सुस्ती..

Posted
15 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago

घड्याळात बाराचे ठोके
दिवे अजून न विझलेले
वाहणार्‍या रस्त्यावरचे
निऑन आकाशात पोचलेले

हे शहर दाटीवाटीने भरलेले
चोवीस तास व्यस्त-व्यापलेले
सर्द दुलईतील झोप सोडून
कागदांच्या ओझ्यानी वाकलेले

येईल हळूच जरा वेळानी
लगबगीची ती प्रभात रोजची
अन सुरू होईल वर्दळ पुन्हा
चेहर्‍याचेहर्‍यावर दिसेल सुस्ती!

- बी

विषय: 
प्रकार: 

बी, एकदम साधी आहे कविता. पण "कागदांच्या बोजानी वाकलेले" याच्यात कागदांचा relevance कळला नाही.

कागदाच्या बोजानी... म्हणजे पैश्याच्या असे म्हणायचे आहे का?

बी, छोटेखानी साधी साधी कविता आवडली Happy

कागदाच्या बोजा = कार्यालयीन कामं अस मला म्हणायचं आहे.