चला दोस्त हो आयुष्यावर बोलु काही...............

Posted
8 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
8 वर्ष ago
Time to
read
1’

भाई अब कि बार आब्बा बोल रहे है "मेरेकु नही लगता मै घर वापस आनेवाला है".
डाक्टर म्हणालेत "सुर्यवंशी तुम्ही सेकंड चान्स घेउ नका जरा रिस्क आहे"
वरची दोन्ही वाक्य तुम्ही नुसतीच वाचा फारसं गंभीर वाटणार नाही पण मी ज्या परिस्थितीत ही एकली, आणि पाहीली ते आठवलं के आजही डोळे पाणावतात.नियतीचे फासे कसे कधी तुमच दान फिरवतील आणि आयुष्याच्या शर्यतीत तुम्ही कोठल्या कोठे फेकले जालं हे हे समजायच नाही.त्याही परिस्थीतीत, आशा आणि इच्छा शक्तीचा असाही एक अनुभव आपल्याला खुप काही सांगुन जातो.
सप्टेंबर २००५चा दुस-या आठवड्यातला हा प्रसंग. टाटा होस्पीटल. माझी आईची कर्करेगाची ट्रीट्मेंट चालु होती. २ महीन्यांपुर्वी शस्त्रक्रिया झाली होती आणि नंतर केमो चालु होती. आई बरोबर आणखी दोन पेशंट त्याच रूम मधे होते.
एक होता सुर्यवंशींचा ४ वर्षाचा मुलगा् गोरा, गोंडस , एकदम जुनी ऒळख असल्यासारखा चटकन हसणारा . आणि दुसरे जवळ जवळ ८० वर्षांचे अन्वर चाचा.मी पाहीलं त्यांना छे: वार्ध्यक्य अक्षरश: गालावरल्या सुरकुत्यांन मधुन लोंबत होतं आणि अर्धवट ग्लानीतलं बडबडबडणं.
मी थोडावेळ आई जवळ थांबलो. नर्सनी मग सर्वांना बाहेर थांबायला सांगितल. मी आणि बाबा बाहेरच्या वेटींग ऎरियात बसलो होतो. त्या चाचांचे जवळ जवळ १०-१२ नातेवाईक आले होते. मुलं-सुना नातवंड. त्यातला धाकटा होता बहुतेक माझ्याच वयाचा. तोच सांगत होता "हमारे आब्बु कि पिछले साल से यहां ट्रीटमेंट करा रहे है.गलेका क्यान्सर है उनको.आज दुसरी बार आपरेशन के लिये लेके आये है उनको.कलसे एकही बात कि रट लगाये है इस मै लग रहा है मै घर वापस नही जा पाउंगा.अब कैसे क्या समझानेका उनको. एसे हार मानेंगे तो ट्रीट्मेम्ट का कुच्छ असर नही होगा ना..त्या ८० वर्षाच्या व्रुध्दाला वाचण्याचे किती प्रयत्न चालले होते.
त्याच दिवसी दुपारी सुर्य्वंशीच्या मुलाला रक्त आणि सलाइन दिलं.मला वेळ होता आणि सहज देता येणार होतं म्हणुन मीही रीप्लेसमेम्ट दीलं. रक्त देउन बाहेर आलो तर किरण (सुर्यवंशी) म्हणाले संदीप धन्यवाद. मी त्यांना मुलाविषयी विचारल, म्हणाले त्याला रक्ताचा क्यान्सर आहे . डोक्टरांनी सांगितल्य कि सुरवातीला दर ३ महीन्याला रक्त संपुर्ण बदलावं लागेल. नंतर दर महिन्याला,आठ्वद्याला आणि नंतर कदाचित रोज सुदधा.
हे किती दिवस असं चालणार मी न राहवुन विचारलं जास्तीत जास्त २ वर्ष. आणि डाक्टर म्हणालेत "सुर्यवंशी तुम्ही सेकंड चान्स घेउ नका जरा रिस्क आहे"

मला त्या दिवशी रात्री नीट झोप लागली नाही. एकीकडे संपुर्ण जिवन जगलेल्याला वाचवण्याचा आटापिटा आणि अजुन न उमलंलेल आयुष्य नज्रेसमोर तुकद्या तुकड्यांनी संपताना पाहणं.

विषय: 
प्रकार: 

घारुअण्णा, धीर सोडायचे काहीच कारण नाही, यातून लोक बरे होतात. अशी उदाहरणे माझ्या डोळ्यासमोर आहेत. योग्य वेळी आजार लक्षात येणे आणि त्यावर तातडीने उपचार मिळणे गरजेचे आहे.

'टाटा' मध्ये मी आठ महिने राहिलो... दोन वर्षे चकरा मारत होतो. असे अनेक प्रसंग अनुभवले.

जीवनातले खरे 'हिरो' तिथेच भेटतात! खर्‍या खुर्‍या आयुश्यात प्रत्यक्ष मृत्युशी दोन हात करणार्‍यांना सलाम!

एकदा मित्र सोबत आला होता. त्याने जनरल वार्ड मधील पेशंट पाहिले, अन म्हणाला..... "अरे, मी आजवर फक्त किति छोट्या दुखाने हार मानत होतो, वाईट वाटुन घेत होतो. माझे दु:ख म्हणजे, युपीएस्सी त चौथा अटेंप्ट ला तरी पोस्ट मिळेल का?" पण हे खरे खुरे दु:ख बघितल्यावर तो थोडा शांत झाला. त्याच वर्षी तो भारतीय महसुल सेवेत दाखल झाला.

मला मुक्ताई आठवली. Uhoh मुक्ताई- माझी आजी.. तीलाही lung cancer होता. डॉ. ने ६ महिन्याची मुदत दिली होती. पण तरीही तीची जगण्याची जिद्दीला खरोखर सलाम. तब्बल २ वर्षे ती आमच्यासोबत राहीली. नातीचं लग्न पाहीलं,पंतू पाहीले. Happy

मी आजवर फक्त किति छोट्या दुखाने हार मानत होतो, वाईट वाटुन घेत होतो. >>> नेहमी हाच विचार करावा - दुनिया में कितना गम है, मेरा गम कितना कम है...

आमच्या एका सरांची मुलगी १+ वयाची होती, तीने स्तनपान करतांना आईच्या छातीला चावा घेतला' त्याच्या उपचारा साठी त्या डॉक्टरांकडे गेल्या असतांना त्यांना ३rd stage चा कँसर आहे अस निदान निघाल. त्यांच्या कडे खुप कमी वेळ उरला होती, बरेच उपचार केले, महागडी औषध, ईंजेक्शन्स... त्या म्हणायच्या "मला मरायच नाही, जगायच आहे, मला मरायच नाही..." पण काळ ठरला होता!!!

त्या दवाखान्यात होत्या तेव्हा सर खुप रडायचे, अगदी कोणाशी ही बोलतांना त्यांचे डोळे भरुन यायचे. स्टाफ मध्ये सगळे जण पगारातुन कॉन्ट्रि काढुन सरांना मदत करायचे. बायको गेल्यावर ६ महिन्यात सरांच दुसर लग्न झाल.

दुनिया में कितना गम है, मेरा गम कितना कम है...>.अगदी खरय.
आपल माणुस तर कायम हवच असत आपल्याला तरिही वाटत (आता आई झाल्यापासून जास्तच) लहान मुलांना अस काहीही होऊ नये. आई वडिलांना बाळाच जाण बघाव लागणं ह्यासारखा शाप नाहीये दुसरा Sad

जसे दु:खात आपलि माणसे कोण हे कळते तसेच त्यात तो दु:खि माणुसहि कितने पानिमे आहे हे कळते. जो माणुस ३-४ महिने पेशंट बरोबर होस्पिटलच्या चकरा खाऊन येतो त्यालाच खरा माणुस समजायला लागतो. जेव्हा एखाद्याला कळते कि तो स्वतः ३-४ महिन्यांचाच सोबति आहे , तेव्हा तो आघात पचवण व आपल मानसिक संतुलन न ढळता वावरण हे येर्‍यागबाळ्याचे काम नाहि. घारुअण्णा हेच जिवन आहे. जो ते समजतो व त्याला सामोराजातो त्यालाच हे आयुश्य कळले असे म्हटले पाहिजे.

Sad
बार्शी च्या नर्गिस दत्त चा माझा अनुभव ..
एक ग्रुहस्थ भेटलेले.. ३०-३२ वर्षांचे असतील.. एका बाकड्यावर डोळ्यात पाणी आणुन बसलेले..
मी बाजुलाच बसलेलो असल्याने आमचे संभाषन सुरु झाले आणी कळाले की हा ग्रुहस्थ मागच्या
५ वर्षांपासुन ईकडे येत आहे कारण त्याच्या बायकोला (वय २५) अ‍ॅनल कॅन्सर झाला आहे
आणी तो एक अत्यंत साधारण शेतकरी होता .. ३ भाऊ आणी ५ हेक्टर शेती..
ह्यानी आपल्या हिस्स्याची सर्व शेती विकली. रात्री ट्रक चालवतो.. दिवसा कापड दुकानावर काम.. आणी वेळ मिळाला की सिझन नुसार काहीतरी कमाई (ऊ.दा. देवी च्या मंदिरा बाहेर फुले विकणे नवरात्रीला ई.. )
आणी सर्वच्या सर्व कमाई बायकोच्या आजारपणाला जाते .. आतापर्यंत ह्या महाशयांनी १० लाख रु. खर्च केले होते.. आजुन किती होणार माहीत नाही म्हणाला..
त्याच्या बायकोला केंव्हाच सासु सासर्यंनी घरातुन बेदखल केले.. ह्याला वरुन सांगत असतात टाकुन दे हिला..
हे जाऊया ह्या ऊपरांत त्याच्या बायकोच्या माहेरची माणसे पण विचारत नाहीत.. Sad

तो पाणावलेल्या डोळ्याने म्हणला मला ईछा होते हीला सोडुन द्यायची... पण माझे प्रेम आहे हिच्यावर Uhoh
आणी शेवटच्या क्षणापर्यंत साथ देईल ...

५ मी. त्याने आसवे आवरली आणी बायकोला घेऊन डॉ. च्या कॅबीन मधे घेऊन गेला Sad

आणी ती परिस्थीति पाहुन माझे पण डोळे पाणावलेले होतेच...

चारपाच वर्षापूर्वी आमच्या कामवाल्या बाईच्या मुलाला अपघात झाला होता त्याला ससूनमधे दाखल केले होते. मुलगा बांधकामाच्या साइटवर पडला आणि डोक्याला मार लागून बेशुद्ध झाला. माझ्या मुलाएवढाच तीचा मुलगा आहे साधारण. तेव्हा मी खूप खेटे मारले ससूनमधे जनरल वॉर्डमधे. खरं आयुष्य तिथेच कळतं. मुलगा पुढे बरा झाला. पण तिथले अनुभव तिथल्या डॉक्टरांशी झालेले संवाद कधीही न विसरता येण्यासारखे.

घारुअण्णा, खरंच गलबलायला होतं असं काही अनुभवल्यावर!

मागे मी एकदा पुण्याच्या आर्मीच्या ए. एफ. एम. सी. हॉस्पिटलच्या कॅन्सर वॉर्ड मध्ये हॉस्पिटलच्या विनंतीवरून सत्संगासाठी गेले होते. अगदी कोवळ्या वयाच्या मुलींपासून म्हातार्‍या बायकांपर्यंत, उपचारांच्या आणि प्रकृतीच्या वेगवेगळ्या स्थितीत असलेल्या बायकांना पाहून सुरुवातीला गच्चकन काहीतरी हाललं होतं हृदयात...... मग डोळे मिटले आणि त्यांच्यासोबत त्यांना जमतील तशी, त्यांना प्रेरणा देणारी गाणी/ भजने म्हटली. प्रार्थना केली. तेवढंच हातात होतं माझ्या. खूप खूप मनोभावे केलं ते! त्यांचं भविष्य मला माहीत नव्हतं पण त्यांचे वर्तमान क्षण तरी आनंदाचे करण्याचं माझ्या हातात होतं..... बस्स्स! बुधराणी हॉस्पिटललाही असाच अनुभव!