अता

Submitted by desh_ks on 11 April, 2008 - 23:32

संपता स्वप्न मी शिणत नाही अता
दु:ख सांभाळणे गणत नाही अता ||
वेदना जाहली अंतरीची सखी
‘राहिलो एकटा’ म्हणत नाही अता ||
संपले सांगणे तृप्त मौनात मी
मी सुखाला पुरे म्हणत नाही अता ||
हे असे चांदणे बहरले अंतरी
कालचे ऊन रणरणत नाही अता ||
बंधनापासुनी जाहलो मोकळा
मोहजाळी पुन्हा विणत नाही अता ॥

गुलमोहर: 

वेदना जाहली अंतरीची सखी
‘राहिलो एकटा’ म्हणत नाही अता ||
संपले सांगणे तृप्त मौनात मी
मी सुखाला पुरे म्हणत नाही अता ||
हे असे चांदणे बहरले अंतरी
कालचे ऊन रणरणत नाही अता ||

सुंदर....
"अंतरीची सखी" शब्दयोजना खास!!! Happy