आग्रहाचे निमंत्रण..

Submitted by प्राजु on 13 July, 2010 - 00:41

नमस्कार !
मायबोलीच्या सर्व रसिक वाचक, लेखक्, कवी, सुगरणी आणि बल्लवाचार्य मित्र्-मैत्रीणींना सांगताना मला खूप आनंद होतोय, की, माझ्या कविता 'फुलांची आर्जवे' च्या रूपाने रसिकांसमोर आल्यानंतर, त्यातल्या काही कविता आता गीत रूपाने अल्बम मधून तुमच्या समोर येत आहेत. माझ्या कवितांना, उत्तम चाली मध्ये बांधलं आहे संगीतकार अभिजीत राणे यांनी, आणि गायलं आहे वैशाली सामंत, बेला शेंडे, मधुरा दातार, संगिता चितळे, अमृता काळे आणि पौलमी पेठे यांनी.
एक स्वप्नं , जे उरी बाळगलं होतं.. ते आता प्रत्यक्षात येताना बघणे म्हणजे एक सोहळाच आहे. एक अपेक्षापूर्तीचा क्षण... एक खूप मोठा दिवस.. एक खूप मोठा प्रसंग.. आणि एक खूप मोठं पाऊल क्षितिजाच्या दिशेने! याचे साक्षीदार तुम्ही रसिक माय्-बाप.
मोठ्या मनाने, माझ्या बाळबोध कवितांना प्रगल्भ केलंत, अखंड मायेचा हात पाठीवर ठेवलात, नेहमीच उत्तमोत्तम लेखन माझ्याकडून व्हावं म्हणून प्रोत्साहन दिलंत.. तुमची नेहमीच ऋणी राहिन मी.
या माझ्या आनंदाच्या क्षणी, तुमची उपस्थिती असणं खूप गरजेचं आहे.. तुमच्या शिवाय हा कार्यक्रम पूर्ण होऊ शक्णार नाही. अपूर्णच राहील ही घडी !
नेहमीच माझ्या सोबत आलात.. माझ्या या क्षणांतही माझी साथ द्याल असा विश्वास आहे.
आपणा सर्वांना हे आग्रहाचे निमंत्रण.. माझ्या आनंदात सहभागी होण्यासाठी मनापासून विनंती करते..

nimantraN

आपल्या सर्वांची वाट पाहीन कार्यक्रमाच्या ठिकाणी..

- प्राजु

अल्बम मधील काही गाण्यांची झलक आपल्याला येथे ऐकायला मिळेल.
कार्यक्रमाच्याठिकाणी अल्बम १०% सवलतीच्या दरात उपलब्ध राहील.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अभिनंदन.. प्राजू. Happy यापुर्वी २ मायबोलीकरांच्या कविता गीतबद्ध होऊन त्या ऐकल्या आहेत त्यातले एक म्हणजे जयश्री अंबासकर यांचे अन दुसरे वैभव जोशी यांचं.. आता तुमच्या कविता गीतातून ऐकायला मिळणार हे आमचं भाग्यच. कार्यक्रमास खूप सार्‍या शुभेच्छा.

अभिनंदन..! अभिनंदन..!! अभिनंदन..!!!

त्रिवार अभिनंदन.. आणि खूप सार्‍या शुभेच्छा. Happy

अभिनंदन!!!!!!!
हार्दिक अभिनंदन!!
पुढिल वाटचालीकरीता हार्दिक शुभेच्छा!!!!

अभिनंदन प्राजु! तुला उत्तरोत्तर अशाच कविता स्फुरोत आणि त्यांच्या गंधखुणांनी रसिकमने दरवळोत! Happy