हे शिवाय शंकरा

Submitted by पल्ली on 13 April, 2008 - 03:55

ॐ नमः शिवाय शंकरा
विशुद्ध तू सुक्ष्म तू
सौम्य तू रुद्र तू
ॐ नमः ॐ नमः
नमः शिवा नमः शिवा ||
ॐ नमः शिवाय शंकरा
विराट वेग ज्ञान तू
ध्यान तू तपकार तू
अजर तू अनंत तू
अनादी तू कल्पांत तू ||
ॐ नमः शिवाय शंकरा
अकाल मृत्यू निवारका
विभुती भस्म धारका
किर्ती तू नी शक्ती तू
मोक्षदायी देवता ||
ॐ नमः शिवाय शंकरा
सामर्थ्य दे नी साध्य दे
कष्टशक्ती अन ईष्ट दे
प्रियव्यक्ती, ज्ञानभक्ती
हेतुसाध्य, भाव दे ||
ॐ नमः शिवाय शंकरा
अर्थसाध्य लाभु दे
अपत्य सौख्य नांदु दे
संयमित वृत्ती नी
शिलभाव राहु दे ||
ॐ नमः शिवाय शंकरा
त्रिनयनि महाऋषी
व्याघ्रासनी मुंडाभुषी
कंठी रुद्राक्ष माळा
त्रिशूल, डमरू आगळा ||
ॐ नमः शिवाय शंकरा
नमामि निलकंठा
नमामि सर्पधारका
नमो नमो नमो नमो
नमः शिवाय शंकरा ||

गुलमोहर: 

काही शब्द मला निट टाईप करता आले नाहीत कुणी सांगेल का कसे करावेत ते?

विराट वेग ग्यान तू>>>ज्ञान>>dnya
अनुस्वारासाठी कॅपिटल एम वापर.
सौख्य>>sau
रौद्र >>>rau

छान झालीये प्रार्थना Happy

लिहायला अजून काही अडचण येत असेल तर वरती प्रश्नचिन्हावर क्लिक कर . Happy

पल्ली, आवडली प्रार्थना.

हे शिवाय शंकरा>>>>>>
'शिवाय' हे संस्कृत रूप आहे, शिव या अकारान्त पुल्लिंगी शब्दाचे. चतुर्थी एकवचन. संस्कृतातल्या नियमांप्रमाणे 'ज्याला द्यायचे, नमन करायचे' त्याची चतुर्थी विभक्ती वापरतात.

देवाय नमः.... नमः शिवाय, वगैरे. मराठी शिवाय चा अर्थ वेगळा होतो.

वृषभ वाहका<<<<
माफ करा, पण याचा अर्थ पार विपरीत होत आहे. तुम्ही लिहिलेला सर्पधारक हा शब्द पहा. (सर्प धारण करणारा) तोच नियम या शब्दाला लावून बघा. (एक उदाहरण म्हणजे, उष्णतावाहक धातू वगैरे. म्हणजे जो धातू उष्णता वाहून नेतो तो.) वृषभ हे वाहन असणारा असा अर्थ या शब्दाचा होत नाही.

मृत्यूअजय देयका <<<<<<<<
म्हणजे काय? नीट कळत नाही.

बाकी कवितेतले मला जास्त कळत नसल्याने ते मी बोलणे उचित नाही.

पल्ली छान आहे प्राथना, सुंदर...

ॐ , सैख्या आणि रौद्ररुप हे शब्द लिहिताना चुकले आहेत तेवढे दुरुस्तुन घे

श्रद्धाला अनुमोदन,

शिवाय - हे शिव शंभो शंकरा ...

नमः शिव पण गोंधळतय 'नमः शिवाय' असायला हव होत कदाचीत

वृषभ वाहका, वाचताना खटकल पण व्याकरणच्या दृष्टीकोनातून माहित नाही.
'कंठी सर्पधारका'
'रुढ वृषभ वाहना'

- पण हे 'सर्पधारका' बरोबर यमकात मार खातय पण..

मात्रा वगैरे मोजुन लिहल असशील तर मला माफ कर... मात्रा वगैरेचा विचार मी नाही केला आहे, बाकी जाणकार सांगतीलच

कुणाच्या चुका काढण्या ईतक मला कळत नाही, पण प्राथना आवडली... म्हणुन मानापासुन प्रतिक्रिया दिली इतकच

श्यामली, दाद, निखिल खैरे, श्रद्धाके, सत्यजीत्-एम तुम्हा सर्वांना धन्यवाद!
ही प्रार्थना शिवरात्रीला मनांत आली होती. जशी आली तशीच लिहुन काढली, त्यातल्या चुकांचा निट विचार केला नाही.
श्यामले थँक्स गं.
श्रद्धाके, सत्यजीत्-एम
तुम्ही सांगितलेल्या गोष्टी इतक्या अचुक आहेत की तुम्ही माझी प्रार्थना मनापासुन वाचली हे लक्षात आले. आणि ह्या दुरुस्तींमुळे माझ्यात एक अभ्यासु वृत्ती जागी होत आहे, शब्द म्हणजे खेळ नव्हे ह्याची जाणिव झाली. तुम्हा दोघांचे मराठी आणि संस्कृत वरचे प्रभुत्व लाजवाब! मी ह्या दुरुस्तींवर निट काम करुन ही प्रार्थना पुनःश्च पाठवेन. Happy
मंडळी, माझ्या इतर कवितांवरही तुमच्या अभिप्रायाची वाट पाहीन.

सर्वांच्या सुचना लक्षात घेउन सुधारणा करण्याचा प्रयत्न केला आहे, अजुनी काही बदल हवा असल्यास कृपया सुचवा.

छान...तुझ्या मनाचा निर्मळपणा, भक्तीभाव तुझ्या शब्दात जाणवताहेत.

पल्ली,
शब्दालंकार आणि भावना छान आहेत. मीटर आणि र्‍हीदमसाठी थोडी मेहनत घ्यायला हवी. तो नटराज आहे. नृत्य नाट्य संगीत यांचा जनक आणि उपासक आहे. त्याची स्तुती जितकी परिपूर्ण असेल तितकी जगृती लवकर होईल. हो ना.

....................................अज्ञात