भटकंतीची आवड पहिल्यापासुनच. सह्याद्रिच्या कुशीत, देवळांच्या परिसरात, समुद्रकिनारी अगदी परदेशातहि मनसोक्त फिरलो. कधी मित्रांसोबत तर कधी फक्त कॅमेर्यासोबत. या सर्व भटकंतीमुळे माझ्याहि नकळत फोटोग्राफिचा "तिसरा डोळा" केंव्हा उघडला गेला ते माझे मलाच कळले नाहि. या तिसर्या डोळ्याद्वारे मला आता प्रत्येक गोष्टीत सौंदर्य दिसु लागले आहे. अर्थात त्याला साथ मिळाली आहे ती मायबोलीकरांच्या प्रतिसादाची. एखादा वेगळा विषय, नवीन थीम्सद्वारे माझ्या कलाकृती घेऊन मायबोलीवर येऊ लागलो. त्याला प्रतिसादहि तितकाच चांगला भेटत गेला आणि याच प्रतिसादातुन प्रेरणा घेऊन काहि फोटोज मी चक्क वाचायला लागलो आहे. बर्याचदा असे होते कि, आपण काढलेले फोटो पाहताना वाटते कि, अरे आपलं आयुष्यहि असेच आहे ना?".
असेच काहि मी काढलेले फोटो आणि आयुष्य यांची सांगड घालुन काहि फोटो तुमच्यासमोर आणलेले आहे.
तेंव्हा,
जरा चुकिचे, जरा बरोबर बोलु काही
चला दोस्तहो (फोटोद्वारे) आयुष्यावर बोलु काही . . . . .
==================================================
==================================================
प्रचि – १
ज्या रंगाचा चष्मा आपण घालतो त्याच रंगाची दुनिया दिसते. जर उदास, नैराश्याच्या चष्मा घातला तर सगळीकडे फक्त उदासी आणि नैराश्यच दिसेल, याउलट जर प्रसन्नतेचा चष्मा असेल तर सगळं जगच सुंदर दिसेल. अशीच एक प्रसन्न भटकंती करून घरी परतताना लोकल ट्रेनच्या खिडकीवरची कळकट्ट जाळी देखील सुंदर भासली.
==================================================
==================================================
प्रचि – २
आणि मग अशाच जाळीतुन जग आणखीनच सुंदर दिसायला लागले.
==================================================
==================================================
प्रचि – ३
"आयुष्य कितीही खडतर असलं तरी ते आनंदाने फुलवत रहा" हे या खडकावरल्या अंकुराकडुन आपणांस शिकता येईल.
==================================================
==================================================
प्रचि – ४
"आयुष्य किती क्षणभंगुर आहे" हे ह्या फोटोला पाहिल्यावर मला नेहमीच जाणवणार. एकदा देवळांच्या भटकंतीला गेलो असता पायर्यांवर मला हि भेटली. तीचे मस्त फोटोसेशन केल्यानंतर जवळ पास अर्धा पाऊण तास देवळाच्या परिसरात भटकलो. परतीच्या वाटेवरती, या कालावधीत गोगलगायीने किती अंतर पार केले हे पाहण्यासाठी तेथे गेलो असता, कुणाच्यातरी पायाखाली येऊन तीचे अस्तित्वच संपले होते. खुप वाईट वाटले, त्यापेक्षा स्वतःचा राग जास्त आला. वाट वर्दळीची आहे हे माहित असुनही मी तिला जवळच्या झाडीत उचलुन ठेवले नाहि. ...........कदाचित एक जीव वाचला असता. 

==================================================
==================================================
प्रचि – ५
"कट्टा" सगळ्यांचा जिव्हाळ्याचा विषय. काहि क्षण मित्रमंडळी एकत्र येणार. गप्पांचे फड रंगणार आणि परत सगळे आपआपल्या मार्गी जाणार. उरणार तो एकटा वृक्ष, या सगळ्या आठवणींना सोबत घेऊन. आपलं आयुष्यहि थोडसं असच असतं ना?, "यथा काष्ठंच काष्ठंच . . . . . " या संस्कृत श्लोकाप्रमाणे.
काहि व्यक्ती आयुष्यात येतात, दोन-चार क्षणांची सोबत करतात आणि निघुन जातात. उरतात त्या फक्त आठवणी आणि आपण, "पारावरच्या त्या वृक्षासारखे" एकटेच.
==================================================
==================================================
प्रचि – ६
रंगपंचमीच्या दिवशी लाल रंग लावल्यामुळे रडकुंडीला आलेली हि चिमुरडी. पण पुढे आयुष्यात राग, लोभ, मद, मत्सर, मोह, यश, अपयश, द्वेष या सार्या रंगात रंगायचेच आहे हे जर तिला माहित असते तर या कृत्रिम रंगाची भिती कदाचित तिला वाटली नसती.
==================================================
==================================================
प्रचि – ७
"..........वार्ध्यक्य साचले, उरलो बंदी पुन्हा मी". आयुष्यातील सुखदु:खांचा हिशोब मांडताना, हातावर हात ठेवून, हताश होऊन, देवाला स्मरत बसलेले हे आजोबा.
==================================================
==================================================
प्रचि – ८
"आयुष्य म्हणजे काय रे भाऊ?".
आमच्यासाठी सध्यातरी हे चाक आणि हा खेळ हेच आयुष्य आहे आणि तेच आमचे विश्व आहे. पुढंच पुढे बघु. हेच तर चिडवून सांगत नसेल ना हा?
==================================================
==================================================
प्रचि – ९
खांब केळीचे उभे, वरती तोरण शोभे
दारी चौघडा गाजे, सूर सनईचा वाजे
तिच्या आणि त्याच्या आयुष्यातील हळुवार पण तितकाच महत्वाचा एक क्षण.
आयुष्यभरासाठी त्याच्या हातात विश्वासाने हात देणारी ती आणि तितक्याच विश्वासाने तिला साथ देणारा तो.
==================================================
==================================================
प्रचि – १०
संथ पाण्यात सहजच मारलेला एक दगड आणि त्यामुळे पाण्यावर उठलेले असंख्य तरंग.
आपल्या जीवनातही असंच असतं, येणारे एखादे दु:ख किंवा संकट हे एकटे न येता सोबत अनेक दु:खे/संकट घेऊन येतात ज्यामुळे कित्येकदा आयुष्य ढवळुन निघते. अर्थात हे त्या पाण्यावरच्या तरंगासारखेच कायम न रहाता काहिवेळानंतर निवांत होतात.
==================================================
==================================================
प्रचि – ११
तिकोना किल्ल्याची भटकंती करून आल्यानंतर पवनेच्या पाण्यात जरा फ्रेश होताना आमचे मित्र. फोटो पाहिल्यानंतर आमच्यापैकी एका मित्राने ह्या फोटोला नाव ठेवले "पूर्वेकडील आणि पश्चिमेकडील तोफा" :). आयुष्य अशाच अनेक गंमतीशीर प्रसंगानेही भरलेले आहे.
==================================================
==================================================
प्रचि – १२
रोज रोज त्याच त्याच आयुष्याचा (सुंदर सुंदर फुलांवर बसण्याचा) कंटाळा आला असेल कदाचित म्हणुन for a change हे फुलपाखरू चक्क मातीत बसले. अर्थात "मातीची" ओढ सगळ्यांनाच असते.
==================================================
==================================================
प्रचि – १३
"जो सब करते है यारो, वो क्यों हम करे".
सगळे जे करतात ते मी का करू? कधी कधी प्रवाहाच्या विरूद्ध पोहणे हा हि आयुष्याचाच एक भाग आहे ना?
==================================================
==================================================
प्रचि – १४
कुणाला हा फोटो, निष्पर्ण, उजाड, उदास वाटेल,कुणाला हा फक्त एक झाडाचा फोटो वाटेल, मला हा फोटो काढताना मोराच्या फुललेल्या पिसार्याची आठवण झाली होती. अर्थात आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन हा प्रत्येकाचा वेगळा असतो.
==================================================
==================================================
प्रचि – १५
थोडक्यात काय तर "आयुष्य हे अळवावरचे पाणीच". घरंगळण्याआधी मनसोक्त उपभोगुन घ्या.
==================================================
==================================================

भन्नाट ! अप्रतिम ! (बाकी शब्द
भन्नाट ! अप्रतिम ! (बाकी शब्द आठवले की लिहीन - सध्या बोलती बंद झालीय !)
योग्ज.. अप्रतीमच..
योग्ज.. अप्रतीमच..
मस्त थीम! खूप आवडली!
मस्त थीम! खूप आवडली!
योगेश, छान फोटो आणि मस्त
योगेश, छान फोटो आणि मस्त लिहीलं आहेस.
मला टायरवाल्या मुलाचा फोटो लैच आवडला!
रिकामा पार, फुलपाखरु फार
रिकामा पार, फुलपाखरु फार आवडले. बाकी सारेही सुंदर!
योगेश छान वाटले. आपण काढलेले
योगेश छान वाटले. आपण काढलेले फ़ोटो परत बघताना, खूप आठवणी
जाग्या होतात. डिजीटल फ़ोटो, सहज लॅपटॉप वर सेव्ह करता येतात,
हवे त्यावेळी बघताही येतात.
परवा, तूझ्या गुलाबाच्या बीबीवर झब्बू देताना, माझे असेच झाले.
त्या कूल(सुभाष)चा आमच्या ग्रूपमधे, अगदी कच्चा लिंबू म्हणून प्रवेश झाला होता.
(हायकिंग करताना, माझी सॅक मी बिनदिक्कत त्याच्याकडे देत असे.)
मग त्याचे आई बाबा, भाऊ वहिनी सगळ्यांचीच ओळख झाली, मग त्याचे
प्रेमप्रकरण, लग्न, आणि आता त्याच्या घरी बाळराजाचे आगमन होणे,
सगळेच डोळ्यासमोरुन गेले.
