जिसा'चा'राडा चहा स्मारक

Submitted by मीन्वा on 19 July, 2010 - 02:59

जिसा'चा'राडा (पिनाकोलाडा च्या चालीवर) हे चहाचे स्मारक सुप्रसिद्ध चहा प्रेमी श्री श्री रा. (डा. च्च च्च ) रा. चहातज्ञ डॉ. साजिरा यांनी बांधले. हे स्मारक महाराष्ट्र राज्यात पश्चिमेस, रायगड जिल्यात, तालूका खालापूर येथील सुप्रसिद्ध 'यु के'झ रिसॉर्ट (युके! ये वहां है...) येथील भल्यामोठ्या सभागृहात आहे. हे स्मारक १८ जुलै २०१० रोजी मायबोलीच्या वविमधे बांधण्यात आले.

स्मारकाच्या वरील बाजूस कुणाही चहाप्रेमीस हळहळायला लावतील असे काळीज पिळवटून काढणारे उच्चार कोरलेले दिसतात "हा कुणी सांडला चहा ??" सांडलेला चहा, मध्यावर एकात एक घातलेले तीन चहाचे ग्लास, बाजूस एक तरंगणारा कागदाचा छोटुकला बोळा (हा बोळा साजिरा यांच्या पूनम वहीनींची आठवण आहे असे अधिक माहीती काढली असता कळाले) असे अत्यंत नाविन्यपूर्ण असे हे स्मारक आहे. यावर एक खुर्ची आहे जी प्रत्येक चहाप्रेमीस प्रेमाने बोलावते. स्मारक पहायला गेल्यास तुम्हाला या खुर्चीत बसून चहा पिताना फोटो काढता येतो.

बाजूलाच एका दगडावर एक सुरेख चहा काव्य कोरलेले आहे. जे चहा स्मारकाची लज्जत अजूनच वाढवते. कवितेचे नाव आहे 'चहाचा पाढा' (कुणाला पाठ असेल तर लिहा प्लिझ.. (ओवर टू आशू_डी)) हे स्मारक एखाद्या मॉडर्न आर्टप्रमाणेच आहे हे आता तुमच्या लक्षात आलेच असेल.

'चहा' ज्याला भुलोकीचे 'अमृत' असे म्हणतात त्याचे स्मारक बांधण्याची ही अभिनव कल्पना साजिरा यांना सुचली याबद्दल आपण त्यांचे अभिनंदन करु यात. आमच्या प्रतिनिधीने याबद्दल त्यांचे अभिनंदन केले असता "ही एकप्रकारे मी चहाला, भुलोकीच्या अमृताला (अ.आ. आलात? या या.. ) दिलेली मानवंदनाच आहे" असा नम्र अभिप्राय त्यांनी दिला. त्यांचा हा नम्रपणा पाहून आमच्या प्रतिनिधीच्या डोळ्यात खळ्ळकन पाणी आले. "'पाणी वाचवा, पाणी वाचवा' हे पुणे आहे खोपोली नव्हे" अशा आरोळ्या काही लोकांनी दिल्या पण शेवटी ते वाहीलंच! (पाणीच ते..!)

जगात महान लोकांनी बांधलेली अनेक स्मारके आहेत उदा. ताजमहाल. अशी स्मारके कवि आणि कवयित्रींच्या प्रतिभेला नेहेमीच आव्हान देत आली आहेत. 'जिसाचाराडा' हे चहा स्मारकही त्यास अपवाद नव्हेच. अनेक उत्कृष्ट काव्य या चहास्मारकाला पाहून लिहीली गेली.. वानगीदाखल ही खाली दिलेली काही सुप्रसिद्ध काव्ये आठवा

चहा सांडला.. - कवी - देवा
लपविलास तू चहा सांडता.. ओघळ त्याचा लपेल का? - कवयित्री मीनू
चहा सांडून सांडून सांडू नको...कप मांडू नको.. - कवयित्री मीनू

सुप्रसिद्ध गझलकार मिल्या यांनाही या चहाच्या स्मारकाला पाहून एक उत्तम गझल सुचली - तू चहाचा नाद साज्या सोड आता..

या पोस्टखाली वर उल्लेखलेली सर्व काव्ये तुम्हाला लवकरच वाचावयास मिळतील.

वैधानिक सूचना: प्रत्येक चहा आधी '\' वाचावा. न वाचल्यास निर्माण होणार्‍या अर्थातून काही अनर्थ घडल्यास लेखिका जबाबदार नाही.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हे स्मारक तयार करताना घारुआण्णांनी भारीच प्रश्न विचारला होता... अरे हा चहाचा अपमान कोणी केला???

मीनू.. Lol

मला पुरते भंजाळवून टाकले राव. एक चहा काय तो सांडला. लोक काय चहा सांडत नाहीत? चोरी तो नही कीऽऽऽ हैऽऽऽ.. हंगामा है क्यु बरपाऽऽऽऽ. Proud माझे इतके कानकोंडे करून टाकले, की 'मी पूर्ण पैसे भरले आहेत, त्यामुळे चहा सांडायचा मला हक्क आणि अधिकार आहे. अजून जाईन युकेला. अजून पैसे भरेन. आणि अजून चहा सांडेन.' हा डिफेन्स पण मला नाही सूचला. अक्षरशः लहान लहान मुलांनाही ओरडून ओरडून जवळ बोलावत हे लोक 'विचार बघू, ह चहा कुणी सांडला!' असं विचारत होते. Sad ती लहान मुले विचित्र नजरेने एकदा मीनूकडे आणि एकदा सांडलेल्या चहाकडे बघत निघून जात होती.

