स्वच्छ राजकारण

Posted
16 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
16 वर्ष ago

झाडांपासून घ्यायला हवेत
स्वच्छ राजकारणाचे धडे..

काही उंच, काही बुटके,
काही डेरेदार, काही निष्पर्ण,
काही डवरलेले, काही झडलेले,
दाटीवाटीने एकमेकात गुंफलेले
तरीही कधी वैर न करणारे...

मजबुत, भुईला घट्ट धरणारे,
आपल्याच जागेवर भरभक्कम,
इतरांच्यात नाक न खुपसणारे

काहीही न मागता,
सर्व काही देऊन टाकणारे,
सुर्यकिरण पिऊन, प्राणवायू देणारे,
वाटसरूवर सावली धरणारे,
पाखरांशी मैत्री करणारे,
ऋतुंशी नाते जोडणारे,
भुईशी इमान राखणारे,

अंगणातील कल्पवृक्ष बनून
हसत हसत घाव सहन करणारे,
प्रेम जपणारे, छत्र धरणारे..

-बी

विषय: 
प्रकार: