क्षण आठवांचे - ववि २०१०

Submitted by निंबुडा on 22 July, 2010 - 00:29

कधी एकदाचा १८ जुलै चा रविवार उजाडतोय असं मला, मोदकला आणि नन्या१० ला झालं होतं. आम्हा तिघांकरताही हा पहिला वहिला ववि असल्याने खूपच उत्सुकता होता.

रविवारसाठी पहाटेचा ४ चा गजर लावून मनातल्या मनात वविची स्वप्ने रंगवत झोपलो. (माझे आई-बाबा त्यांचा दोघांचा सेपरेट 'ववि' करण्यासाठी शनिवारीच तळेगावला गेले होते. त्यामुळे नन्या शनिवारी रात्री माझ्या घरीच आली झोपायला. दुसर्‍या दिवशी तिघानांही एकत्र निघायला बरे पडणार होते, हे ही एक कारण होतेच!). नेहेमीप्रमाणे ४ वाजता वाजलेला गजर शिस्तीत बंद करून पुन्हा पावणे पाचचा गजर लावून पुन्हा निद्राधीन झालो. Wink कविने शुक्रवार पासूनच फोन करकरून स. ५-४० पर्यंतची ट्रेन कल्याणहून पकडण्याची आणि ६-३० पर्यंत मुलुंड स्टेशनवर पोचण्याची तंबी दिली होती. पण आम्ही कुणाच्या धमक्यांना भीक न घालणारे. Proud त्यामुळे तब्येतीत आवरून कसेबसे ६-१५ पर्यंत तयार झालो. तर नन्याने ती ट्रेनचा फर्स्ट क्लास चा पास घरीच विसरल्याचे जाहीर केले. माबोवर वेंधळेपणाचे अकाउंट उघडण्यासाठी म्हणून मुद्दामहून तिने हे केले असावे अशी शंका मला आली. सकाळी-संध्याकाळी २ ही वेळेला सेकंड क्लास ने जायचे-यायचे मला जीवावर आले. शिवाय तिकिटासाठी रांग वै. असलीच तर अजून उशीर होईल म्हणून मी तिला तिच्या वेंधळेपणाची शिक्षा म्हणून घरी पिटाळले.

हा सगळा घोळ निस्तरून कल्याण स्टेशन वर पोचलो. जी मिळाली ती स्लो लोकल पकडली. तिघेही जेन्ट्स फर्स्ट क्लास च्या डब्यात चढलो. डोंबिवली पर्यंत पोचतो न पोचतो तर मुलुंडहून नील वेद चा फोन आला "अरे, आहात कुठे?" विचारायला आणि "पुढच्या ५-१० मिनिटांमध्ये बस पोचतेय" हे सांगायला. आता ट्रेन मुलुंडला तिच्या वेगानेच पोचणार ना! Uhoh "येतो, येतो" करून फोन ठेवला. मोदक ओले केस वाळवण्यासाठी मस्त दाराशी उभा राहून वारा खात होता (ओल्या केसांत ती 'डॉन'छाप हॅट घातली तर केस चप्प होतात म्हणे! Uhoh ). तोवर इकडे मी आणि नन्याने एक मिनि फोटोसेशन उरकून घेतलं. मोदकची हॅट घालून नन्याने मस्त पोझेस वगैरे दिल्या. मध्येच इतका जोराचा वारा आला की नन्याच्या डोक्यावरची हॅट उडून पलीकडच्या सीटवर बसलेल्या टकलू काकांच्या डोक्याला लागली. ते बिचारे इतके तंद्रीत बसले होते की अचानक डोक्यात काय पडलं म्हणून त्यांची जाम टरकली. माझी आणि नन्याची ह.ह.पु.वा. झाली. त्यांना सॉरी म्हणून हॅट परत घेतली आणि मग मात्र मुलुंड येण्याची वाट बघत शांत बसलो (कीडे न करता! Happy ). ठाणे क्रॉस झालं नि परत फोन वाजला. 'बस कधीची येऊन थांबलीये', 'लवकर या', 'फक्त तुम्हीच बाकी आहात' वै. रागनिदर्शक निरोप मिळाले आणि खरंच कधी एकदा बसस्टॉप ला पोचतोय असं झालं.

