढायला सुरुवात केली.
"काय यार ह्यो ताप आहे?"
"काय मी ताप देते?.......तर मग हे घे."
त्याच वेळेस सगळ पाणी माझ्या डोक्या वरुन खाली पडत होत.

'च्यायला हीच्या'
मनात तर भरपुर राग आला होता पण सांगनार कुणाला?
'चल उठा राजे आता ७:३० ला गंगाला जायच आहे'
मग पटकण खाली गेलो ब्रश घेतला. आणी परत वर आलो. गच्ची वर बसुन ब्रश करत करत लांब शेताकडे बघत होतो. ही माझी आवडीची जागा. मस्त वाटतं, फ्रेश....... गुळणा भरुन मस्त छाती भरुन श्वास घेतला.
"राजकुमार, चहा तयार आहे." रसीका मागे चहा घेउन.
'बहुतेक आईने सांगीतलय वाटत हीला की मला लगेच चहा लागतो ते'
"हं...."
"बरं, मला सांग तु गंगेला जाणार आहेस का?"
"हो. का?"
"मलाही यायच आहे."
"मी नेनार नाही." मला रागच आला होता.
"काकु सांगा ना याला, माला घेउन जायला."
"ये आई मी नाही ग हीला नेणार. मीच आज जाउन लवकर येनार आहे. मला जायच आहे."

*****************************************************
आज सकाळ पासुन खुप फिरंन झालं होत, आणी खेळन सुद्दा. भुक तर खुप लागली होती पण आईचा स्वंयपाक चालु होता वेळ होता जेवायला अजुन.
मी गच्ची वर जावुन बसलो होतो, तेवठयात रसिका आली.
"काय रे विजु, तुला काही problem आहे का माझा?"
"नाही"
"मग बोलत का नाहीस?"
"काय बोलु?"
"काहीही..."
"..................."
" अरे बोल ना? शांत का?"
"..........."
"friends?"
हातात हात बळच घेतला तीने. खरं तर तिला भरपुर काही विचारायच होत, पन धाडसच झालं नाही.
"चला रे जेवायला." आईचा आवाज आला खालुन.
"चलं जेवायला जाउ." मी.
"नशीब माझं मला आत्ता तरी बोललास. आपन एका ताटात जेवाय्ला बसायच का?"
खरं तर मला तसं काही आवडत नाही. पण ती असे काही डोळे करुन म्हणाली की, मला नाही म्हणायच काही समजच नाही.
"काकु आज आम्हाला एका ताटातच द्या. मी अनं विजु एकातच बसनार"
आई गारच. मी आपल खाली पाहत आईची नजर टाळली.

जेवताना तिची भरपुर बडबड चालु होती. सगळ सांगत होती. एकंदर तीला आमचा वाडा आवडला होता. मी नीपुटपणे खाली मुंडी घालुन जेवत होतो.
जेवने झाली. मी खुप थकल्या मुळे वर जाउन झोपन्याच्या तयारी ला लगलो.
रेडीओ वर विविध भारती लाउन अंथरुनावर पाठ टेकली. कधी झोप लागली कळालच नाही.

रात्री १२ ची वेळ असेल......
मला जाग आली, बघतोय तर कोणी तरी मला हलवुन जागे करत होते...
डोळे कीलकीले करुन पाहतो तर...........
समोर रसीका.....

क्रमश............................
*****************************************************
टीप :- माझी पहीलीच वेळ आहे कथा लिहण्याची. ही कथा थोडीशी काल्पणीक आसुन बरेच काही सत्य आहे. जर तुम्हाला ही कथा रटाळ वाटली किंवा भरकट आहे असं वाटल तर क्रपया आपल्या सुचनांच स्वागत आहे. अपेक्षा ठेवतो की तुम्ही मार्गदर्शन कराल.

गुलमोहर: 

रसिकाच तुझ्याशी जवळच वागण खूप लवकर घेतलस..... थोडा वेळ घेतला असतास तरी चालल असत.... अस मला वाटतय. अर्थात हे माझ मत....
बाकी लिन्क कुठे तुटली नाहीए अजून... तिसरा भाग येउदे लवकर..... वाट बघतोय...

थोड्याशा शुद्धलेखनाच्या चुका (अर्थात त्या चुका आहेत की गावाकडची भाषा दाखवायचेय म्हणून लिहिलेय माहीत नाही) टाळल्या तर छान चालू आहे.. मला ही स्मितहास्य सारखं वाटलं अजून रंगवता आली असती... प्रेमाची सुपरफाष्ट एक्स्प्रेस निघालेय! Happy
पुलेशु आणि लवकर पोस्टा.

kendre_paresh,स्मितहास्,
मला वाटल की वाचताना कंटाळा येईल म्हणुन थोडी फास्ट घेतली.
आणी हो...थांबा थोड........
३ भागावर काम चालु आहे.... अर्धा पुर्ण झाला आहे....
बहुतेक उद्या पुर्ण होइल.