तरी साजिर्‍या, तू पैसे भरले आहेत, आणि तुझ्याकडून अपेक्षित तोडफोडसांडलवंड खात्याची नुकसान भरपाई आधीच वसूल केली आहे हे मी आणि मीन्वानेच तुझ्या लक्षात आणून दिले हे विसरु नकोस. Proud
आणि मीन्वाला ओलीस ठेवणार होतास तू यू के मध्ये त्याचं काय झालं?? पाऊस पण येत होता. असं स्मारक बघावं लागलं नसतं तुला. Wink

<< मीन्वाला ओलीस ठेवणार होतास तू यू के मध्ये >>
अशी धमकी पण दिलेली काय त्यांना ? तरीच तो मॅनेजर गेट पर्यंत सोडायला आला होता, परत घेउन गेलात की नाय त्याची खात्री करायला....

मिन्वा Lol

अग सोड की त्या साजिराला... एक झाड पकडले की अगदी सोडत नाहीस Happy
पण विडंबने येउ देत Wink

अग सोड की त्या साजिराला... >> वा रे वा! काल चहा सांडला उद्या पाणी सांडेल Proud
आशू चहाचा पाढ लिही बरं आधी मग पुढची काव्य येतील.

हो. 'तू जास्त त्रास दिलास, तर मी तुला रिसॉर्टमध्ये ओलीस ठेवणार' अशी धमकी मी बसमध्ये मीनूला दिली. पण 'ओलीस? कशा ठेवशील? पाऊस कुठे आहे? कोरडीस ठेव, कोरडीस!' असं रावणासारखं खीखीखी हसत मीनूने मलाच विचारलं.

नंतर पाऊस पण लेकाचा उशीराच आला. आणि अमित म्हणतो तसा रिसॉर्टच्या मालकांनी घाबरून लगेच मीनूसकट सर्वांना बाहेर काढलं.

हा पाढा माझ्या आज्जीने लहानपणी मला शिकवला होता. सो कॉपीराईट अ‍ॅक्ट पासून सावधान! चहासाठी, सोबत लागणारे पदार्थ आणि वस्तू आणि चहासाठी वेडं होणारे लोक असा एकूण संदर्भ आहे. मी तेव्हा वयवर्षे ५! त्यामुळे अगदीच र ला र जोडलेलं बालगीत आहे. पण ५ ते ७५ असा वयाचा मोठा स्पॅन 'चाहत्यां' मध्ये येत असल्याने काही जड शब्द ही आहेत. (तेव्हापासून मी चहांबाज आहे हे सांगणे न लगे!) Proud
***
चहाचा पाढा

चहा एके चहा
डोळे उघडून पहा
चहा दुणे कप
बोलू नको गप
चहा त्रिक चमचा
तू नाही आमचा
चहा चोक बशी
अक्कल गेली काशी
चहा पंचे गाळणं
गटारातलं लोळणं
चहा सक किटली
अब्रू सारी विटली
चहा साती पाव पाव
पोटात करतंय काव काव
चहा आठी बिस्कीट
कपाळाची किटकिट
चहा नवे खारी
आई तोंडात मारी
चहा दाहे चहा प्याला
थप्पड मारता प्राण गेला!
***
Happy

Biggrin

मी पाहिलेलं ते चहाचं थारोळं आणि तो सांडल्यावर सगळ्यांनी फरफरा बाजूला ओढलेल्या खुर्च्या.

पण....
असा कसा रे सांडलास तू चहा, साजिरा? Proud

साजिर्‍या, हे असेच चालत राहिलं तर तुझा आयडी सा(न्ड्)जिरा म्हणूनच माहीत होईल लोकांना. Happy

Lol चहाचा पाढा मस्त आहे.

>>हो. 'तू जास्त त्रास दिलास, तर मी तुला रिसॉर्टमध्ये ओलीस ठेवणार' अशी धमकी मी बसमध्ये मीनूला दिली. पण 'ओलीस? कशा ठेवशील? पाऊस कुठे आहे? कोरडीस ठेव, कोरडीस!' असं रावणासारखं खीखीखी हसत मीनूने मलाच विचारलं. << जबरदस्त.

साजीर्‍या . . .

कुठं फेडशील चहा सांडल्याचं पाप . . .
तरी बरं एकटाच होतास.. लहान (तुझीच) मुलगी नव्हती... काय वाटल असत तीच्या बालमनाला .. Lol

जिसाचाराडा स्मारकाचा राडा पाहून माझ्या कवीमनाला अत्यंत आनंद झाला आणि आपसूकच खालील ओळी बाहेर पडल्या. सर्व चहाप्रेमींना त्याचा आस्वाद घेता यावा म्हणून त्या ओळी इथे देत आहे.

लपविलास तू चहा सांडता.. ओघळ त्याचा लपेल का? ("लपविलास तू हिरवा चाफा..." या चालीवर घ्या लोकहो)

लपविलास तू चहा सांडता,
ओघळ त्याचा छपेल का?
चहा लपवुनी लपेल का?

गरम चहा, ग्लास पांढरे (थर्माकोल होता .. हे चाणाक्ष वाचकांनी ओळखलं असेलच ना Happy )
लक्ष विचलीता, निसटे सारे,
पकडीलेस तू जरी हाताने
खुर्ची ठेवूनी छपेल का?

क्षणात पडणे, खाली सांडणे
चहात कप, ते तुझे ठेवणे
हे चहाचे देणे घेणे
घडल्यावाचुन चुकेल का?

पुरे बहाणे, चहा झाकणे
साज्या तुझिया मनी सजविणे
तुही जाणे, वैनी जाणे
कागद त्याला टिपेल का?

ओघळ त्याचा छपेल का?
चहा लपवुनी लपेल का?

(मूळ गीत गदिमांचं आहे. http://www.aathavanitli-gani.com/Song%20Html/888.htm गदिमांची मनःपूर्वक माफी मागून....)

Pages