"हिशोब"

Submitted by मी अभिजीत on 17 April, 2008 - 08:31

कर्जाचे अन कर्जमाफीचे ओघ ठेवले.
दान दिले पण परताव्याचे योग ठेवले.

पाणी आता साधन झाले लढण्यासाठी,
पिण्यास बाकी पेप्सी आणि कोक ठेवले.

दर रविवारी संस्कृतिरक्षण पुरले नाही.
रोज पार्वती अन तुलसीचे "सोप" ठेवले.

विचार मांडायाला त्यांनी दिली मुभा पण,
छातीवरती तलवारीचे टोक ठेवले.

देवा तुजला नवसाचा बघ चेक फाडला.
गार्‍हाणे मी मात्र आपुले "रोख" ठेवले.

चित्रगुप्तही मला म्हणाला कमाल झाली.
हिशोब होते मीही ऐसे "चोख" ठेवले..!

-- अभिजीत दाते

गुलमोहर: 

क्या बात हैं| मस्तच आहे!

आवडली. Happy

The universe, they said, depended for its operation on the balance of four forces which they identified as charm, persuasion, uncertainty and bloody-mindedness.

काय हो डी ए टी ई Happy
ही पण गझल झक्कास!

अप्रतीम
सगळेच शेर आवडले
"सोप" ची कल्पना छानच.
तलवारीचे टोक आणि "रोख" मस्तच
चोख हिशोबानीतर कळसच गाठलाय

सुधीर

वा मस्तच
सर्वच शेर आवडले
त्यातही
सोप, रोख, चोख सहीच

visit http://milindchhatre.blogspot.com

सुंदर!
चेक, चित्रगुप्त हे शेर खासच!
(ओघ, योग, कोक, सोप, टोक, रोख, चोख - काफिया तितकासा चोख नाही पण.) Happy
कर्जमाफीचे मधला फि देखील र्‍हस्व वाचावा लागतो आहे.
पण तांत्रिक अंग थोडं बाजूला ठेवलं तर कल्पना बहारदार आहेत.
-सतीश

वा वा दाते भारी लिहिता तुम्ही!!!मागे बिहारी कणा पण भारी लिहिला होता

>>>दर रविवारी संस्कृतिरक्षण पुरले नाही.
रोज पार्वती अन तुलसीचे "सोप" ठेवले>>>>>
जियो!! मस्तच. Happy

एकदम बढीया... शेवट मस्तच...!