त्या रंगपंचमीच्या फ़ोटोवरुन, माझा गोव्यातला छोटा दोस्त मनन (इथे
बऱ्याचजणांना तो माहीत आहे.) आम्ही खेळलेली रंगपंचमी, मग त्याच्या
आईने, माझ्यावर टाकलेला रंग, सगळेच आठवले.
काश, आयूष्यातले सर्वच सुखद क्षण, असे पकडता आले असते !!
खुप खुप सुंदर... फोटो तर
खुप खुप सुंदर... फोटो तर सुंदर आहेतच पण लिहिलस पण मस्त!
आत्तापर्यंतच्या थीम या थीमपुढे 'किस झाड की पत्ती'... या थीमची खोली जबरदस्तच आहे!
तुझी चित्रभाषेची 'नजर' आणि
तुझी चित्रभाषेची 'नजर' आणि त्या नजरेतून टिपलेले हे सुंदर क्षण आवडले!
अतिशय सुंदर. मस्तच.
अतिशय सुंदर. मस्तच.
सुंदर!
सुंदर!
What is an Idea Sirji !!! खूप
What is an Idea Sirji !!!
खूप खूप छान!
निवडक दहात नोंद!!!
जबरदस्त मित्रा....कमाल
जबरदस्त मित्रा....कमाल वर्णन....
आयुष्यावर बोलु काही . . . .
आयुष्यावर बोलु काही . . . . >>> अजून काय बाकी राहिलयं बोलायचं? केवळ अप्रतिम
केवळ अप्रतिम.
केवळ अप्रतिम.
एकदम झकास...
एकदम झकास...
सुरेख......
सुरेख......
"जहापनांह, तुस्सी ग्रेट
"जहापनांह, तुस्सी ग्रेट हो-
तोफा कबूल करो.."
ही सगळ्यात भारी थीम!! शब्दच
ही सगळ्यात भारी थीम!! शब्दच नाहीत!
.............. _/\_
.............. _/\_

ज्ञानेशची प्रतिक्रिया
ज्ञानेशची प्रतिक्रिया आवडली.
ज्ञानेश | 26 July, 2010 - 09:34
"जहापनांह, तुस्सी ग्रेट हो-
तोफा कबूल करो.."
याचे मराठी भाषांतर करुन लिहीतो,
महाराज आपण महान आहात! ( आमची प्रतिक्रिया ही ) छोटीशी भेट स्विकारा !
१, ३ आणि १० फारच छान !
१, ३ आणि १० फारच छान !
उदंड आणि सुंदर सुंदर
उदंड आणि सुंदर सुंदर प्रतिसादाबद्दल सगळ्यांचेच मनापासुन आभार!!!!
खरंतर माबोकरांच्या सुंदर सुंदर प्रतिसादामुळेच या सगळ्या थीम्स सुचतात. कधी कधी आपण काढलेले फोटोच काहितरी आपल्याला नकळत सांगुन जातात, काहि विचार करायला लावतात. हि थीम मला प्रचि ४ मधील गोगलगायीच्या फोटोवरून सुचली (त्याचे वर्णन मी त्या फोटोच्या आधी केलेले आहेच). खरंच आपण काढलेले फोटोच कधी कधी आपल्याला विचार करायला लावतात.
लोभ आहेच, तो असाच वाढु द्या
फार सुंदर थिम सगळेच फोटो
फार सुंदर थिम
सगळेच फोटो अप्रतिम आणि लिहिलंयस पण सुंदर.
योगेश२४ मला सांगायला आनंद
योगेश२४
मला सांगायला आनंद वाटतो कि होमपेजवरचे तुमचे फरकचे फोटो पाहिले आणि मी मायबोलीचे लॉगीन बनवले. मायबोलीवर मी फार कमी फिरकतो पण जेंव्हा येतो तेंव्हा तुम्ही काढलेले फोटो आवर्जुन बघतो.
आजची हि तुमची थीम सगळ्या थीम्पेक्शा जबरदस्त आहे.
"थोडक्यात काय तर "आयुष्य हे अळवावरचे पाणीच". घरंगळण्याआधी मनसोक्त उपभोगुन घ्या."
हा या थीमचा शेवट आवडला.
मोराच्या फुललेल्या
मोराच्या फुललेल्या पिसार्याची आठवण झाली >> काय नजर आहे राव, अप्रतिम !
त्या प्रकाशचित्रा चे वर्णन वाचुन मग मलाही त्यात पिसारा दिसला ...
सुंदर, अप्रतीम !!!!!!!!!!
सुंदर, अप्रतीम !!!!!!!!!!
जबरदस्त योग्या...
जबरदस्त योग्या...:स्मित:
स्पिचलेस.
स्पिचलेस.
सुंदर फोटो आणि तितकच सुंदर
सुंदर फोटो आणि तितकच सुंदर वर्णन!
~साक्षी
अप्रतिम.....
अप्रतिम.....
Pages