ब्रोकन शिल्ड

Posted
11 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
11 वर्ष ago

इत्क्यातच ईंग्लंडची वारी झाली. नेहमीप्रमाणे वेगवेगळ्या नाण्यांवर नजर होती. २००८ साली नेहमीपेक्षा हटके डिझाईन्स असलेली काही नाणी काढल्या गेली. १ पाऊंडच्या नाण्यावर रॉयल कोट ऑफ आर्म्सचे शिल्ड आहे, तर त्या पेक्षा कमी किमतीच्या नाण्यांवर तीच आकृती, पण विभागुन दिली आहे (१, २, ५, १०, २०, ५० पेन्स). मला वरील सर्व नाणी मिळाली. किंवा खरेतर मिळाली असे वाटले. घरी येऊन पहातो तर १० पेन्सचे नाणे नव्हतेच Sad

UK2008coins.jpg

गम्मत म्हणजे तिथे भेटलेल्या अनेकांना ते विभागलेले शिल्ड आहे हे लक्षात देखील आले नव्हते.

१ पाऊंडच्या नाण्यांमध्ये देखील बरीच वैविध्यता आहे. गेली तीन वर्षे वेगवेगळी कोट ऑफ आर्म्स झळकताहेत, तर त्या आधी ४ वर्षे ४ पुल (ब्रीजेस) होती. त्या आधी आलटुन पालटुन वेल्स, नॉर्द्रर्न आयर्लंड, स्कॉटलंड व ईंग्लंडला मानांकीत करणारी चिन्हे होती. कधिकाळी चांगल्या प्रतिचे नमुने मिळतील अशी आशा आहे.

UK2008coins2.jpg

विषय: 
प्रकार: 

गटग चमु, यातील १० पेन्सचे नाणे नव्हते - ते आज मिळाले आहे.

चौथा पूल मात्र अजुन मिळालेला नाही. (२००६ सालचा)
http://www.flickr.com/photos/blue-moose/362810208/

२ पौंडांची तर बरीच वेगेवेग्ळ्या डिझईन्सची नाणी असतात - त्यातील एकदोनच आहेत (उदा. २००४ सालचे रेल्वे संबंधीत)
http://en.wikipedia.org/wiki/Two_pounds