Submitted by pulasti on 23 April, 2008 - 11:56
भरार फुलपाखरू कुणाच्या उरात नाही
किडे इथे रेंगती, कुणी माणसात नाही
मनास येते तसे तुम्ही वागता तरीही
कसे म्हणवते - "खरेच काही मनात नाही!"
बघा जरा काळवेळ मग राग आळवा रे
रखरखलेली दुपार ही; चांदरात नाही
किती विचारास बाक आला, किती सुरकुत्या...
त्वचा चमकते तरी कुणी यौवनात नाही!
उदार धोरण; खुली व्यवस्था; समान संधी -
असा तवा तापला व दाणा घरात नाही
गुलमोहर:
शेअर करा
बहोत खूब.
बहोत खूब. हर एक शेर.... लगालगागा
मनात नाही आणि राग - किती सहज... समोर बसून म्हटल्यागत.
दाणा - सव्वा शेर!
पुलस्ति, जियो. आवडलीच.
क्या बात
क्या बात है.. बहोत खुब..
- अनिलभाई
किती
किती विचारास बाक आला, किती सुरकुत्या...
अगदी अगदी!
दाण्याचा शेर धारदार आहे.
पुलस्ति
पुलस्ति मस्त जमलिये गझल. आवडली.
पुलस्ती सर
पुलस्ती
सर्वच शेर मस्त आहेत.. पण त्यातही
मनास येते तसे तुम्ही वागता तरीही
कसे म्हणवते - "खरेच काही मनात नाही!"
किती विचारास बाक आला, किती सुरकुत्या...
त्वचा चमकते तरी कुणी यौवनात नाही!
हे फार आवडले
वॄत्तही वेगळे आणि अवघड ... लगालगागा X 3
visit http://milindchhatre.blogspot.com
सुंदर, मतला
सुंदर,
मतला आणि "चांदरात" हे शेर आवडले. "मनात नाही" ही छान आहे.
-सतीश
मनास येते
मनास येते तसे तुम्ही वागता तरीही
कसे म्हणवते - "खरेच काही मनात नाही!"
उदार धोरण; खुली व्यवस्था; समान संधी -
असा तवा तापला व दाणा घरात नाही
हे दोन खूप आवडले... मस्तच...
किती विचारास बाक आला, किती सुरकुत्या...
त्वचा चमकते तरी कुणी यौवनात नाही!
या इथे कहितरी गडबड वाटते आहे.
म्हणजे, "किती विचारास बाक आला, किती सुरकुत्या..." यात तारुण्य ओसरलंय हेच दिसतंय, आणि त्वचा चमकते हा विरोधाभास वाटतो!! आणि तरी "कुणी यौवनात नाही" हे आश्चर्य राहत नाही मग!
किती
किती विचारास बाक आला, किती सुरकुत्या...
तसं अगदीच साधं सरळ म्हणण आहे - शरीराच्या नव्हे तर विचारांच्या तजेलदारपणावर तारुण्य अवलंबून असतं. तरुणाईबद्दल, अर्थात जी मला दिसते आहे.. त्या तरुणाईबद्दल ही खंत आहे.
बहुतेक शेवटच्या "..." मुळे थोडं गोंधळायला होतंय का?
"खरेच काही
"खरेच काही मनात नाही!" आणि
शेवटचा शेर अप्रतिम. छान गझल.
उदार धोरण;
उदार धोरण; खुली व्यवस्था; समान संधी -
असा तवा तापला व दाणा घरात नाही >>>>>>>> अप्रतीम !!!!
परागकण
पुलस्ति
पुलस्ति दोन्ही गझल आवडल्या.
~~~~~~~~~

~~~~~~~~~