मुलुंडला उतरून रिक्षा केली. दिनदयाळ नगर सांगून रिक्षावल्याच्या नॉलेजवर भरवसा ठेवून निश्चिंत बसलो तर रिक्षावालाही आमच्याच पंथाचा निघाला. "दिनदयाळ नगर म्हणजे नक्की कुठे?" या त्याच्या प्रश्नावर मोदकने मनानेच "दिनदयाळ नगरच्या आसपास हायवेला लागणारा जो कॉर्नर असेल तिथे सोडा" असे फर्मान सोडले. "नक्की माहितीये ना तुला??" असे शंकायुक्त भाव मनात आल्याने मी मोदकला रागयुक्त नजर दिली. त्यावर नेहेमीच्या थाटात त्याने "मै हुं डॉन" ("मुझे सब पता है") छाप नजर आसमंतात फेकली. शेवटी व्हायचे तेच झाले. त्या महान रिक्षावाल्याने त्याला वाटले आणि जमले त्या स्टॉपवर आणून सोडले आणि "दिनदयाळ नगर" तर मागेच राहिले अशी मौलिक माहिती पुरवून तो गायबला. मी मोदकवर बरसणार इतक्यात त्याने मालकांना फोन लावला. मालक म्हणाले की, "तुम्ही आहात तिथेच थांबा आम्ही २ मिनिटांत बस काढतोय". २ मिनिटांची ५ मिनिटे झाली तरी बसचे नामोनिशाण दिसेना. माझा आणि नन्याचा जीव खालीवर होऊ लागला. आपण नक्की कुठल्यातरी चूकीच्या स्टॉपवर थांबलोय अशी धोक्याची घंटा मनात खणखणत होती. तितक्यात दूरून एक मोठी बस येताना दिसली आणि जीव भांड्यात पडला. पण कसलं काय नि फाटक्यात पाय! Sad ती बस भलत्याच पिकनिकची निघाली. वाट चूकलेल्या कोकरांसारखे आम्ही आशाळभूत नजरा घेऊन त्या निघून जाणार्‍या बशी कडे पाहत होतो. Sad आता मी माझी अक्कल वापरायचे ठरवले. एक तर आम्ही नक्की कुठे आहोत हे कळायला मार्ग नाही त्यामुळे संयोजकांना फोन लावला तरी काय सांगायचे हा प्रश्न होता. मोदकच्या वेंधळेपणाला मनातल्या मनात नावे ठेवत मालकांना फोन लावला. आनंदसुजू महाराजांनी कंट्रोल आपल्या हाती घेऊन आम्हाला बरोबर हुडकून काढले आणि आम्हाला बशी पाशी सुखरूप घेऊन आले. Happy

बघतो तर खरंच फक्त आम्हीच यायचे बाकी होतो. Proud तो पर्यंत संयोजकांनी बस ला माबो चे बॅनर्स आणि झेंडे लावून घेतलेले दिसत होते. सगळ्यांचे चहापान ही झाले होते. आम्ही शाही थाटात बस मध्ये एन्ट्री घेतली. आया-बाया आपापल्या चिल्ल्या-पिल्ल्यांना घेऊन बसच्या पुढच्या भागात स्थानापन्न झाल्या होत्या तर धूमाकूळ घालून बस दणाणून सोडण्याचा इरादा आणि जिगर घेऊन आलेल्या मंडळींनी बसच्या मागील बाजूचा ताबा घेतला होता. आम्हीही तिघे या जिगरबाज लोकांना जाऊन सामील झालो. संयोजकांनी त्यांच्याकडील कागदी पत्रावळीतल्या नोंदी एकदा चेकून सगळे आल्याचे कन्फर्म केले आणि "गणपती बाप्पा मोरया" च्या जयघोषात बस निघाली.

आम्हा तिघांच्या लेट येण्यावरून टोमणे, एकमेकांची ओळख इ. स्टार्टर्स पार पडल्या नंतर गाण्यांचा मेन कार्यक्रम चालू झाला आणि प्रवासाची रंगत यायला लागली. अधल्या-मधल्या स्टॉप्स वर इंद्रधनुष्य अँड फॅमिली, सुपु (सुमेधा पुनकर) अशा लोकांना घेत घेत बस एकदाची रीसॉर्ट च्या प्रवासाला लागली आणि इकडे आमची गाण्यांची गाडीही रीसॉर्ट येईस्तोवर नॉनस्टॉप सुटली. आनंदसुजू, घारुअण्णा, वैभव आयरे, असुदे, किरू, डुआय, योगेश२४, योगमहे, मेधा२००२, सुपु, कविता, आनंदमैत्री, मालक, अमोघ, प्र-साद आणि मिसेस प्र-साद (कुणी राहिलं असेल तर आठवण करून द्या प्लीज Happy ) यांनी नुसता धुमाकूळ घातला. अभंगवाणी, भारुड, बालकविता, प्रेमगीते, लावण्या पोवाडे इ.इ. गाण्यांचे प्रकार आळवून झाले. मालकांच्या 'सुरात आणि कडव्यांसकट व सुरुवातीच्या बोलांसोबत गायलेल्या लावण्या' सर्वात जबरी होत्या. वैभव आयरेचे झकास ढोलकी वादन गाण्यांची रंगत वाढवत होते. मधूनच खाऊच्या पिशव्या पास करण्यात आल्या. त्यातले कचोरी वै. आयटम संपवून बर्‍याच जणांनी मिरीवाली शेव उरवली. ती आनंदसुजूंच्या सौजन्याने एका सेपरेट पिशवीत पुन्हा जमा करण्यात आली. (कारण शेवटपर्यंत समजलेले नाही. Sad ) जवळपास ७०-८० टक्के गाण्यांना "या गाण्याची एक वेगळीच गंमत आहे" असे शेपूट आनंदसुजूंकडून जोडले जात होते. त्या बरोबर पुरुषमंडळींच्या एकमेकांना दिलेल्या टाळ्या आणि सूचक नेत्रपल्लवी व मागाहून हास्याची लकेर अशी सर्व मजा-मस्ती करत एकदाचे सव्वा नऊ पर्यंत रीसॉर्टपाशी पोचलो.

गानसमाधी लागता लागताच इतक्या लवकर रीसॉर्ट आले म्हणून गेलेला मूड बसमधून उतरता क्षणीच आजूबाजूची हिरवळ पाहून परत यायला लागला. पोचल्या पोचल्या एक रखवालदारासारखा इसम दृष्टीस पडला. परिसराची निगराणी आणि रखवाली साठी नेमला असेल एखादा माणूस असे वाटले. तर हेच ते तथाकथित लिंबुटिंबु असे कुणीतरी सांगितले. पुण्याची बस अजून पोचली नसल्याचे कळले. बस मधून उतरणार्‍या अनोळखी सजीवांकडे पाहून कोण म्हणजे नक्की कोण असेल याची चाचपणी करेस्तोवर संयोजकांनी रुम्सच्या दिशेकडे आम्हाला मार्गस्थ केले. तिथे पोचलो तर कळले की रुम्स च्या चाव्या अजून हातात आल्या नव्हत्या. मग तो पर्यंत आजूबाजूचा परिसर, स्विमिंग पूल आणि रेन डान्सच्या जागा यांची पाहणी केली. नाष्टा उरकला. तो पर्यंत रूम च्या चाव्या मिळाल्या. मग समस्त महिला वर्गाने (लेडीज बायकांनी Wink ) रुमचा चार्ज घेऊन पाण्यात उतरताना घालण्याचे कपडे चढवले. आपापल्या पार्सलांना (पिल्लूवर्ग) रेडी केले.

पाण्याचा गारपणा आजमावत एक एक जण पाण्यात उतरला. डीजे ची गाणी दणक्यात सुरु झाली. तसतसे इकडे जलनृत्य बहरू लागले. छोट्या तळ्यात महिला वर्गाचे आणि मोठ्या तळ्यात पुरुष मंडळींचे खेळ रंगू लागले. महिला विशेष ट्रेन, पाण्यातला फेर धरून केलेला भोंडला, रिंगा रिंगा रोझेस चा खेळ, योरॉक्स ची नटरंगच्या लावणीवरील बहारदार अदाकारी, पल्लीने त्या अदाकारीला तोडीस तोड दिलेले तितकेच रॉकिंग उत्तर, पुरुषांचा पाण्यातच थर लावून दहिहंडी करण्याचा निष्फळ प्रयत्न, मिसेस प्र-साद यांचे नृत्यकौशल्य, रेनडान्स मधल्या आम्हा बायकांच्या फुगड्या, ठुमके, अटक-मटक-चवळी-चटक, पाण्यात फुदक फुदक केलेले हॉपिंग, लेडीज स्पेशल चावट-वात्रट गप्पा ही काही लक्षात राहिलेली क्षणचित्रे आहेत. Happy

