नि:शब्द निषेध.

Submitted by shashank pratapwar on 28 July, 2010 - 23:53

डोळे उघडल्यापासुन चालु होतो..
प्रत्येक सिगारेटीतुन चरफडत बाहेर येतो..
अर्थहीन नजरेला आरशातुन भेटतो.
चार चौघांसमोर जो मी सवयीने गिळतो
जगण्यातील पराभवावरचा माझा नि:शब्द निषेध...

स्वत:च्या brand new व्याख्या शोधताना..
वेगळ काहीच घडत नाही आयुष्यात..
पण त्याला नियती म्हणण्यालाही
माझा नि:शब्द निषेध...

विस्मृतीच्या बाळबोध प्रयत्नाला..
मग स्वतःवरच हताश हसण्याला..
असण्याला..नसण्याला....
माझा नि:शब्द निषेध...

असे लाखो निषेध मेलेत आतापर्यंत
तोंड न उघडताच....
त्यांना ही एक विषेश समर्पीत
माझा नि:शब्द निषेध..

- शशांक प्रतापवार

गुलमोहर: 

असे लाखो निषेध मेलेत आतापर्यंत
तोंड न उघडताच....
त्यांना ही एक विषेश समर्पीत
माझा नि:शब्द निषेध..

वाह .....!!!!:)

!

कधीतरी असा नकारत्मक सुर आल्यास ठीक आहे. कायमच अस होत असेल तर चालतो तो रस्ता आणि चालण्याची गती, पध्दती तपासुन पहायला हवी. गम्मत अशी आहे की आपलच आपल्याला समजत की चुकतय काय.

हे इतके सोपे आहे का? स्वतःच्या आत डोकावून पाहणार्‍यांना हे असे प्रश्न पडणे, जाणवणे स्वाभाविक आहे....पण याचा अर्थ जगण्यात पण नकारात्मकता असेल असे नाही. आणि असे प्रश्न पडणे म्हणजे काही चुकत असणे असेही नाही...सगळे ठीक भासले, अगदी असले तरी असे प्रश्न पडू शकतात की.

कविता तर नक्कीच आवडली आहे....
विशेषतः

विस्मृतीच्या बाळबोध प्रयत्नाला..
मग स्वतःवरच हताश हसण्याला..
असण्याला..नसण्याला....
माझा नि:शब्द निषेध...

ह्या ओळी फार आवडल्या

भरतजींच्या मताशी सहमत आहे....बर्‍याचदा काव्य हे कविच्या त्यावेळच्या मनस्थितीवर अवलंबुन असते... त्यांची विचारसरणी तशीच असेल असे नाही... परंतु

नितीनजींनी दिलेला सल्ला अगदी योग्य आणी महत्वाचाही आहेच असेही वाटते,,,

प्रतिसादाबद्दल मनापासुन आभार.... कवितेवरुन माझी आयुष्याची विचारसरणी अशीच आहे असे अजीबात नाही....शेवटी एखादी भावना किंवा विचाराची लहर शब्दात पकडली की त्याची कविता होते..पण तो कवीचा स्थायीभाव असेलच असे काही नाही....आपण जी ए कुलकर्णी वाचतो म्हणजे आयुष्य व्यर्थ आहे असा आपला विचार असतो का?...अस मला वाटत.. शेवटी ज्याचा त्याचा पर्स्पेक्टीव... Happy

खरय रे!
मोदक, अनुमोदक, मोदन, अनुमोदन... जे जे काय ते...!!
अगदि खरय!!!!!!!!

आपण जी ए कुलकर्णी वाचतो म्हणजे आयुष्य व्यर्थ आहे असा आपला विचार असतो का?>>>
काय झ्याक बोललास बे!

शशांक, मला कवितेतल काही कळत नाही. मी जी. ए. वाचले नाहीत. जागा चुकली असल्यास सांगा आपण तो प्रतिसाद काढुन टाकु. तुमची कविताच इतकी सॉलीड गहरी आहे. त्यामुळे माझा असा समज झाला.