तामण, समुद्रफळ आणि बांबूची फुले

Posted
16 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
16 वर्ष ago

आज काहि जून्या आठवणीना उजाळा.
आपल्या महाराष्ट्राचा राज्यवृक्ष असणारा तामण आता सगळीकडे फुलला आहे. जांभळ्या, गुलाबी, पांढर्‍या आणि क्वचित पिवळ्या रंगात फुलणारा हा तामण, मन मोहून घेतो. याचे मोठेमोठे गुच्छ असतात, आणि एकाच गुच्छात गडद ते फिक्कट अश्या सर्व छटा असतात. समुहामुळे एकांड्या फुलाचे सौंदर्य सहसा जाणवत नाही. तर हा खास नजारा.

taaqman.jpg

समुद्रफळाबद्दल मी अलिकडेच लिहिले होते. त्यावेळी किशोरने फळ बघायची इच्छा दर्शवली होती. तर अभिषेकपात्रासारखे दिसणारे हे फळ.

samudrafal.jpg

बांबूचा फुलोरा तसा खुप दुर्मिळ. साधारण साठ वर्षानी एकदा बांबूला फुलोरा येतो. मग त्या जातेचे सर्वच बांबू मरतात. या फुलोर्‍यात तांदळासारखे दाणे तयार होतात, व ते खाता येतात. या अमाप पिकामूळे उंदरांची भरमसाठ पैदास होते, आणि दुष्काळ पडतो, असा समज आहे. ते गैर ठरावेत. मीदेखील पहिल्यांदाच हा फुलोरा बघितला.

baamboo.jpg

विषय: 
प्रकार: 

फुलोरा दाखवल्या बद्दल आभारी

विकि अहिरे

सिंगापूरमधे वळणावळणावर तामण बघायला मिळातो. पाऊस पडला की तो अंगाग फुलून येतो आणि पाऊस संपला की पुन्हा रिक्त त्याचे रुप गुलाबीहून हिरवेगार होउन जाते.

बांबूचा बहर पहिल्यांचाच बघतो आहे.

बांबूचा बहर दाखवल्याबद्दल धन्यवाद. खूप इच्छा होती बांबूचं फूल पहायची. हा फुलोरा उमलतो का? की हेच फुल आहे?

बांबूचा फुलोरा प्रत्यक्ष कधी पाहीला नाहीये पण tissue culture lab मधे test tube, conical flask (दोन्हीचे मराठी आत्ता आठवत नाहि)मधे ही फुले पाहीली आहेत. तिथे बघणे आणि निसर्गात बघणे हे नक्किच वेगळं असणार.
तामण खूप सुन्दर दिसत आहे.
प्राजक्ता

सगळेच फोटो छान आहेत, धन्यवाद.
बांबूच्या वनाबद्दल अधिक माहिती हवी असेल तर मारुती चितपपल्ली यांच्या रातवात नक्की मिळेल. बांबूला फुले येणे ठराविक काळानंतर घडत असेल तरी याआधी ४-५ वर्षे त्यांना नवे कोंब येणे कमी होते, भाताच्या प्रदेशात ( साधारण जिथे बांबू असतात.) तिथे दुष्काळ असतो..त्यानंतर ही फुले येतात आणि ते बांबू नष्ट होतात... आदिवासींचे खाद्य कमी होते. म्हणून कदाचित आदिवासी बांबूला फुले येणे अशुभ मानत असावीत.