जस जसे ऊन चढू लागले तस तसे पोटात कावळे व तत्सम पक्षी कोकलू लागले. मग मात्र एक एक जण पाण्यातून बाहेर पडू लागला. परत चेंजिंग रूम मध्ये जाऊन ओल्या झालेल्या फरशी वर पाय घसरत असताना कपडे बदलण्याचे दिव्य काम आटोपून गरम गरम चमचमीत जेवणावर ताव मारला. जेवणापूर्वीच सांस च्या कार्यकर्त्यांनी बॅजेस चे वाटप करून ४ टिमांमध्ये सबंध जनसंख्येला विभागून टाकले होते आणि जेवण झाल्यानंतर आपापल्या टिममेट्स सोबत गृप करून बसण्याचा धमकीवजा आदेश दिला होता. धोधो, झिम्माड, मुसळधार आणि रिमझिम अशी कल्पक नावे टिम्स ना देण्यात आली होती. जेवणानंतर डुलक्या येत असतानाही गपगुमान सांस च्या आदेशांचे पालन करते झालो. तेव्ह्ढ्यातही मयुरी_१ (सौ. असुदे उर्फ नीलिमा मामी) यांनी निद्राध्यान लावून आपली योगसाधना उरकून घेतली. Happy

सासंचे इंटरेस्टिंग खेळ सुरू झाले आणि सगळ्यांच्या झोपा पळाल्या. पहिला रिंगचा खेळ कुणालाच जमला नाही. नंतरच्या भौमितिक आकृत्या explain and draw करण्याच्या गेमने मस्त मजा आणली. पूनम छत्रे (पैर्णिमा) टीम लीडर असलेल्या "झिम्माड" टीम मध्ये मी होते. सांस ने एकाच फॅमिलीतल्या सर्वांना वेगेवेगेळ्या टीम मध्ये जाणून-बुजून टाकल्याने मोदक "मुसळधार" आणि नन्या "रिमझिम" टीम मध्ये गेले होते. भौमितिक आकृत्यांच्या गेम मध्ये नीलिमा ने explain केले व मी draw केले. नीलिमाच्या अचूक वर्णनामुळे मी झारा अचूक draw करून टीमचे मार्कांचे खाते उघडले. या खेळात घारुअण्णांना कात्री explain करायची होती. पण त्यांच्या डोक्यात असलेले कात्रीचे चित्र पल्लीच्या डोक्यात शिरेस्तोवर त्याचा कंदील झाला आणि पल्लीच्या क्यूट व ऐतिहासिक उडीचे साक्षीदार जाहण्याचा क्षण आम्हा धन्य धन्य लोकांच्या भाग्यात आला. Happy बाकी टीमनी सुद्धा जमेल तशा भौमितिक आकृत्या काढायचा प्रयत्न करून आणि त्या बरोब्बर ओळखून गुण कमावले.

पुढचा खेळ होता शॉपिंग लीस्ट चा. मी आणि पूनमने भागीदारी करून इथे हे सगळ्यांपेक्षा जास्त वस्तुंची लीस्ट बनवून बाजी मारली. Happy पुढच्या मायबोली प्रश्नमंजुषेला सुद्धा टीममधून गेलेल्या ३ जणांनी (यात एक दक्षी होती. अन्य २ आठवत नाहीत Sad ) छान फटकेबाजी करत टीमचा स्कोअरबोर्ड सतत हलता आणि इतर टीम्स पेक्षा चढा ठेवला. Happy नंतरच्या वीटेवर चालण्याचा पराक्रम करून साजिरा आणि प्रणव यांनी स्कोअर कळसाला नेला. पण दुर्दैवाने शेवटच्या चित्रकोड्याला मात्र वेळेत न जुळवू शकल्याने हाताशी आलेली विजयश्री मुसळधार टीम ने ओढून नेली. Sad पण सगळ्यांनाच सांस्कृतिक कार्यक्रमांत सहभागी करून घेण्याच्या दृष्टीने रचलेल्या खेळांना दाद द्यावीशी वाटते. Happy कोण हरलं आणि कोण जिंकलं यापेक्षा सगळे मिळून खेळलो हा आनंदच महत्त्वाचा होता. Happy

