वाळलं पान

Submitted by मीन्वा on 16 April, 2008 - 06:45

फांदीपासून तूटलेलं पान..
पुन्हा जोडलं जाण्याची वाट पहात..
झाडाच्या बुंध्याशी, किती काळ थांबेल?
जीवनरस असेपर्यंत झगडेलही कदाचित,
ते वार्‍याच्या झोताशी.
एकदा का जीवनरस संपला,
की उरतं केवळ वाळलं पान,
वार्‍याच्या झोतानिशी भरकटणारं..
वारा नेईल तेव्हा,
वारा नेईल त्या दिशेला वहात जाणारं..
झाडाला आठवत असतील का ती सारी पानं?
आणि पानाला..?

गुलमोहर: 

खूप छान आहे ही कल्पना !!
-- शकुन

झाडाला आठवत असतील का ती सारी पानं?
आणि पानाला..?>>.
छाने...

वाचली ही कधीच. मिनू, प्रतिक्रिय आज देतेय.
सुंदर. खरच!
....पानाला? आठवत असेल?
भरकटण्यावाचून नशिबी काही नाही अशांनी काय करायचं असतं?