महाराष्ट्राच्या घाटात बांबू खुप आहे, कोकणात आणि देशातही गावागावात चिवारीची बने आहेत. अनेक कामासाठी तो उपयोगी पडतो म्हणून जोपासला जातो.
पण फुलोरा मात्र दुर्मिळ. बांबूच्या अनेक जाती आहेत आणि त्यापैकी एक प्रकार सगळीकडे एकाचवेळी फुलतो. हा फुलोरा वेगवेगळा असू शकतो. यात तांदळासारखे धान्य तयार होते आणि ते साठवून त्याची खीर वगैरे करतात. रविंद्रनाथ टागोरांनी या खीरीची आठवण लिहिल्याचे आठवतेय. पथेर पांचाली या सिनेमात या फुलोर्‍याची दॄष्ये असल्याचे आठवतेय. तसेच दुष्काळाच्या शोधात अश्या अर्थाचे नाव असलेल्या एका बंगाली सिनेमात पण अशी दृष्ये होती. ( या सिनेमात स्मिता पाटिल होती )
बांबूला मोठी फळे लागल्याचा फोटो पण मी बघितलाय ( साधारण वरच्या फोटोतले समुद्रफळ आहे ना, तसेच हे फळ दिसते ) हा फुलोरा अमाप फुलतो आणि हे पौष्टिक खाद्य मिळाल्याने उंदराची अमाप पैदास होते. या फुलोर्‍यानंतर त्या जातीचा सर्व बांबू मरून जातो, पण या बिया रुजून नवीन बेटे तयार होतात.
हे धान्य अनेकजण भरुन ठेवतात. या फुलोर्‍यानंतर दुष्काळ पडतो असा सार्वत्रिक समज आहे खरा. बांबूला आदिवासी लोकांत खूप महत्व असल्याने ( त्यांच्या निवार्‍यापासून खाद्या पर्यंत अनेक गरजा बांबू भागवतो ) त्याना हि घटना अशुभ वाटते.
वरचा फोटो मुंबई हायकोर्टाच्या आवारातला आहे. त्या परिसरात आणखी बांबू दिसला नाही, आणि मुंबईत इतरत्रही असा फुलोरा दिसला नाही.

पथेर पांचाली >> हो दिनेश मलाही तसेच वाटते आहे.. आणि ते दृष्य दाखविताना अगदी दैन्य असलेली परिस्थिती दाखवली आहे. खास रेंच्या डोळ्यातून फुलोरा बघण्यासाठी पुन्हा एकदा हा चित्रपट बघेन आता.

बांबूच्या फुलोर्‍याबद्दल मी एका पुस्तकात वाचलं आहे(बहुदा 'गोईण' - लेखिका 'राणी बंग')
यात असा उल्लेख आहे की,
आदिवासी स्रिया बांबूच्या या फुलोर्‍याचे वाळवून पीठ करुन ते स्वयंपाकात वापरतात.
आदिवासी बाईला जर विचारलं की जेवायला काय आहे? तर ती म्हणते, "एका दिवसाची भाजी आणि साठ वर्षांची भाकरी" (बांबूला फुलोरा ६० वर्षांनी येतो ना!)

थँक्स ! तामण वृक्षाची फुलं खुप पाहिली होती, पण नाव माहित नव्हतं. पिवळीसुद्धा पाहिली आहेत.

बांबुचा फुलोरा पाहिल्यावर मी 'दुष्काळा'बद्दल विचारणार होते. तुमच्या प्रतिसादामधे खुलासा झाला. पण अजुनही कळलं नाही कि हा समज आहे कि काही लॉजिक आहे या पाठीमागे?

समुद्रफळाचा आकार गोड आहे. अभिषेकाच्या कलशासारखा.

ओ या फुलांचं नाव तामण आहे !! ..
बांबू चा फुलोरा पहिल्यांदाच पाहिला.. खूप माहिती कळत आहे ,धन्स!!!
समुद्रफळ?? म्हणजे ही झाडं कुठे उगवत असतात??? आधी लिहिले आहे?प्लीज लिंक द्या इकडे.. Happy

दिनेशदा, बांबूचे फूल (फुलोरा) प्रथमच बघितला.
तामणीचा आणि समुद्रफळाचा फोटो सुंदरच!!
जातीच्या सुंदराला आणखी काय अलंकृत करणार? तामणीला उपमा तामणीचीच.. नाही?