एव्हाना साडे पाच होत आले होते. त्यामुळे संयोजकांनी आभारप्रदर्शनाने दिवसाची सांगता केली व सगळ्यांनी रूम्स मधून आपापल्या बॅगा उचलून निघण्याची तयारी चालू केली. दिवसभरात ओळखी झालेल्यांना पुन्हा जाऊन भेटून बाय बाय करण्याचा व एकमेकांचे मोबाईल नंबर्स घेण्याचा कार्यक्रम पार पाडून मुंबईकर मुंबईच्या व पुणेकर पुण्याच्या बशीत जाऊन बसते झाले. परतीच्या प्रवासातही आनंदसुजु, आनंदमैत्री, योगमहे, मेधा२००२, घारुअण्णा, डुआय वगैरेंनी घसा दुखेस्तोवर व सकाळच्याच उत्साहात गाणी गायली. एकेका ला उलट्या क्रमाने ड्रॉप करत करत फायनली बस मुलुंडला परत आली तेव्हा "घालीन लोटांगण..." व "मंत्रपुष्पांजली" ने गाण्यांच्या कार्यक्रमाची सांगता केली. बसमध्ये फक्त किरु अ‍ॅन्ड फॅमिली, मालक अ‍ॅन्ड फॅमिली आणि प्र-साद अ‍ॅन्ड फॅमिली यांना सोडून बाकी सर्व उतरले. घरी पोचेस्तोवर पण ववि, ववि आणि फक्त वविच्याच आठवणी मनात रेंगाळत होत्या. Happy दिवसभरातल्या गमती जमती आठवून आठवून छान वाटत होते.

तर असा हा मायबोली चा २०१० चा ववि साठा मुंबईकरांच्या आणि साठा पुणेकरांच्या सोबत सुफळ संपूर्ण झाला.

या वर्षीचे ववि अ‍ॅवॉर्ड्स येणेप्रमाणे:

१) Best Performer of the day (male) - अर्थातच योरॉक्स (का ते सांगायला हवंय का? Wink )
2) Best Performer of the day (Female) - पल्ली (लावणीनृत्या करीता)
३) Best entertainer of the day (male) - योरॉक्स (once again) आणि आनंदसुजु (बसमध्ये नॉनस्टॉप गाणी म्हणून धमाल केल्याबद्दल) यांना विभागून
४) Best entertainer of the day (Female) - पल्ली (once again - तिच्या क्यूट उडीबद्दल)
५) ववि गौरव पुरस्कार - सर्व ववि संयोजक
६) बेस्ट फोटोग्राफी - योगेश२४ (सर्वात बेस्ट चित्रणबाजी बद्दल)
७) Best Male Debut - आगाऊ (भले भले लोक याच्या एन्ट्री ने पागल झालेत आणि त्याचे पटापट फॅनही झालेत. विश्वास बसत नसल्यास या आयडीची विपू बघणे Wink )
and last but not the least
८) Best Female Debut - सुपु (बस मध्ये ये लडकी एकदम छा गयी थी Happy )
९) Best person in supporting role (Male) - वैभव आयरे (गाण्यांना ढोलकीवादनाची साथ दिल्या बद्दल)
१०) Best person in supporting role (Female) - सौ. मधुरा भिडे (मालकांना संयोजनामध्ये actively cooperate केल्याबद्दल)
११) स्पेशल अ‍ॅवॉर्ड - निंबुडा (इतका मोठ्ठा वृ. लिहिल्याबद्दल Wink )

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हा लेखनाचा धागा वर्षाविहार २०१० या गृपमध्ये हलविण्यासाठी काय करावे लागेल बरं? अ‍ॅडमिन ना सांगू का?

पण दुर्दैवाने शेवटच्या चित्रकोड्याला मात्र वेळेत न जुळवू शकल्याने हाताशी आलेली विजयश्री मुसळधार टीम ने ओढून नेली. <<<< निंबे विजयश्री आमच्या धोधो टिमने ओढून नेली आहे Proud विसरलीस कि काय ...

एकदम सही वृतांत... Happy

मस्त लिहीलाय Happy
आता नेक्स्ट टाईम, तीनचा गजर लावा, जाग आल्यावर तो बदलून चारचा करा, परत झोपा, अन चारला उठा वेळेत Proud
(रखवालदार? निगराणी? Lol आयला मी असा दिस्तो?
पण असेल असेल, कोणे एके काळी सन्घाच्या शिबिरान्मध्ये सुरक्षाव्यवस्थेतच असायचो त्याचा परिणाम असेल!)

ए गप्पे सुक्या, खरी कसोटी चित्रकोड्याची होती, अन आमच्या टीमने सगळ्यान्च्या आधि ते पूर्ण केले.
बाकी ते खजिना मिळणे न मिळने या लक च्या बाबी होत्या! त्यात काय विशेष नाय! Wink

निंबे मजा आगया .......एकदम वविचा संपुर्ण दिवस डोळ्यासमोर उभा केलास......
बेस्ट म्युझिक डायरेक्टरचा (संगीत दिग्दर्शक) अ‍ॅवॉर्ड नव्हता का? Lol

खरी कसोटी चित्रकोड्याची होती, अन आमच्या टीमने सगळ्यान्च्या आधि ते पूर्ण केले.>>>

करेक्ट लिंबुदा...जय मुसळ्धार Proud

निंबे..काय सह्ही लिहिलंयस गं...लेडीज बायका Lol
अख्खा दिवस जसाच्या तसा डोळ्यांसमोर आला..व्वा!! मजा आ गया फिरसे Happy

ए गप्पे सुक्या, खरी कसोटी चित्रकोड्याची होती, अन आमच्या टीमने सगळ्यान्च्या आधि ते पूर्ण केले.
बाकी ते खजिना मिळणे न मिळने या लक च्या बाबी होत्या! त्यात काय विशेष नाय!

लिंब्या..तुझी अशी कळकळ, तळमळ सहाजिक आहे कारण कंबर कसून तयारी केली होती सगळ्याच टिम्स ने... बाकी हार लपवायला चांगली कारणं शोधलीत तुम्ही Proud

>>> बाकी हार लपवायला चांगली कारणं शोधलीत तुम्ही
लपवायचा कशाला? तुमच्या गळ्यात घातला की तेव्हाच Proud हार म्हणतोय हो मी! Biggrin

निंबे विजयश्री आमच्या धोधो टिमने ओढून नेली आहे >>>
ग बाई निंबुडे, विजयश्री धोधो टीमच्या खिशात पडली ग >>>
सॉरी सॉरी लोको, धोधो च म्हणायचं होतं पण मुसळधार लिहिलं. चा झाला ना Wink

बेस्ट म्युझिक डायरेक्टरचा (संगीत दिग्दर्शक) अ‍ॅवॉर्ड नव्हता का?>>
अरे, अजून काही अ‍ॅवॉर्ड्स च्या कॅटेगरीज आणि एलिजिबल कँडिडेट्स सूचवा ना. Happy

छान लिहला आहेस वृत्तांत निंबुडा... Happy
अच्छा तर ते तुम्हि येणार होता का कल्याणवरून...
<<आता नेक्स्ट टाईम, तीनचा गजर लावा, जाग आल्यावर तो बदलून चारचा करा, परत झोपा, अन चारला उठा वेळेत >> बरोबर Lol

यादीतले १२ जिन्नस पण लिही इथे... >>
बाप्रे :-ओ

आठवतेय. जसे जमेल तसे हे घे:

१) अगरबत्ती
२) फ्लॉवरपाट
३) मॉस्किटो मॅट्स
४) सेलोटेप
५) फुटपट्टी
६) कुकरची रिंग
७) सहाण

बाकी पूनमला विचारते. Uhoh

अग म्हणजे ईंद्र मला सांगत होता, कि अजून कल्याणवरून येणारे पोहचले नाहि आहेत , तो पर्यंत आपण जूईनगरला पोहचू म्हणून .. Happy

जल्लां निंबूडाने काय लिवलं मला काय ठावूक रे इन्द्रा?? Uhoh पण मला काही आठवत आहेत-

स्टिकर्स (मी सारखी सांगत होते बघ, सेलोटेप अन् स्टिकर्स दोन्ही आहेत)
मनुका
बेडशीट
बटर पेपर
बडीशेप

एवढेच! Sad
जल्ला ती कोड्याच्या तुकड्यात पैठणीच्या बक्षिसाचेही तुकडे झाले ना! Proud

स्टिकर्स मी लिवायला इसरले हुते, पण स्टिकर्स आन् मनुका लिवल्या व्हत्या म्या Proud

तुळशीचं बी पण व्हतं बघा त्या लीस्ट मंदी Proud

निंबुडे ...छानच गं....मस्त लिहिलयस....
बाकी मल्लुला आणि त्या चिमण्याला काहितरी देवुन टाक बर.....
किती गोड(! )हट्ट आहे त्यांचा..........

Pages