Submitted by करकोचा on 12 April, 2008 - 12:26
इष्कात रंगणार्यांची पंचमी असावी
होळी परी फुलांची त्या संगमी असावी
मानस सरोवराची शोभा असावयाची
निष्पाप पंकजा का या कर्दमी असावी ?
डोळ्यात खोल अश्रू ती साठवून घेते
पुढल्या अवर्षणाची ती बेगमी असावी
भिजवून एकदा जी गेली, पुन्हा न आली
बहुधा उनाड सर ती बेमोसमी असावी
भिजताच गंध कैसा मातीस येत नाही ?
या पावसात काही नक्की कमी असावी असावी...
गुलमोहर:
शेअर करा
क्या बात
क्या बात है!
शेवटचे ३ शेर अप्रतिम आहेत!! या पावसात काही नक्की कमी असावी -- वा वा!
बहारदार गझल...
डोळ्यात
डोळ्यात खोल अश्रू ती साठवून घेते
पुढल्या अवर्षणाची ती बेगमी असावी
भिजताच गंध कैसा मातीस येत नाही ?
या पावसात काही नक्की कमी असावी असावी...
वा वा.....
खूप आवडले हे २....
तिसरा,
तिसरा, शेवटचा शेर आवडला. गझलेला नावही समर्पक
आणि हो मायबोलीवर १लीच रचना सादर केलेली दिसत्ये आपण, तेंव्हा आपलं स्वागत.
सुंदर.
सुंदर. सगळेच शेर बेदम आहेत... (मला स्वतःला दुसरा नीटसा कळला नाहीये.)
शेवटचे तीन खूप आवडले.
स्वागत आहे, तुमचं करकोचा (?? मजेशीरच वाटतय असं लिहिताना).
सही!
सही! शेवटचे तीन मस्त. त्यातही शेवटचा आणखीनच जास्त आवडला.
गझल छान आहे.
फक्त पहिल्या शेरात उला मिसर्यात ' गागाल गालगागा' नंतर यती हवा होता. तो नाही.
इष्कात रंगणार्यां चीपंच मी असावी. असे होते वृत्तानुसार वाचताना...
डोळ्यात
डोळ्यात खोल अश्रू ती साठवून घेते
पुढल्या अवर्षणाची ती बेगमी असावी
भिजवून एकदा जी गेली, पुन्हा न आली
बहुधा उनाड सर ती बेमोसमी असावी
भिजताच गंध कैसा मातीस येत नाही ?
या पावसात काही नक्की कमी असावी असावी...
एकापेक्षा एक सरस शेर...!
बेगमी आणि
बेगमी आणि गंध मातीचा हे दोन्ही शेर आवडले.गझल आवडली.
कर्दमी चा अर्थ बहुतेक चिखल असावा:) -
सोनाली
नमस्कार, गझ
नमस्कार,
गझल छान आहे. मतला डोक्यावरून गेला मात्र.
शेवटचे
शेवटचे तीनही शेर सुंदर. पहीले दोन शेर नाही कळले मलाही.
सुवर्णमयी,
सुवर्णमयी, तुमचं बरोबर आहे.
कर्दमी म्हणजे चिखलात.
मीनू,
मानस सरोवराची शोभा असावयाची
निष्पाप पंकजा का या कर्दमी असावी ?
याचा अर्थ, जिने मानस सरोवराची शोभा असायला हवी, ती पंकजा इथे चिखलात का आहे?
पण मला यात "निष्पाप" शब्दाचं प्रयोजन नाही कळलं.
करकोचा, स्पष्ट कराल का?
मतला मलाही नाही कळला....
चिनूला अनुमोदन. शरद
चिनूला अनुमोदन.
शरद
ती पंकजा ? ते पंकज पाहीजे ना
ती पंकजा ? ते पंकज पाहीजे ना ?
गझल आवडलीच मात्र.
बहारदार गझल....जियो !!! गिरीश
बहारदार गझल....जियो !!!
गिरीश