कृष्णवड

Posted
13 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
13 वर्ष ago

krushnavad.jpg

श्रीकृष्णाची काहि देवळे, हवेली पद्धतीची असतात. हवेली मधला देव हा तान्ह्या बाळाच्या रुपात पुजला जातो. त्याच्या उठण्याच्या, झोपण्याच्या, जेवणाच्या वेळा आवर्जून पाळल्या जातात.

भक्तांच्या गजबजाटाचा त्रास नको म्हणुन दिवसातून काहि वेळ चक्क पडदा बंद करुन त्याला झोपवले जाते. त्याला छोटे छोटे कपडे शिवलेले असतात, लहान बाळाप्रमाणे ते दिवसातून चार वेळा बदलले जातात. हे कपडेहि खास ऋतुप्रमणे शिवलेले असतात. बाळाची अंघोळ झाली कि शेकशेगडी असतेच शिवाय ओले कपडे बाधू नयेत म्हणून त्यानाही धुरी दिली जाते.

खास श्रावणात त्याला फ़ळांची, फ़ुलांची, भाज्यांची आरास केली जाते, कधी झोपाळ्यावर तर कधी होडीत बसवले जाते. हे सगळे बघता ती मूर्ती केवळ धातूची आहे याचे भानच उरत नाही.

निसर्ग पण कृष्णाचे बरेच लाड करतो. नाहणार्‍या गोपिकांवर मारण्यासाठी कदंबाने चेंडू दिले, वाजावायला वेळुने पावा दिला, त्याच्या पूजेत फ़ूलाची उणीव कधीही भासू न देणारा गोविंदवृक्ष आहे. त्याचे नेतृत्वगूण दाखवणारे, कृष्णकमळ आहे.

आणि बाळाला भूक लागली तर, त्याची नको का सोय करायला. बाळाला आवडते दहि लोणी. मग त्यासाठी एक छोटीसी कटोरी नको का ?

ती सोय केलीय या कृष्णवडाने. किंवा माखनकटोरीने. काहि झाडांची पाने किटक शिवून त्याचा द्रोण करतात. शिंपी पक्षीही असेच करतात, पण या झाडाचे मात्र प्रत्येक पान नैसर्गिकरित्या असे असते. याचा उल्लेख मी माझ्या वडावरच्या लेखात केलाच होता, पण त्यावेळी फोटो नव्हता मिळाला, तो आज देतोय.

विषय: 
प्रकार: 

मस्तच!
अप्रतिम माहिती आणि सुंदर फोटो बद्द्ल मनापासुन धन्यवाद!
वर आपण नमूद केलेल्या वडाच्या लेखाचा दुवा क्रुपा करुन द्यावे.

धन्यवाद!
योगेश

दिनेशजी, बरेच फोटो पाहिले, तुमच्या रंगीबेरंगीवर. अप्रतिम छायाचित्रण. प्रत्येक फोटोत उन्ह किती सुंदर दिसतय. छानच.

आभार, माझा तो लेख जून्या रंगीबेरंगी वर असणार. या झाडाचे शास्त्रीय नाव Ficus krishnae असे आहे. यामागची कल्पना मला खुपच रम्य वाटते. द्रोण तसा छोटा असतो, अक्षरशः कवडीभर दहि मावेल एवढाच. पण झाडाचे प्रत्येक पान तसे, म्हणजे कमालच ना.

कमालीची सोय केली आहे निसर्गाने. माहिती आणि फोटो छानच!

दिनेशदा!

कृष्णवड, उर्वशी, समुद्रफळ, नोनी, पाचुंदा सगळेच अत्यंत सुंदर!

एक सीडी बनव बघू!