Submitted by sanika11 on 12 July, 2010 - 06:26
तुला पाहता, गर्द रानी नाचतो गं मोर
निळ्याशार वस्त्रावर खुले चवथीची कोरं
तुला पाहता.....
तुला पाहता.....
येते वार्याला भरते नि सागरा उधाण
पिसाटला चाफा करतो गुणगंधाचे निधान
तुला पाहता.....
तुला पाहता.....
हरवते दिशा, वाट चुकते गं पाऊल
निळ्या वेड्याला लागते कशी अधीर चाहूल
तुला पाहता.....
तुला पाहता.....
बहरतो कसा केवडा, तल्लीन सारे रान
तुझ्या कस्तुरीने त्याचे हरपते देहभान
तुला पाहता.....
तुला पाहता.....
जो तो तळमळे, तुझा साधण्या संग
स्वर्गही डळमळे, होतो भल्याभल्यांचा तपोभंग
तुला पाहता.....
गुलमोहर:
शेअर करा
सुरेख!
सुरेख!
सुरेख.
सुरेख.
धन्यवाद
धन्यवाद
मस्त
मस्त
Wow.
Wow.