दर्पणाने सांगावे....

Submitted by सांजसंध्या on 19 July, 2010 - 09:15

mirror_reflection.jpg

दर्पणाने सांगावे, काय बदल झाले गं
रोजची मी आहे जरी, दुनिया का बदलते गं......... । धृ ।

रोजचाच रस्ता हा, बगीचाच भासतो
ताटवे हे फुलांचे गं, सांग कसा आखतो
उंबराच्या शाखेवर, मोगरा गं डूलतो
मोकळ्या या केसांशी, वारा कसा खेळतो

एकटीने हरवावे, हाय असे वाटे गं
रोजची मी आहे जरी.....................................| १ |

उन्हामधे सावल्यांचा खेळ पहा चालतो
मनामधे आठवांचा, मेळ कसा दाटतो
आरशांत पाहतांना, कोण हा खुणावतो
स्वत:लाच शोधतांना, जीव का खुळावतो

सखयांशी बोलावे, गूढ हे मनीचे गं
रोजची मी आहे जरी.....................................| २ |

गूलाबाच्या रंगात जाईजूई रंगते
केवड्याच्या गंधात, रातराणि गंधते
चांदणीच्या पावलांनी, रात्र का गं हासते
पहाटल्या स्वप्नांनी, जागेपणी लाजते

छेडतात सख्या मला, बदनाम झाले गं
रोजची मी आहे जरी, दुनिया का बदलते गं.............| ३ |

संध्या

गुलमोहर: 

संध्ये,
छान गेय कवीता आहे, तुझ्या नेहमिच्याच कवितांसारखी!
सर्व कडवी वेगवेगळे भाव दर्शवतात.
शेवटाच कडवं झक्कासच!

deleted.

deleted

माझ्या वि.पू. त या कवितेची लिंक का होती ? I mean, तुम्ही ईथल्या जुन्याच पण आय्-डी बदलून आला आहात का ? Anyway, कविता चांगली आहे. पण काव्य म्हणून फार काही वेगळे वाटले नाही ! पु. ले. शु. Happy

जुन्या कविता वाचताना मिळाली. मायबोली छान होती की..

( यावर मल्लिनाथी करण्यासाठी ब्लॅक लिस्ट घेऊन एक आयडी येणार ! )

सखयांशी बोलावे, गूढ हे मनीचे गं
रोजची मी आहे जरी.....................................| २ |
गूलाबाच्या रंगात जाईजूई रंगते
केवड्याच्या गंधात, रातराणि गंधते
चांदणीच्या पावलांनी, रात्र का गं हासते
पहाटल्या स्वप्नांनी, जागेपणी लाजते
छेडतात सख्या मला, बदनाम झाले गं
रोजची मी आहे जरी, दुनिया का बदलते गं...>>>>मस्तच ! ! !
कुठे होती हि कविता ...