भिकारी

Submitted by आशिष पवार on 16 July, 2010 - 02:46

मज भुक लागली असे
पोटात अन्नाचा कण
अणं ओठांवर जिव्हाळा असे
आजरी कोण मज अन्नाचा द्यायला नसे

रस्ता तप्त, ऊन झळझळत
नागे पाय तव्यावरील पोळी सम पोळत
भास्कर मध्यांनही आग ओकत.........तरी कोण मज अन्नाचा कण देत नसत

विशाल कालचक्र माथ्यात भरकटत
द्रुष्टी हि आता चालली साथ सोडत
नश्वर देहाचा हा खेचर ,तरी जाई पुढे चालत...............................

घसा माझा दुष्काळाच माहेर घर
पोटात उठे कावळ्यांचा कल्लोळ
अंग काठीवर गाठींचे डबुकवडे
खाज हळुच लचके तोडे

विसावा घेत पाराचा
शोध उकिरड्यावर अन्नाचा
असा जीव या भिकार्‍याचा............ ना कोणी जाणला.

गुलमोहर: