त्याला जीवन ऐसे नाव

Submitted by abhijeet4frnz on 15 April, 2008 - 10:45

वाटे एका क्षणी...
काय ती स्म्रुति सुमने
काय ती गंधित कुसुमे
काय ती इन्द्रधनुची कमान
अल्हाददायक, हळुवार. ॥१॥
वाटे दुसर्‍या क्षणी...
किती हे दुख:
किती या व्यथा
किती ही वेदना
उरी फुटनारी, अस्फुट. ॥२॥

वाटे त्याच क्षणी...
यातच दिसे प्रव्रुत्ति-निव्रुत्ती
यातच दिसे द्वैत-अद्वैत
यातच दिसे अजान व्रुक्ष अश्वथ
अनादि-अनंत. ॥३॥

पण काही का असेना, जगात
शाश्वत सत्य एकच
शाश्वत सोंदर्य एकच
शाश्वत मांगल्यही एकच
सुगंन्धित समन्वयात्मक.
सुगंन्धित समन्वयात्मक.

* * * * * * * * * * * * * * * *
अभिजीत४मैत्री
( समन्वय नेहमीच सुगंधित असतो.)

गुलमोहर: